डासांचा उपद्रव वर्षभर जाणवत असला, तरी लहान मुले आणि तान्हुल्या बाळांसाठी तो अधिक त्रासदायक ठरतो. शिशूंची त्वचा अत्यंत संवेदनशील आणि कोमल असल्याने त्यांना डास चावण्याचा धोका जास्त असतो. हे डास डेंग्यू, चिकुनगुनिया किंवा मलेरिया यांसारख्या गंभीर आजारांचे वाहक असू शकतात. अशा वेळी लहान बाळांना सुरक्षित ठेवण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय
बाळांसाठी डास प्रतिबंधक उत्पादने निवडताना ती विशेषतः शिशूंसाठी तयार केलेली आणि नैसर्गिक घटकांपासून बनलेली असावीत. ज्या रिपेलेंटस्मध्ये ‘डीईईटी’, अल्कोहोल किंवा कृत्रिम रंगांसारखी घातक रसायने नसतील, अशाच उत्पादनांची निवड करणे सुरक्षित ठरते. सिट्रोनेला किंवा लॅव्हेंडर ऑईल यांसारख्या वनस्पतीजन्य घटकांपासून तयार केलेली उत्पादने बाळाच्या नाजूक त्वचेसाठी सौम्य आणि सुरक्षित असतात.
सौम्य आणि सुरक्षित घटकांना प्राधान्य
डास पळवून लावणारी उत्पादने निवडताना ती नैसर्गिक असावीत आणि त्यातून बाळाच्या त्वचेला कोणतीही जळजळ होणार नाही याची खात्री करून घ्यावी. लेमनग्रास आणि नीलगिरी (युकॅलिप्टस) तेलापासून बनवलेले रिपेलेंट्स मुलांसाठी उत्तम मानले जातात. लेमनग्रासमध्ये डास दूर ठेवण्याचे नैसर्गिक गुणधर्म असतात आणि त्याचा सुगंध बाळांना ॲलर्जी निर्माण करत नाही. नीलगिरी तेलाचेही फायदे अशाच प्रकारचे असतात.
मच्छर प्रतिबंधक पॅचेस आणि फॅब्रिक रोल-ऑन
लहान मुलांच्या कपड्यांवर लावले जाणारे अँटी-मॉस्किटो पॅचेस आणि फॅब्रिक रोल-ऑन हा एक प्रभावी पर्याय आहे. ही उत्पादने खरेदी करताना त्यातील घटक ‘नॉन टॉक्सिक’ आणि नैसर्गिक असावेत. फॅब्रिक रोल-ऑन थेट कपड्यांच्या संपर्कात येत असल्याने ते ‘क्लिनिकली टेस्टेड’ असणे आवश्यक आहे. तसेच, या उत्पादनांमुळे बाळाच्या कपड्यांवर डाग पडणार नाहीत, याचीही काळजी पालकांनी घ्यावी.
बाळाचा पाळणा, बेड किंवा स्ट्रॉलरला मच्छरदाणीने झाकून ठेवणे हा डासांपासून वाचवण्याचा सर्वात सोपा आणि खात्रीशीर मार्ग आहे. मच्छरदाणी निवडताना तिचे कापड किंवा नेट अशा प्रकारची असावी की, ज्यातून हवा खेळती राहील आणि बाळाला गुदमरल्यासारखे वाटणार नाही, मात्र डास किंवा इतर कीटक आत जाणार नाहीत. त्याचप्रमाणे मच्छरदाणीच्या स्वच्छतेकडेही नियमित लक्ष देणे गरजेचे आहे.
Check Also
वाय-फायसाठी क्युआर कोड
आपल्या घरी पाहुणे आल्यावर ते वारंवार आपल्या घरगुती वाय-फायचा पासवर्ड विचारतात आणि तो लांब व …
पांचजन्य वृत्तपत्र