लेख-समिक्षण

सिने समिक्षण

पसिनेमातून हद्दपार होणारे खेडेगाव

1950 ते 1980 च्या दशकांपर्यंत बहुतांश चित्रपटांवर ग्रामीण भागाचीच छाप राहिली आहे. बैलगाडी, झोपडया, नदी-नाले, शेतीवाडी, पक्ष्यांचे थवे, डोंगर दर्‍या, पायवाट, ग्रामीण भागातील पेहराव, फेटा, धोतर पायजमा, पारंपरिक उद्योग, ग्रामदेवता या यासारख्या गोष्टी दिसायच्या. सध्याच्या काळात प्रदर्शित होणारे चित्रपट पाहिले तर ते उच्चभ्रु वस्तीचे दर्शन घडविणारे आहेत. पंचतारांकित हॉटेल्स, घरे, परदेशातील लोकेशन, समुद्रकिनारे, कॉर्पोरेट ऑफिस, महागड्या गाड्या, मेट्रो, विमान, एकमेकांवर …

Read More »

निमित्त ‘इमर्जन्सी’चे

सध्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या प्रदर्शनावरून वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली जात आहे. या चित्रपटात इतिहासातील अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीने सादर केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. पंजाबसह अन्य बिगर भाजपशासित राज्यांनी चित्रपट प्रदर्शन न करण्याचा निर्णय घेतला आहे. इतिहासात डोकावल्यास अनेकदा मजकुर, दृश्यावरून राज्य आणि केंद्र सरकारने चित्रपटावर बंदी घातलेली आहे. आतापर्यंत जवळपास 800 चित्रपटांना सेन्सॉर …

Read More »

पुन्हा डर्टी पिक्चर !

मल्याळम चित्रपट उद्योगातील महिलांच्या शोषणांच्या तक्रारीची दखल घेत केरळ सरकारने चौकशीसाठी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश के हेमा यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय पीठाची स्थापना 2017 मध्ये केली होती. दोन वर्षांपूर्वी या समितीने आपला अहवाल सरकारकडे सादर केला. यात काही धक्कादायक निष्कर्ष होते आणि त्यामुळे सरकारने तो अहवाल सार्वजनिक केला नाही. मात्र गेल्या 19 ऑगस्ट रोजी अहवाल जारी करण्यात आला. अहवालातील गौप्यस्फोटाच्या आवाजाने …

Read More »

सिनेगीतांना साज लोकसंस्कृतीचा

सिनेमा आणि संस्कृती या दोन गोष्टींचा प्रवास अगदीच हातात हात घालून नाही, पण एकमेकांना समांतर असा नक्कीच चालू असतो. समाज आणि संस्कृतीमधे या सर्व कालावधीत जी काही स्थित्यंतरे झाली त्याचं प्रतिबिंब नंतरच्या काळात आलेल्या सर्व चित्रपटांमधे अगदी जसंच्या तसं नसेल उतरलं तरी पण निदान रुढी, परंपरा, चालीरिती, रिवाज, फॅशन्स या सार्‍यांचं काळाच्या ओघात बदलत जाणारं रुप चित्रपटांमधून नक्कीच जाणवेल असं …

Read More »

गर्भरेशमी स्वरांचा सन्मान

भारतरत्न लता मंगेशकर पुरस्काराने अनुराधाताईंच्या गर्भरेशमी स्वरांना गौरवण्यात येणार आहे याचा मनापासून आनंद होत आहे. लतादीदी आणि आशाताई या दोन अजोड आणि जगामध्ये कुठंही न आढळणार्‍या वैशिष्ट्यांमध्ये टिकून राहात आपला वेगळा आवाज निर्माण करण्याचं आव्हान पेलताना अनुराधा पौडवाल यांनी नक्कीच मेहनत घेतली असणार. जवळपास 40 संगीतकारांकडे 300 हून अधिक गाणी आम्ही एकत्र केलेली आहेत. त्या काळात मी त्यांचं समर्पण, शब्दांवरचं …

Read More »

