लेख-समिक्षण

सिने समिक्षण

प्रतीक्षा संगीतप्रधान चित्रपटांची

भारतीय चित्रपटसृष्टी आणि संगीत यांचे नाते अतूट आहे. सुरुवातीपासूनच भारतीय सिनेमांमध्ये संगीताला अनन्यसाधारण महत्त्व मिळाले आहे. आजही चांगल्या चाली, हृदयस्पर्शी गीते आणि भावनिक सादरीकरण असलेले संगीतप्रधान चित्रपट प्रेक्षकांना भावतात. मात्र, अलीकडच्या काळात असे चित्रपट कमी होत चालले आहेत. याचे एक कारण म्हणजे रोमँटिक चित्रपटांची कमतरता, ज्यामध्ये प्रसंगानुरूप उत्कृष्ट सूररचना होते. त्याचबरोबर, आता दिग्दर्शकांमध्ये संयमाची कमतरताही जाणवते. मधुर संगीताचा तो सोन्याचा …

Read More »

नायकांचा विवाहमहिमा

बॉलिवूडमध्ये प्रेम आणि नाती नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहेत. काही नाती दीर्घकाळ टिकतात, तर काहींमध्ये दुरावा निर्माण होतो. अनेक प्रसिद्ध कलाकारांनी आपल्या आयुष्यात एकाहून अधिक वेळा विवाह केले आहेत. काहींनी प्रेमासाठी, काहींनी वैयक्तिक आयुष्यातील संघर्षांमुळे, तर काहींनी आयुष्याला नवा सुरुवात देण्यासाठी दुसर्‍या लग्नाचा निर्णय घेतला आहे. सध्या बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणार्‍या आमीर खान याच्या नव्या प्रेमाची चर्चा सुरू …

Read More »

जाने कहाँ गये वो दिन…

प्यार हुआ, इकरार हुआ है, प्यार से यह दिल डरता है क्यू… हे गीत ऐकताना मुसळधार पावसात एकाच छत्रीखाली असलेले राजकपूर आणि नर्गिस यांची जोडी डोळ्यासमोर येते. प्रामुख्याने बॉलिवुडपटात आतापर्यंत प्रेमावर आधारलेली गाणी, कथानक हे हिटचा फॉर्म्युला राहिले आहे. राजकपूरपासून रणबीरकपूरपर्यंत आणि नर्गिसपासून दीपिका पदुकोनपर्यंतच्या कलाकारांनी प्रेक्षकांसमोर प्रेमाचे अनोखे रंग दाखवून छाप पाडली आणि त्याल प्रोत्साहित केले. पण आता हे …

Read More »

एकतर्फी प्रेमाची रुपेरी गोष्ट

सुरुवातीच्या काळापासूनच पटकथेत प्रेमकथेवर भर दिला गेला. पटकथा कोणतिही असो, यात प्रेमाचा विषय राहिला आहे. एवढेच नाही तर युद्धकथा असो किंवा दरोडेखोरांचा थरार असो यासारख्या चित्रपटातही प्रेम फुलताना दाखविले आहे. दिग्दर्शकाने तो तात्पुरताच नाही तर शेवटपर्यंत टिकवला आहे. पटकथेचा मुळ गाभा असलेल्या प्रेमकथेत प्रेम अणि प्रेमिकेची मध्यवर्ती भूमिका असते तेव्हा अशा कथानकात फारसे अडथळे नसतात. मात्र एकतर्फी प्रेम असेल तर …

Read More »

सुरेलपणा मागे, ग्लॅमरसता पुढे

सार्वजनिक कार्यक्रमात गायक किंवा गायिकांनी नटून थटून गाणे म्हणणे ठीक आहे. परंतु केवळ प्रेक्षकांवर छाप पाडण्याच्या प्रवृत्तीने गायकांच्या प्रतिभेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सध्याच्या काळात नवोदित गायक किंवा गायिका या आवाजापेक्षा ग्लॅमरसतेमुळे अधिक चर्चेत राहताना दिसतात. याउलट जुन्या जमान्यातील गायक आणि गायिकांचा भर साधेपणावर असायचा आणि त्यांचे सर्व लक्ष मेहनतीकडे, सरावाकडे असायचे.गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना तर या चर्चेपासून खूपच …

