2020 मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइम व्हीडिओवर लाँच झालेल्या ’पाताल लोक’ या सीरिजला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. तेव्हापासूनच या सीरिजचा दुसरा सीझन कधी सुरू होणार याबाबत सातत्याने प्रेक्षकांकडून विचारणा केली जात होती. आता 4 वर्षांनी प्रेक्षकांची प्रतिक्षा संपणार आहे. काही दिवसांपूर्वीच सीरिजच्या सीझन 2 चा प्रोमो समोर आला होता. आता पाताल लोक 2 च्या रिलीजची अधिकृत तारीख समोर आली …
Read More »चिंतनशील दिग्दर्शकाचा निरोप
चित्रपटाच्या माध्यमाचा वापर समाजाला आरसा दाखविण्यासाठी करणार्या मोजक्या दिग्दर्शकांमध्ये श्याम बेनेगल यांचा समावेश होतो. बॉलिवूडच्या मुख्य प्रवाहातील चित्रपटांमधून समाजातील कल्पनाशक्ती निश्चित दिसली. मात्र, कलात्मक चित्रपट प्रेक्षकांना अशा दुनियेत घेऊन गेले, जिथे कॅमेरा फारसा पोहोचला नव्हता, ज्या जीवनाकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात होते. या समांतर चित्रपटांचा प्रारंभ सत्यजित राय यांच्यामुळे झाला, परंतु दीर्घकाळ ही पालखी बेनेगल यांच्याच खांद्यावर राहिली. समाजाला त्यांनी …
Read More »व्हॉटसअॅपवर बॅकअप घेताना…
आजघडीला सर्वच मंडळी व्हॉटसअप वापरणे महत्त्वाचे समजतात. कारण व्हॉटसअप हे केवळ चॅटिंगचे माध्यम राहिले नसून महत्त्वाच्या निरोपासाठी देखील त्याचा वापर उपयुक्त ठरत आहे. मग ते काम सरकारी असो किंवा खासगी असो, संबंधितांपर्यंत थेट संदेश पाठवण्याचे प्रभावी माध्यम म्हणून याकडे पाहिले जात आहे. म्हणूनच व्हॉटसअपची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लोकांची वाढती रुची लक्षात घेता व्हॉटसअप देखील नवनवीन फिचर सातत्याने आणत …
Read More »सौंदर्यप्रसाधने वापरताय?
आजच्या युगात सुंदर दिसण्यासाठी स्त्री असो वा पुरुष, प्रत्येकजण सौंदर्यप्रसाधने वापरत असतात. भारतातील सौंदर्यप्रसाधनांची बाजारपेठ सुमारे 800 कोटी रुपयांहून अधिक आहे. पण यापैकी बहुतेक सौंदर्य प्रसाधने बनवण्यासाठी रसायनांचा वापर केला जातो. यामुळे हार्मोनल सिस्टिममध्ये बिघाड, त्वचा संक्रमण यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. याशिवाय या कॉस्मेटिक उत्पादनांचा दीर्घकाळ वापर केल्याने त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढतो. त्यामुळे ही ब्युटी केअर प्रॉडक्ट्स वापरताना विशेष काळजी …
Read More »वातावरणरहित बाह्यग्रहाचा शोध
खगोलशास्त्रज्ञांनी आता पृथ्वीच्या आकाराच्या अशा ग्रहाचा शोध लावला आहे, ज्याचे वातावरण त्याच्या तार्यापासून येणार्या रेडिएशनने नष्ट करून टाकले आहे. अर्थातच, अशा ग्रहावर जीवसृष्टीची शक्यता नाही. मात्र, तरीही संशोधकांना या ग्रहामध्ये रस आहे. याचे कारण म्हणजे त्यांना आपल्या सौरमालिकेबाहेरील एखाद्या ग्रहाची भूगर्भीय रचना जाणून घेण्यासाठी या ग्रहाची मदत होऊ शकते. या बाह्यग्रहाचे नाव ‘स्पेक्युलूस-3 बी’ असे आहे. हा खडकाळ पृष्ठभूमीचा ग्रह …
