भारताचा निष्णात फिरकीपटू आर. अश्विन याने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. उत्तम फलंदाजी आणि गोलंदाजीमुळे अश्विनने भारतीय संघाला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. त्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत. तो कारकिर्दीच्या सुरुवातीला ओपनिंग आणि नंतर मध्यमगती गोलंदाजी करायचा. आर अश्विनचा जन्म 17 सप्टेंबर 1986 रोजी चेन्नईच्या दक्षिणेस असलेल्या मैलापूर शहरात झाला. त्याचे वडील रविचंद्रन हे क्लब क्रिकेटर होते आणि ते वेगवान गोलंदाजी करायचे. अश्विन लहानपणापासून अभ्यासात चांगला आहे. चेन्नईतून शालेय शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी एसएसएन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून आयटीमध्ये पदवी प्राप्त केली आहे. नंतर त्याने अभियांत्रिकी सोडून क्रिकेटमध्ये करिअर करण्याचा विचार केला आणि तो जागतिक क्रिकेटमध्ये प्रसिद्ध झाला.अश्विनने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये ओपनिंग गोलंदाजी केली. बालपणीचे प्रशिक्षक सीके विजय यांनी त्याला ऑफ-स्पिन गोलंदाज बनण्याचा सल्ला दिला. अश्विनची उंची 6 फूट 2 इंच आहे आणि हे लक्षात घेऊन विजय यांनी त्याला ऑफ स्पिनचा सल्ला दिला. 16 वर्षांखालील क्रिकेट खेळताना अश्विनला एका सामन्यात दुखापत झाली. त्याला धावताना खूप त्रास होत होता. ही बाब लक्षात घेऊन प्रशिक्षकाने त्याला फिरकी गोलंदाजी करण्याचा सल्ला दिला. अश्विनने 2006 मध्ये हरियाणाविरुद्ध कारकिर्दीतील पहिला देशांतर्गत सामना खेळला आणि पाहता-पाहता तो विश्वविख्यात फिरकी गोलंदाज बनला.
भारतीय संघ मायदेशात खेळत असताना अश्विन संघाबाहेर ही संकल्पनाच सहन होत नव्हती. अश्विनलाही क्रिकेटपासून स्वतःला दूर ठेवणे जमत नव्हते. आपला टप्पा चुकणार नाही, याची त्याला खात्री असल्याने तो गोलंदाजीत प्रयोग करण्यास कायम तयार असे.
राष्ट्रीय सतरा वर्षांखालील शिबिरातील स्थान हिंदी येत नसल्यामुळे आपण गमावणार असे दिसू लागल्यावर तो धास्तावला होता. मात्र त्यावेळी तो फलंदाज होता. तो पुढे केवळ हिंदी शिकला नाही तर त्याने फिरकी गोलंदाजीची कला आत्मसात केली. त्याचे कौशल्य, झोकून देण्याची वृत्ती, शिस्त जबरदस्त होती. तो 13 वर्षांत एकदाही मायदेशातील कसोटीस मुकला नाही. कदाचित अश्विन त्यामुळेच कायम संघाची ताकद होता हे खरे नाही काय?
Check Also
जिद्दीच्या बळावर यशाला गवसणी
तमिळनाडूतील एका सर्वसामान्य तरुणानं सुरुवातीला 25 हजार रुपयांची नोकरी नाकारून अवघ्या 10 हजार रुपयांची इंटर्नशिप …
पांचजन्य वृत्तपत्र