सिनेसृष्टीची पोस्टरबाजी

हॉलिवूड किंवा बॉलिवूडचे असो, चित्रपट हे केवळ जाहीरातबाजी आणि प्रचारामुळे चालतात, हे सत्य नाकारता येत नाही. पूर्वी चित्रपटाचा प्रसार आणि प्रचार हा केवळ पोस्टरच्या माध्यमातून व्हायचा. आजही तितक्याच आक्रमकतेने पोस्टरबाजी, जाहीरातीबाजी होते. अर्थात काळानुसार जाहीरातबाजीचे स्वरुप बदलले आणि स्रोत बदलले. भारतीय चित्रपटाच्या पोस्टरला सुमारे शंभर वर्षाचा इतिहास आहे. पूर्वी एक पोस्टर तयार करण्यासाठी कलाकाराला बरेच दिवस लागायचे. आजघडीला मात्र काही …

Read More »

सलाम महानायका…

अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या ‘कल्कि 2098 एडी’ या चित्रपटामधील अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाची खूप चर्चा झाली. समीक्षकांच्या मते, अमिताभ बच्चन या चित्रपटात नसते तर त्याने बॉक्स ऑफिसवर मान टाकली असती. खरोखरच अमिताभ बच्चन यांना केवळ अभिनेता नाही तर अभिनयाची ‘पाठशाला’ म्हणजे अभिनयाचे उगमस्थान म्हणता येईल. विशेषत: सत्तरी ओलांडल्यानंतरही अमिताभ बच्चन नव्या कलाकारांसमवेत काम करताना अभिनयाची नवनवीन उंची गाठत आहेत. अमिताभ बच्चन …

Read More »

पडद्यावरुन हरपतंय सामाजिक ऐक्य

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशात जातीय, धार्मिक सलोखा आणि ऐक्य प्रस्थापित करण्याचे मोठे आव्हान होते. विखुरलेल्या समाजाला एकसंध करण्याची मोठी कामगिरी पार पाडायची होती. यामध्ये चित्रपटांनीही मोठी भूमिका निभावली. कृष्णधवलच्या जमान्यापासून 1980 च्या दशकांपर्यंत सामाजिक सद्भाव, जातीय आणि धार्मिक ऐक्य, सलोख्याचा संदेश देणार्‍या चित्रपटांची रेलचेल असायची. नंतरच्या काळातही अशा प्रकारचे चित्रपट येत राहिले; पण आता अशा कथानकांना फारसे महत्त्व दिले जात नाही. कारण …

Read More »

कहाणी अष्टपैलू नायिकेची

फर्ज, रॉकी, बॉबी आणि लव्ह स्टोरीसारख्या गाजलेल्या अनेक चित्रपटात काम करणार्‍या अरुणा इराणी या दमदार अभिनयासाठी ओळखल्या जातात. अरुणा यांनी इंडस्ट्रीमध्ये सहा दशकांपेक्षा अधिक काळ काम केले. हिंदी, कन्नड, मराठी आणि गुजराती भाषेत पाचशेपेक्षा अधिक चित्रपटात काम करणार्‍या अरुणा इराणी यांच्या अभिनयाची ताकद लक्षात येते. फिल्मफेअर अवॉर्डसमध्ये सर्वोत्तम सहायक अभिनेत्रीच्या श्रेणीत त्यांना विक्रमी दहावेळेस नामांकन मिळाले होते. 1985 मध्ये ‘पेट …

Read More »

अविश्वसनीय कथेत गुरफटलेला मुंजा

आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘मुंजा’ हा हिंदी भाषेतील चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी झाला आहे. हा चित्रपट कोकणच्या पार्श्वभूमीवर बेतलेला हॉरर कॉमेडी चित्रपट. असे असले तरी हा चित्रपट पाहणारे प्रेक्षक मुंजाला सिरियसली घेत नाहीत, आणि हीच जमेची बाजू मुंजाच्या यशासाठी पथ्यावर पडणारी ठरली आहे. कितीही वैचारिक मतभेद असले तरी आणि कौटुंबिक कलह असला तरी कोकणातला माणूस आपल्या संकटात सापडलेल्या …

Read More »