लेख-समिक्षण

सिने समिक्षण

वास्तववादी चित्रपटांची वानवा

चित्रपट हे मनोरंजनाचे अत्यंत प्रभावी माध्यम मानले जाते. परंतु मनोरंजनाचा अर्थ फक्त मन रमविणे, वेळ घालविणे इतकाच नसतो. प्रेमकथा, नाचगाणी आणि मारामारी यानंतर एखाद्या चित्रपटाचा सुखांत झाला की तेवढेच मनोरंजन असे होत नाही. जीवनाचे यथार्थ दर्शन, लोकांच्या वेदना, समाजातील सत्य आणि मानवी संघर्षाशी प्रेक्षकाला सामोरे नेणे हेही मनोरंजनाचे एक महत्वाचे अंग असते. सत्य दाखविणार्‍या चित्रपटांची कथानके म्हणूनच विशेष ठरतात, कारण …

Read More »

रुपेरी पडद्यावरचा दीपोत्सव

भारतीय संस्कृतीत दिवाळी हा तेजाचा, चैतन्याचा, प्रकाशाचा उत्सव असून या सणाला सणसम्राज्ञी किंवा सणांची महाराणी म्हटले जाते. या सणाचे सामाजिक, धार्मिक आणि भावनिक पैलू जितके खोल, तितकाच त्याचा प्रभाव भारतीय चित्रपटसृष्टीवरही दिसून येतो. बॉलिवूडने गेल्या काही दशकांत दिवाळीच्या उत्सवाला केवळ पार्श्वभूमी म्हणून नव्हे तर एक कथानकाचे केंद्रस्थान म्हणूनही वापरले आहे. प्रत्येक काळात दिवाळीच्या प्रकाशात नातेसंबंधांची गुंतागुंत, कुटुंबातील बंध, प्रेम, पुनर्मिलन, …

Read More »

शेवट दुःखद असूनही…

चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते माणसाला एका वेगळ्या जगात घेऊन जाणारे माध्यम आहे. पडद्यावर उमटणार्‍या भावनांनी आपण अनेकदा वास्तव विसरतो आणि पात्रांच्या आनंद-दुःखात रंगून जातो. काही चित्रपटांचा शेवट जसा आशादायक आणि सुखद असतो, तसाच काहींचा शेवट इतका वेदनादायी असतो की तो मनावर कायमचा ठसा उमटवून जातो. असेच काही बॉलिवूड चित्रपट आहेत, ज्यांच्या कथांचा शेवट शोकांत आहे पण त्यातून …

Read More »

मल्याळम सिनेमातील अमिताभ

अलीकडेच दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले मल्याळम अभिनेते मोहनलाल यांनी चार दशकांच्या कारकिर्दीत अनेक भाषांतील चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. भारतीय सिनेमावर मोहनलाल यांचा प्रभाव अनुपम मानला जातो. पडद्यावर प्रभावी उपस्थितीमुळेच ते नेहमीच इतरांहून वेगळे भासतात. ते देशातील सर्वाधिक सन्मानित अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांना मल्याळम चित्रपटसृष्टीतील अमिताभ बच्चन अशी उपाधी दिली गेली आहे. संवादफेक आणि भावनांचे चित्रण यांत त्यांची खासियत …

Read More »

दशावतार ः विकास-विध्वंसाचे द्वंद्व

भारतीय चित्रपटसृष्टीत आजवर अनेक सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक प्रश्नांवर बोट ठेवणारे चित्रपट आले, मात्र ‘दशावतार’ या मराठी चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनाला भिडणारे वेगळे स्थान पटकावले आहे. पौराणिक अवतारांचा आधार घेत वर्तमानातील भ्रष्ट व्यवस्था, अन्याय्य विकासाची संकल्पना आणि निसर्गविनाशाचे भयावह वास्तव उलगडून दाखवणारा हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता न राहता विचारप्रवृत्त करणारा ठरतो. दिग्दर्शकाची कलादृष्टी, प्रभावी संवाद आणि कलाकारांचा बहुआयामी, हृदयस्पर्शी अभिनय यामुळे …

