बॉलिवूडमध्ये आता केवळ ‘हिरो’ची चलती राहिलेली नाही. गेल्या काही वर्षांत चरित्र अभिनेत्यांचे (उहरॲरलींशॲ अॲींळीीीं) स्थान कमालीचे भक्कम झाले आहे. एकेकाळी नायकाच्या सावलीत वावरणारे हे कलाकार आता स्वतःच्या खांद्यावर चित्रपट पेलू लागले आहेत. परेश रावल, प्रकाश राज यांच्यापासून ते पंकज त्रिपाठी आणि मनोज बाजपेयींपर्यंतच्या कलाकारांनी हे सिद्ध केले आहे की, अभिनय सकस असेल तर पडद्यावरची ‘स्पेस’ महत्त्वाची नसते, तर भूमिकेची व्याप्ती …
Read More »सिने समिक्षण
‘धुरंधर’ची घोडदौड कशामुळे?
रणवीर सिंगसह सहकलाकारांचा दमदार अभिनय, आदित्य धरचे कसलेले दिग्दर्शन आणि ऐतिहासिक घटनांची गुंतलेली गुंफण यांमुळे ‘धुरंधर’ने बॉक्स ऑफिसवर यशाचा नवा मानदंड प्रस्थापित केला आहे. ‘धुरंधर’ ही भारतीय चित्रपटसृष्टीच्या बदलत्या प्रवाहाची नांदी आहे. आशयघन मांडणीला तांत्रिक भव्यतेची जोड मिळते, तेव्हा बॉक्स ऑफिसचे सर्व विक्रम मोडीत निघतात, हे या चित्रपटाने दाखवून दिले आहे. राष्ट्रवाद, इतिहास आणि मनोरंजन यांचा त्रिवेणी संगम असल्याने हा …
Read More »राज कपूर ः द ग्रेट शोमन
हिंदी चित्रपटसृष्टिचे ग्रेट शोमन राज कपूर यांच्याबद्दल ठळक गोष्टी सर्वांनाच माहिती असतील. पण ते कसे घडले. त्या सर्वांची पार्श्वभूमी काय होती, हे जाणून घेताना प्रत्येकाला अभिमान वाटेल अशा काही घटना या ‘शोमॅन’च्या आयुष्यात घडल्या. काही अफवा पसरल्या. त्यांच्या बिनधास्त वागण्यामुळे, परिस्थितीला बिनधास्तपणे, आव्हानात्मकरित्या स्वीकारण्याच्या स्वभावामुळे त्या अफवांना चांगलं पीक आलं. त्यांच्या देखणेपणामुळे त्या गोष्टींना अधिकाधिक खतपाणी मिळालं. त्या गोष्टी अधिक …
Read More »कलाकारांचे बहुविवाह
भारतीय समाजात आजही दुसऱ्या विवाहाला मान्यता मिळताना दिसत नाही. विशेषतः पहिली पत्नी हयात असताना किंवा तिच्यासोबत घटस्फोट झालेला नसताना दुसरा विवाह करणे ही सरळसरळ प्रतारणाच असते. परंतु सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांचे आयुष्य पाहिल्यास त्यांनी ही प्रतारणा लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाही केल्याचे दिसते. दिलीप कुमार, धर्मेंद्र, राज बब्बर, राजेश खन्ना, विनोद खन्ना, आमीर खान, सैफ अली खान यांसारख्या नायकांच्या दुसऱ्या-तिसऱ्या विवाहांच्या चर्चांमुळे …
Read More »कहाणी रुपेरी पुष्पप्रेमाची
फुल हे सौंदर्य, सुवासिक आणि मोहकतेचे प्रतीक आहे. केवळ महिलाच नव्हे तर लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंतच्या वयोगटातील प्रत्येकाला फुलांविषयी आकर्षण राहिले आहे. भगवंताच्या पूजेतही फुलांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हिंदी चित्रपटांतही विविध रंगाच्या आणि रुपाच्या फुलांनी नायिकेच्या सौंदर्यात भर घातलेली दिसून येते. कृष्णधवल काळापासून ते इस्टमनकलरपर्यंतच्या चित्रपटांवर फुलांचा बहर पाहवयास मिळाला आहे. त्याचवेळी चित्रपट गीतांत प्रेम आणि विरहात फुलांनी मोलाची भूमिका बजावली …
