यंदाच्या बाफ्टा (ब्रिटीश अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स) पुरस्कार सोहळ्यात मणिपुरी भाषेतील ’बूँग’ या चित्रपटाने ’सर्वोत्कृष्ट बाल आणि कौटुंबिक चित्रपट’ गटात बाजी मारून भारतीय सिनेसृष्टीची मान उंचावली आहे. लक्ष्मीप्रिया देवी यांचा दिग्दर्शिका म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. मुख्य भूमिकेत असणारा गुगुन किपगेन हा बालकलाकार स्वतः कुकी-झो समुदायाचा असून त्याने यात मैतेई मुलाची भूमिका साकारली आहे. आपल्या हरवलेल्या वडिलांना परत …
Read More »सिने समिक्षण
पुन्हा उजळली चंदेरी दुनिया
कोरोना महामारीच्या काळात वेगाने लोकप्रिय झालेल्या ओटीटी कल्चरमुळे बॉलीवूड संकटात सापडल्याची चर्चा सातत्याने होत होती. विशेषतः चित्रपटगृहांमध्ये जाऊन प्रेक्षकांनी सिनेमे पाहण्याचे प्रमाण कमी झाल्याचा दावा सर्रास केला जात होता. पण 2025 मध्ये भारतीय चित्रपटांच्या एकूण बॉक्स ऑफिस संकलनाने 13,395 कोटी रुपयांचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. ही आकडेवारी कोरोना महामारीपूर्व काळातील सरासरीच्या तुलनेत 32 टक्क्यांनी अधिक असून ती प्रेक्षकांच्या बदललेल्या मानसिकतेचे …
Read More »चर्चा नायकांच्या वयाची
बॉलीवूड अभिनेता इमरान खान याने अलीकडेच लोकमनातील एका विषयाची तार छेडली आहे. हा विषय म्हणजे सलमान खान, शाहरुख खान आणि आमीर खान या खानावळींनी वयाची साठी ओलांडत आली तरी किती दिवस नायकाची व्यक्तिरेखा साकारायची? आणखी किती दिवस त्यांना प्रेक्षकांनी पडद्यावर नायकाच्या रुपात पाहायचे? या तिन्ही स्टार्सनी आता आता आपल्या वयाला साजेसा आणि वास्तववादी अभिनय करण्यावर भर द्यायला हवा, असा सल्लाही …
Read More »नवोदित चेहऱ्यांच्या प्रेमकथा आणि यशाचे समीकरण
चित्रपटाच्या चंदेरी दुनियेत प्रेमकथा हा असा एक विषय आहे, ज्याला काळाचे बंधन नसते. एखाद्या भव्य प्रेमकाव्यावर आधारित चित्रपट साकारण्यासाठी पडद्यावर नेहमीच बड्या महानायकांची गरज भासते असे नाही, तर नवोदित कलाकारांच्या फ्रेश जोड्याही बॉक्स ऑफिसवर चमत्कार घडवू शकतात. गेल्या वर्षातील ‘सैयारा’ या चित्रपटाचे अभूतपूर्व यश हे याचेच जिवंत उदाहरण मानले पाहिजे. चित्रपटसृष्टीचा इतिहास चाळला तर आपल्या असे लक्षात येते की, नामचीन …
Read More »मौनातून गजर करणारा ‘गांधी टॉक्स’
आजच्या डिजिटल युगात, जिथे रिल्स आणि शॉर्ट व्हिडिओंची सरबत्ती सतत सुरू असते, तिथे दोन तासांहून अधिक काळ मूक चित्रपट पाहणे म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध जाण्यासारखे आहे. किशोर पांडुरंग बेळेकर दिग्दर्शित ‘गांधी टॉक्स’ हा असाच एक धाडसी प्रयोग आहे, जो मौनालाच आपली भाषा बनवतो आणि संवादहीनतेला शक्तिशाली कथनाचे साधन म्हणून वापरतो. हा चित्रपट केवळ निव्वळ मनोरंजन नाही, तर तो एक असा अनुभव …
Read More »छोटी गावे, मोठे चित्रपट
