गुन्हेगारीचा थरार

अभिनेता टायगर श्रॉफवर अलीकडेच तो कारमध्ये असताना गोळ्या झाडल्या गेल्या. सुदैवाने टायगर थोडक्यात बचावला, पण त्याचा ड्रायव्हर आणि एक रिक्षाचालक जखमी झाले. मुंबई पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या काही तासांतच राजस्थानच्या कोटा स्थानकावरून तीन संशयितांना जेरबंद केले. देशातील अथवा अन्य कुठल्याही पारंपरिक गुन्हेगारीचा इतिहास पाहिला तर गुन्हेगार गुन्हा केल्यानंतर लपून राहतात, जेणेकरून पोलिसांच्या हाती पुरावे लागणार नाहीत. पण आजच्या …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचा विरोधी पक्षांना स्पष्ट इशारा

नवी दिल्लीतील राजकीय संघर्षाने थेट देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या दारावर धडक दिल्यानंतर आता न्यायव्यवस्थेनेही यावर अत्यंत कठोर आणि स्पष्ट भूमिका घेतली आहे. निवडणूक आयोगाच्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने काढलेला मोर्चा आणि त्यानंतर न्यायालयाच्या आवारात उडालेला गोंधळ, यावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी तीव्र …

Read More »

मतािधकाराचा बळी नको!

देशातील 31 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (एसआयआर) प्रक्रियेतून तब्बल 13 कोटी 27 लाख मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. या प्रक्रियेविरोधात निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने 16 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत नोव्हेंबरपासून वार्षिक विशेष पुनरीक्षण करण्याची घोषणा केली आहे. मात्र, यापूर्वीच्या प्रक्रियेत नावे वगळलेल्या पात्र मतदारांना पुन्हा नोंदणीसाठी अर्ज करावा लागणार असल्याने अनेक …

Read More »

निर्णय स्वागतार्ह; पण…

लहान मुलांनाही इंटरनेटचा वापर करण्याचा मूलभूत अधिकार असून त्यांना त्यापासून दूर केले जाऊ शकत नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान दिला आहे. यामुळे या विषयावरील चर्चेला जरी पूर्णविराम मिळाला असला तरी न्यायालयाच्या या निर्णयानंतर मुलांच्या लहान हातातील उपकरणांमध्ये इंटरनेटचा वापर सकारात्मक पद्धतीने कसा करावा, हे एक आव्हान मात्र कायम राहणार आहे. मुलांच्या इंटरनेट वापरावर बंदी घालण्यात आली तर …

Read More »

विजय आणि रश्मिकाचा ‌‘रणबाली‌’

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडा आणि आघाडीची अभिनेत्री रश्मिका मंदाना ही बहुचर्चित जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार असून त्यांच्या आगामी ‌’रणबाली‌’ या भव्य चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील ब्रिटिश सत्तेच्या जुलमी राजवटीची आणि त्याविरुद्ध पेटून उठलेल्या स्थानिक जनतेच्या संघर्षाची ही ऐतिहासिक पार्श्वभूमीवर बेतलेली कथा आहे. ट्रेलरमधील अंगावर काटा आणणारे युद्धप्रसंग, भव्य देखावे आणि ताकदीचे …

Read More »

सिनेसृष्टीतील नवे स्थित्यंतर

भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात प्रेक्षकांच्या बदलत्या अभिरुचीने नेहमीच नव्या युगाची पायाभरणी केली आहे; मात्र सध्या चित्रपटगृहांमध्ये जाणवणारे स्थित्यंतर अभिरुचीपुरते मर्यादित नसून ते भारतीय रसिकांच्या मानसिक सीमांचा विस्तार अधोरेखित करणारे आहे. मुंबईत आकाराला येणारा हिंदी सिनेमा म्हणजे अवघ्या देशाचे प्रतिनिधित्व, हे वर्षानुवर्षांचे पारंपरिक समीकरण आता मोडीत निघाले आहे. भाषेच्या भिंती ओलांडून दाक्षिणात्य चित्रपटांच्या आशयाला आणि तिथल्या कलाकारांना देशभरातील रसिक ज्या आत्मीयतेने स्वीकारत …

Read More »

प्रेमात पडला आहात?

कधी एखादी व्यक्ती सतत आपल्या विचारांत असते? ती दिसली की चेहऱ्यावर नकळत हसू उमटते, तिच्याशी बोलताना शब्द अडखळतात आणि तिच्या आसपास राहण्याची कारणं आपणच शोधू लागतो? जर या प्रश्नांची उत्तरं ‌‘हो‌’ असतील, तर कदाचित तुम्हाला त्या व्यक्तीविषयी आकर्षण वाटत असावं. तरुण वयात अशी भावना निर्माण होणं अगदी स्वाभाविक आहे. एखाद्या व्यक्तीविषयी आकर्षण निर्माण झालं की तिच्याबद्दल वारंवार विचार होऊ लागतो. …

Read More »

इंडक्शनवर अन्न शिजवावे का ?

भारतात सध्या एलपीजी सिलिंडरच्या तुटवड्यामुळे इंडक्शन कुकटॉपची मागणी प्रचंड वाढली आहे. मात्र, वीजेवर चालणाऱ्या या शेगडीबाबत लोकांच्या मनात अनेक शंका आणि अफवा आहेत. इंडक्शनवर शिजवलेले अन्न आरोग्यासाठी सुरक्षित आहे की धोकादायक, असा प्रश्न आजही अनेकांना पडतो. वास्तविक, शास्त्रीय दृष्टिकोनातून इंडक्शनवर स्वयंपाक करणे पूर्णपणे सुरक्षित मानले जाते. यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जेचा वापर केला जातो, जी थेट भांड्याला गरम करते. इंडक्शनमधून बाहेर पडणाऱ्या …

Read More »

कहाणी ‌‘योद्धा मगर‌’ ची

यनासोरच्या युगापूर्वी, सुमारे 240 दशलक्ष वर्षांपूर्वी ट्रयासिक कालखंडात, ब्राझीलमध्ये वावरणाऱ्या एका महाकाय ‌‘योद्धा सरड्याचा‌’ शोध संशोधकांनी लावला आहे. हा शोध डायनासोर पृथ्वीवर वर्चस्व गाजवण्यासाठी येण्यापूर्वीच्या काळातील माहितीतील अंतर भरून काढतो आणि आता आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका यांच्यातील संबंधांवर अधिक प्रकाश टाकतो. हा चिलखतधारी सरपटणारा प्राणी डायनासोरसारखा दिसत असला, तरी तो प्रत्यक्षात आधुनिक मगरींचा पूर्वज आहे. शास्त्रज्ञांनी या प्राण्याला टी. बेलॅटॉर …

Read More »

उकिरड्यावरच्या कोरफडीतून कोट्यवधींची भरारी

संकटातच संधी शोधण्याची दृष्टी ज्याच्याकडे असते, तो मातीचेही सोने करू शकतो, याचा प्रत्यय सातारा जिल्ह्यातील पाडळी गावचे तरुण उद्योजक ऋषिकेश जयसिंग ढाणे यांच्या यशोगाथेतून दिसून येतो. सुमारे दोन दशकांपूर्वी पाडळी परिसरातील शेतकऱ्यांना कोरफडीच्या शेतीतून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष एका व्यापाऱ्याने दाखवले होते. शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने लागवड केली खरी, परंतु खरेदीचे आश्वासन देणारा व्यापारी गायब झाल्याने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला. हताश …

Read More »