आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील चित्तेम सुधीर यांनी अवघ्या 50 हजार रुपयांच्या भांडवलातून सुरू केलेल्या इडली व्यवसायाला आज मोठे यश मिळाले आहे. पारंपरिक इडलीला भरडधान्यांची जोड देऊन त्यांनी तयार केलेला आगळावेगळा पदार्थ ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे. विशेष म्हणजे, या व्यवसायातून स्वतःची आर्थिक प्रगती साधतानाच त्यांनी आदिवासी भागातील शेतकऱ्यांसाठीही उत्पन्नाचा नवा मार्ग खुला केला आहे. कृषी अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर सुधीर यांनी …
Read More »अपरिहार्य ‘कपात ’
महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या एका निर्णयाप्रमाणे येत्या 16 ऑक्टोबरपासून राज्यात सर्वत्र दहा टक्के पाणीकपात केली जाणार आहे. राज्यातील ग्रामीण भागाला सध्या दुष्काळाचा तीव्र चटका बसत असतानाच निर्णयाप्रमाणे आता राज्य सरकारच्या या राज्यातील नागरी भागांमध्येही पाणीकपात केली जाणार आहे. हा निर्णय अत्यंत व्यवहारी आणि स्वागतार्ह असाच मानावा लागेल. कारण राज्य सरकारने गेल्या आठवड्यात जेव्हा राज्यामध्ये दुष्काळ जाहीर केला, तेव्हा 75 टक्क्यांपेक्षा जास्त …
Read More »निर्भयतेची हमी कधी?
स्त्री ही समाजाचा अर्धा भाग आहे, हे केवळ भाषणात सांगण्याचे तत्त्व नाही; तर तिच्या दैनंदिन जगण्यात, प्रवासात आणि अस्तित्वात ते सुरक्षिततेच्या रूपात प्रतिबिंबित होणे ही कोणत्याही सुसंस्कृत लोकशाहीची पहिली अट असते. सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच राजधानी दिल्ली-एनसीआरमधील महिलांवरील अत्याचारांच्या संदर्भात केलेली टिप्पणी केवळ एका प्रदेशापुरती मर्यादित नसून, संपूर्ण देशाच्या व्यवस्थेला आरसा दाखवणारी आहे. रात्रीच्या अंधारात रस्त्यावरून चालणारी असो वा गर्दीच्या मेट्रो …
Read More »जंतर मंतरवर पुन्हा रणभूमी
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश यांच्या राजीनाम्याची मागणी करीत देशातील सर्व विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने दिल्लीच्या जंतर मंतरवरून संघर्ष सुरू केला आहे. त्याआधीच तरुणांच्या कॉक्रोच जनता पक्षाने 2 ऑक्टोबरपासून रणशिंग फुंकले आहे. मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी गनिमी कावा करीत आकाशवाणीमध्ये ठिय्या आंदोलन केल्यानंतर, दुसऱ्या दिवशी बुधवारी पुन्हा राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण कमालीचे तापले. विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ …
Read More »दुष्काळात दरवाढीचा तेरावा
उत्सवाचा हंगाम बाजारात नवी उमेद, उत्साहाचे वातावरण आणि घराघरांत आनंदाची पर्वणी घेऊन येतो. नागरिक खरेदीचे नियोजन आखतात, बाजारपेठा ग्राहकांच्या स्वागतासाठी सज्ज होतात आणि व्यापारी उलाढाल वाढण्याची आस धरून बसतात. परंतु यंदाच्या सणासुदीच्या आनंदावर वाढत्या महागाईचे सावट असतानाच आता महागणाऱ्या कर्जांमुळे नवा भार वाढणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकतीच पतधोरण आढाव्यात रेपो दरात पाव टक्क्यांची म्हणजे 0.25 टक्के वाढ करून …
Read More »बिकट काळाचा घंटानाद
अर्थकारणाची सगळी चक्रे सध्या उलट्या दिशेने सुरू आहेत. केवळ सरकारसाठी नाही, तर सामान्य नागरिकांच्या दृष्टीनेही काळ आता सोपा राहिलेला नाही याचे संकेत मिळत आहेत. गेले आठ आठवडे शेअर बाजार रोज घसरतो आहे, गुंतवणूकदारांची अक्षरशः धूळधाण उडत आहे. आता सोमवारी काहीसा बाजार वधारलेला असला, तरी एकूण लक्षण अजून काही ठीक दिसत नाही. गेल्या आठ आठवड्यात शेअर बाजाराची जी घसरण झाली त्यातून …
Read More »जान्हवीने केली बिसलेरीने आंघोळ
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकर सध्या तिच्या एका अजब आणि रंजक किस्स्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. एका मराठी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिला चक्क बिस्लेरीच्या पाण्याच्या बाटल्या मागवून अंघोळ करावी लागली होती. एका मुलाखतीदरम्यान जान्हवीने स्वतः हा भन्नाट अनुभव शेअर केला असून तिच्या या वक्तव्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. संवेदनशील त्वचा आणि बदलत्या वातावरणाचा थेट …
Read More »सहजतेचा ‘अनंत’ ठसा
ज्येष्ठ अभिनेते-कलावंत अनंत नाग यांच्या प्रदीर्घ अभिनयप्रवासाचा अलीकडेच दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. रंगभूमीच्या तालमीतून घडलेला, समांतर सिनेमाच्या वाटेने हिंदी प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेला आणि कन्नड चित्रपटसृष्टीत पाच दशकांहून अधिक काळ स्वतःची जागा टिकवून ठेवलेला कलावंत म्हणून त्यांची सिनेरसिकांना ओळख आहे. अभिनयाच्या प्रदीर्घ वाटचालीत त्यांनी पडद्यावर अनेक माणसे उभी केली; पण प्रत्येक वेळी त्या माणसाच्या मागे स्वतःला थोडेसे लपवले. कदाचित …
Read More »पॉलिमर सायन्समधील करिअरसंधी
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आज अनेक पारंपरिक पदार्थांची जागा आधुनिक, हलके, टिकाऊ आणि विशिष्ट गुणधर्म असलेल्या पदार्थांनी घेतली आहे. त्यामध्ये पॉलिमरचा वाटा मोठा आहे. प्लास्टिक, रबर, तंतू, चिकट पदार्थ, रंग, औषधनिर्मितीपासून वाहन आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगापर्यंत पॉलिमरचा वापर वाढत आहे. त्यामुळे पॉलिमर विज्ञान आणि पॉलिमर अभियांत्रिकी या क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची मागणीही वाढत आहे. पॉलिमर म्हणजे अनेक लहान रेणूंच्या साखळ्यांपासून तयार होणारे …
Read More »नवीन कपडे धुताना…
नवीन कपडे खरेदी केल्यावर एक चिंता असते ती म्हणजे हे कपडे धुताना त्यातून जाणारा रंग. विशेषतः गडद रंगाचे कपडे असल्यास ते धुताना नाकी-नऊ येतात. एक तर या कपड्यांचा रंग जातो आणि त्यात तो बाकीचे जे इतर कपडे धुवायला घेतलेले असतात त्यांना देखील लागतो. रंग गेल्यामुळे नवे कपडे दुसऱ्या दिवशीच जुने वाटू लागतात. तसेच इतर कपड्यांना नवीन कपड्यांचा रंग लागल्यामुळे ते …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र