Read More »चिरतरुण धर्मेंद्र
सिनेसृष्टीतील जुन्या नायकांच्या मांदियाळीमध्ये आपला स्वतंत्र ठसा उमटवून तीन दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी नुकताच जगाचा निरोप घेतला. चित्रपटांमधील नायकाकडून प्रेक्षकांना असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारा अभिनेता म्हणून धर्मेंद्र यांचे वर्णन करावे लागेल. नव्वदीनंतरच्या काळात सिनेसृष्टीत चॉकलेट हिरोंची सद्दी निर्माण झाली; पण धर्मेंद्र यांनी साकारलेला नायक हा बलाढ्य खल प्रवृत्तींशी लढणारा, संघर्ष करणारा, कोणत्याही …
Read More »यावसायिक वि अभिजात
तिकीटबारीवर यशवी ठरलेले चिपट समरणीय असतीलच असे नाही. दसरीकडे अभिजात आणि बहचचित चिपटानी बास आफिसवर चागले यश मिळवलेले असेलच असेही नाही. लासिक वि कमशियल अशी पधा नसली तरी दोही श्रेणीतील चिपटानी वेळावेळी आपला ठसा उमटविला आहे. ामुयाने दजेदार, अभिजात चिपटानी काहीवेळा तिकीटबारीवर जोरदार दशन केले आणि ते पिढयानपिढया मनोरजन करत राहिले. उदा. मुघल ए आझम, शोले, दिवार आदींचा उेख करता …
Read More »चित्रपटातील गावची पाटी पुसट!
एकेकाळी बॉलिवुडपटात ग्रामीण संस्कृती, परंपरा,चालीरिती, बाजारपेठ आदींचे दर्शन घडायचे. खेडेगाव कसे असते, हे चित्रपटातून कळायचे. बॉलिवुडपटातील नायक आणि नायिकेची पार्श्वभूमी ग्रामीण असायची आणि त्यांच्याभोवती कथानक फिरताना खेडगाव अनुभवास येत असे. कालांतराने बॉलिवुडपटात व्यावसायिकता आल्याने आणि लोकांची जीवनशैली बदलल्याने शहरीकरण वाढत गेले. साहजिकच पडद्यावरच्या शेतीची जागा मॉलने घेतली आणि झोपडीची जागा आलिशान बंगल्याने किंवा फ्लॅटने घेतली.- सोनम परब अलिकडच्या काळातील हिंदी …
Read More »अनभिषिक्त सुपरस्टार
शाहरुख खान… बॉलीवूडला पडलेलं एक सुंदर स्वप्न… हजारो-लाखो नव्हे तर कोट्यवधी तरुण-तरुणींच्या हृदयाची धडकन…जवळपास तीन दशकांहून अधिक काळ हिंदी सिनेसृष्टीवर आपली अवीट आणि अमीट छाप उमटवणारा बादशहा… फॅशन आयकॉन…स्टाईल आयकॉन…एटिकेटस् आयकॉन….आणि अभिनयाच्या क्षेत्रात तर अनभिषिक्त सम्राट… रुपेरी पडद्यावरील त्याच्या हरेक अदा प्रेक्षकांना मनापासून आवडणार्या… इतक्या की गावाखेड्यांमध्येही एखाद्या स्टायलिश तरुणाला ‘काय शाहरुख’ म्हणून उपमा दिली जाते…. त्याच्या स्टाईलची नक्कल करणार्यांची …
Read More »असरानी नावाचे हास्यपर्व
हिंदी चित्रपटसृष्टीतील चालतीबोलती दंतकथा ठरलेल्या शोले चित्रपटात लहानशी, परंतु अविस्मरणीय भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे नुकतेच निधन झाले. केवळ शोलेच नाही, तर त्यापूर्वी व त्यानंतर असंख्य चित्रपटांत लहान-मोठ्या व सर्व छटांच्या भूमिका साकारणारे असरानी काही दिवसांपासून प्रकृतीच्या समस्यांनी त्रस्त होते. ‘हम अंग्रेज़ों के ज़माने के जेलर हैं’ व हमारे जेलमें सुरंग?’ हे विशिष्ट लकबीत त्यांनी उच्चारलेले संवाद चित्रपटप्रेमींच्या कायम …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र