बॉलीवूडमधील निर्माते आणि दिग्दर्शकांनी सिनेरसिकांना देश-विदेशातील नितांतसुंदर प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन घडवले. स्वित्झर्लंड, मॉरीशस, लंडन, ऑस्ट्रेलिया यांसह जगभराची सफर रुपेरी पडद्यामधील दृश्यांमधून प्रेक्षकांना घडवून आणली आणि ती पाहून प्रेक्षकही मंत्रमुग्ध झाले. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये देशातील काही छोट्या गावांमध्येही काही चित्रपटांचे चित्रीकरण झाले. ‘स्वदेस’, ‘पीके,’, ‘बजरंगी भाईजान’, ‘गंगाजल’, ‘जब वी मेट’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसणारा आपला गाव पाहून या गावच्या मातीशी नाळ …
Read More »छोटी गावे, मोठे चित्रपट
बॉलीवूडमधील निर्माते आणि दिग्दर्शकांनी सिनेरसिकांना देश-विदेशातील नितांतसुंदर प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन घडवले. स्वित्झर्लंड, मॉरीशस, लंडन, ऑस्ट्रेलिया यांसह जगभराची सफर रुपेरी पडद्यामधील दृश्यांमधून प्रेक्षकांना घडवून आणली आणि ती पाहून प्रेक्षकही मंत्रमुग्ध झाले. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये देशातील काही छोट्या गावांमध्येही काही चित्रपटांचे चित्रीकरण झाले. ‘स्वदेस’, ‘पीके,’, ‘बजरंगी भाईजान’, ‘गंगाजल’, ‘जब वी मेट’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसणारा आपला गाव पाहून या गावच्या मातीशी नाळ …
Read More »भावनाप्रधान गीतांचा काळ सरला
हिंदी सिनेसृष्टीतील असंख्य अवीट गीतांनी तीन पिढ्यांहून अधिक काळ भारतीय जनमानसाच्या मनाला मोहिनी घातली. आजही या गीतांची जादू रसिकांच्या मनावर कायम आहे. नव्या रुपामध्ये ही गाणी सादर केली जातात तेव्हा त्यांनाही तितकीच लोकप्रियता लाभते आहे. दुर्दैवाने, आज अशा गाण्यांची कमतरता भासत आहे. यामागचे कारण प्रतिभा संपली आहे असे नसून, हृदयापर्यंत पोहोचणारा रस्ता बदलला आहे आणि तो खूप छोटा करण्यात आला …
Read More »खलनायकीचा नवा सुवर्णकाळ
सध्याच्या चित्रपटसृष्टीत खलनायक केवळ काळ्या-पांढऱ्या रंगातील नैतिक विभागणीपुरता मर्यादित राहिलेला नाही. तो आता अँटी-हिरो, ग्रे-झोन आणि गुन्हेगारी केंद्रित कथानकाचा प्रतीक बनला आहे. ‘के.जी.एफ.’, ‘पुष्पा’, ‘मिर्झापूर’, ‘छावा’ आणि ‘ॲनिमल’ यांसारख्या कलाकृतींनी हा ट्रेंड अधिक मजबूत केला. बॉक्स ऑफिसची आकडेवारी सांगते की, प्रेक्षक आता या गडद आणि हिंसक पात्रांमध्ये थरार शोधत आहेत. या पार्श्वभूमीवर अक्षय खन्ना आणि बॉबी देओल यांनी ‘स्टार व्हिलन’चे …
Read More »हिंसक चित्रपटांचा घातक प्रवाह
सध्याचे हिंसाचाराने माखलेले चित्रपट नव्या पिढीला धोकादायक वळणावर नेऊन ठेवत आहेत. बासु चॅटर्जी, गुुरू दत्त, राज कपूर, हृषिकेश मुखर्जी, यश चोप्रा यांसारख्या अभिजात दिग्दर्शकांची पिढी भूतलावर अवतरली तर बॉलिवुडपटांचा झालेला विचका पाहून ‘नको तो चित्रपट’ असे म्हणतील अशी आजची स्थिती आहे. टिव्ही आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून हिंसाचारांची दृश्य अल्पवयीन मुलांवर नकारात्मक परिणाम करत आहेत. या लोकप्रिय होत चाललेल्या धोकादायक ट्रेंडला …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र