Read More »

त्रिवेणी संगमावर तारकांची मांदियाळी

प्रयागराज येथील ऐतिहासिक महाकुंभमेळा शेवटच्या टप्प्यात आला आहे. गेल्या महिनाभरापासून प्रयागराजच्या संगमावर पवित्र स्नान करण्यासाठी जगभरातून कोट्यावधी भाविकांचा ओघ सुरू आहे. सामान्यांपासून ते गर्भश्रीमंत आणि सेलिब्रिटी लोक प्रयागराज येथे दाखल होत असून अध्यात्माचा अनुभव घेत आहेत. एरवी पडद्यावर चमकणारे तारकामंडळ संगमतीरावर धार्मिक श्रद्धा आणि भावना जोपासताना दिसत आहे. एकार्थाने धर्म आणि श्रद्धा याचा अनोखा संगम साधत प्रयागराज येथील महाकुंभमेळा भव्यदिव्यतेने …

Read More »

देवीयों और सज्जनो…

भरपूर मसाला असणार्‍या कौटुंबिक कथानकांवर आणि पौराणिक साहित्यावर आधारीत मालिकांनी प्रदीर्घ काळ छोट्या पडद्यावर राहण्याचा विक्रम केल्याची अनेक उदाहरणे आहेत; परंतु सलग अडीच दशकं टिव्हीवर चालणारा ‘कौन बनेगा करोडपती’ अर्थात केबीसी हा कदाचित एकमेव गेम शो असावा. एखादी मालिका टिव्हीवर सुरू असेपर्यंतच ती प्रेक्षकांच्या ध्यानात राहते. पण केबीसी याला अपवाद ठरले. वर्षांत दोन ते अडीच महिने या कार्यक्रमाचे प्रसारण होते …

Read More »

ममताबाईंचा संन्यास

बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी सध्या चर्चेत आहे. याचे कारण ममताबाईंनी अचानक संन्यास पत्करण्याचा निर्णय घेतला असून महाकुंभात तिला किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर करण्यात आले आहे. ही घोषणा झाल्यापासून अनेकांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. ममताबाईंची एकूण कारिकर्द पाहिल्यास अभिनयापेक्षा तिच्या अंडरवर्ल्डशी असणार्‍या संबंधांची चर्चा अधिक झाली. छोटा राजनसोबतच्या तिच्या संबंधांचे गूढ कायम राहिले असले तरी ड्रग्जच्या जगात नंबर वन खेळाडू म्हणून ओळखल्या …

Read More »

प्रेक्षक, थिएटर…सारं बदललं!

सिनेमनोरंजनाचा खरा आनंद 70 आणि 80 च्या दशकात सिनेमागृहात जाऊन चित्रपट पाहणार्‍या प्रेक्षकांनी घेतला. तेव्हा पहिल्या दिवशी पहिला शो पाहण्याचा जो जोश होता, त्याची आज कल्पनाही करता येणार नाही. शोच्या दोन तास आधी तिकीट खिडकीवर लागणारी भली मोठी रांग, तिकीट काढण्यासाठीची धडपड, प्रसंगी वादावादी-हाणामारी, ब्लॅकने होणारी तिकिट विक्री, हॉलमध्ये प्रवेश करण्यासाठीची धडपड या सर्व गोष्टी आता इतिहासजमा झाल्या आहेत. मल्टिप्लेक्सने …

Read More »

हृदयाचा ठाव घेणार्‍या चित्रपटांची प्रतीक्षा

अ‍ॅनिमल, पुष्पा पहिला आणि दुसरा यासारखे चित्रपट पाहताना डोकं गरगरल्याशिवाय राहत नाही. तरुणाईचे काही प्रमाणात मनोरंजन होत असलेही, परंतु आपण कशासाठी जातो आणि बाहेर काय घेऊन पडलो, याचा थांगपत्ता लागत नाही. हाऊसफुल्लचे बोर्ड काही दिवसापुरती असतात आणि नंतर चॅनेलवर झळकत त्या चित्रपटाती इतिश्री होते. कोठे गेला धर्मेंद्र यांचा दमदार अभिनय, कोठे गेला तो अँग्री यंग मॅनवाला अमिताभ आणि कोठे गेली …

Read More »