Read More »

साधेपणाचे पारडे जड

हिंदी चित्रपटसृष्टीत गेल्या काही दशकांत विविध प्रवाह दिसून आले. एका टोकाला प्रचंड खर्च करून तयार करण्यात आलेली ऐश्वर्यशाली मांडणी असलेली, परंतु कथानकाच्या दृष्टीने बोजड ठरलेली चित्रपटांची मालिका दिसते; तर दुसर्‍या टोकाला थेट जीवनाला भिडणार्‍या, साधेपणा असणार्‍या, पण प्रभावी चित्रपटकृती प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसतात. या दोन प्रवाहांमध्ये ‘बोल्ड दृश्ये’ या घटकाला जणू काही ठरावीक स्थान प्राप्त झाले आहे. काही निर्माते …

Read More »

रजनीकांत नावाचं पर्व

रजनीकांत हे नाव केवळ चित्रपटसृष्टीतील एक चमकदार ब्रँड नाही, तर त्यामागे संघर्ष, चिकाटी आणि अस्सल माणूसपणाची कहाणी आहे. त्यांनी पडद्यावरच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांच्या हृदयात स्थिर स्थान मिळवलेच; पण खर्‍या आयुष्यातील साधेपणा, प्रामाणिकपणा आणि नम्रता यामुळे त्यांना जनसामान्यांचा आदर प्राप्त झाला. पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी अभिनय केला, आणि आजही त्यांचे नाव केवळ तमिळ सृष्टीपुरते मर्यादित नाही, तर जगभरातील चाहत्यांच्या मनात …

Read More »

रामकथांची मोहिनी

हिंदी सिनेमा हा केवळ मनोरंजनाचे साधन नाही, तर तो भारतीय समाजाच्या सांस्कृतिक जडणघडणीचाही एक महत्त्वाचा घटक आहे. गेल्या सव्वाशे वर्षांच्या या प्रवासात अनेक विषय, कथानके, व्यक्तिरेखा पडद्यावर आल्या; पण त्यांत सर्वाधिक लोकप्रिय ठरलेले विषय म्हणजे रामायण व महाभारतासारख्या पौराणिक कथा. यातही रामकथा ही प्रेक्षकांच्या भावविश्वात खोलवर रुजलेली कथा आहे. कारण प्रभू श्रीराम हे केवळ देवता म्हणून नव्हे तर मर्यादा, धर्मपालन, …

Read More »

रुपेरी पडद्यावरील गणेशोत्सव

घराघरांमध्ये आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन झाले की वातावरण मांगल्यदायी आणि ऊर्जादायी बनून जाते. गणपती ही बुद्धीची देवता आहे, तशीच ती कलेची देवता आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाला स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा संदर्भ आहे आणि आज हा उत्सव सबंध देशभरात नव्हे तर जगभरात साजरा केला जातो. त्यामुळे सिनेकलाकृतींमध्येही गणेशोत्सवाचे प्रतिबिंब उमटले आहे. वास्तव, सत्या, अग्निपथ, डॉन, शोर इन द सिटी, माय फ्रेंड गणेशा यांसारख्या …

Read More »

आठवणी ‘शोले’च्या

बॉलिवुडमधील सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी चित्रपट म्हणून रमेश सिप्पी यांच्या ‘शोले’ चित्रपटाचा उल्लेख करावा लागतो. या चित्रपटाच्या प्रदर्शनास पन्नास वर्षे पूर्ण झाली. आजही या चित्रपटातील पात्र, गाणे, संवाद, दृश्य प्रेक्षकांच्या मनावर कोरली गेली आहेत. तीन कोटी रुपयांत तयार झालेल्या चित्रपटाचे प्रारंभिक बजेट एक कोटी रुपये होते. मात्र या चित्रपटाने तत्कालिन काळात ३५ कोटी रुपयांची कमाई केली. मुंबईतील मिनर्व्हा टॉकीजमध्ये सलग …

Read More »