Read More »एका सिएची यशोकहाणी
भारतामध्ये प्रत्येक वर्षी अनेक विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असतात. त्यातील अनेकांना सहज यश मिळते; तर काहींना खूप मेहनत घ्यावी लागते. भवताली मेहनतीतून यशाची शिखरे गाठणार्या अनेक व्यक्ती दिसतात. त्यातून आपण प्रेरणा घ्यायची असते. अशीच एक प्रेरक गाथा आहे यंदाच्या चार्टर्ड अकौंटंट अर्थात सनदी लेखापाल या कठीण परीक्षेत यश मिळवणार्या एका शेतकरी कुटुंबातील तरुणाची…. बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील बेलौन या …
Read More »नैतिक अधःपतन
महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात बालकांचे लैंगिक शोषण आणि त्यातून होणार्या हत्या या समाजाच्या नैतिक अध:पतनाचे आणि व्यवस्थेच्या अपयशाचे भीषण दर्शन आहे. राजगुरुनगरमध्ये दोन चिमुकल्या सख्ख्या बहिणींवर झालेल्या अत्याचाराने आणि त्यानंतर त्यांचे मृतदेह ड्रममध्ये लपवण्यात आल्याच्या अत्यंत अमानुष घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. वासना भागवण्यासाठी लहान बालिकांची अतिशय अमानुष हत्या करणारा नराधम व्यवस्थेच्या नाकावर टिच्चून मोकाट फिरतोच कसा? त्याच्या काही दिवस …
Read More »जा एकदाची..!
जगात येण्यासाठी संघर्ष, जगात आल्यावर तिरस्कार, घृणा, अवहेलना, भीती, धसका, कुचंबणा, निराशा… पावलोपावली! तरीसुद्धा चिकाटीनं जगतेच आहेस; आम्हाला जन्माला घालतेच आहेस. खरंच, कमाल आहे तुझी! पण स्वतःसारखी जननी जन्माला घालण्याची परवानगी तुला कुणी दिली? पहिल्यांदा… दुसर्यांदा… आता तिसर्यांदाही मुलगीच झाली? मग तू जगून काय उपयोग? काय अर्थ तुझ्या जगण्याला? वंश चालवणारा, प्रॉपर्टी सांभाळणारा किंवा मोडून खाणारा नर तुला जन्माला घालता …
Read More »तारक्कासह 11 जहाल नक्षलवादी शरण
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसला. मागील 38 वर्षापासून नक्षल चळवळीत सक्रिय असलेली जहाल नक्षलवादी, दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीची सदस्य आणि नक्षल्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य भूपती याची पत्नी विमला सिडाम उर्फ तारक्का हिच्यासह 11 नक्षलवाद्यांनी बुधवारी गडचिरोली पोलीस मुख्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. त्यात 1 डीकेएसझेडसीएम, 3 डीव्हीसीएम, 2 एसीएम व 4 दलम …
Read More »इस्त्रोच्या भरारीचा अन्वयार्थ
इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे नवीन स्पेडेक्स मिशन ही केवळ एक तांत्रिक उपलब्धी नाही तर ते अंतराळातील भारताचे योगदान देखील दर्शवते. ही एक नवीन उपलब्धी आहे. या मिशनचे मुख्य कार्य दोन अंतराळ यानांना डॉक करणे (जोडणे) हे आहे. अंतराळ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताचे कौशल्य वाढवण्यासाठी ते उपयुक्त ठरेल. डॉकिंग तंत्रज्ञान ऊर्जा पर्यायांवर तसेच उच्च-तंत्रज्ञान मार्गदर्शन प्रणालींवर आधारित आहे. केवळ सध्याच्या मोहिमांसाठीच महत्त्वाचे …
Read More »