पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये पुन्हा एकदा सर्वांना काटकसर करण्याचा सल्ला दिला आहे. 2047 पर्यंत जर देशाला विकसित राष्ट्र बनवायचे असेल तर काटकसरीच्या उपायांची गरज आहे. हा विषय त्यांनी पुन्हा एकदा समोर आणला आहे. यापूर्वी अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध सर्वोच्च पातळीवर असताना त्यांनी भारतीयांना बचत करण्याचा आणि काटकसर करण्याचा सल्ला दिला होता. तेव्हाची परिस्थिती समजण्यासारखी …
Read More »महिला आरक्षण आणि परिसीमनाची कोंडी
संसदेचे पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी तहकूब झाल्यानंतर महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीशी निगडित परिसीमनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यासाठी सरकार विशेष अधिवेशन बोलावू शकते, अशी चर्चा आहे. सरकारकडून तसे संकेत दिले जात असतानाच काँग्रेससह विरोधी पक्षांनी परिसीमनाच्या प्रश्नावर आधी सर्वपक्षीय बैठक घेण्याची मागणी केली आहे. विशेष अधिवेशन प्रत्यक्षात बोलावले जाते की नाही, यापेक्षा महिला आरक्षणाची अंमलबजावणी आणखी लांबणीवर पडणार नाही, याची …
Read More »विद्यार्थी आंदोलकांवरील गुन्हे रद्द
सर्वोच्च न्यायालयाने आपल्या घटनात्मक ‘अधिकारांचा’ वापर करून, कॉक्रोच जनता पार्टीने पुकारलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांविरुद्ध दाखल केलेले सर्व एफआयआर रद्द केले आहेत. केंद्र सरकारने सरन्यायाधीश सूर्यकांत शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाला 20 ते 25 जुलै दरम्यान दाखल केलेले सर्व एफआयआर रद्द करण्यासाठी आपल्या अधिकारांचा वापर करण्याची विनंती केली होती. न्यायालयाने हे स्पष्ट केले आहे की, दिल्ली, बिहार, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि आसाम, तसेच …
Read More »अर्थव्यवस्थेची दमदार चाल
आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारताच्या जीडीपी वाढीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. एका मुलाखतीत राजन म्हणतात, हे वाढीचे आकडे खरे आहेत का? जर वाढीचे आकडे खरे नसतील, तर मोठ्या अर्थव्यवस्थेबाबतही शंका निर्माण होते. काही अशा विसंगती आहेत ज्यांची चिंता करणं गरजेचं आहे. जसे की आपण इतक्या वेगानं वाढत असू, तर अधिक नोकऱ्या का निर्माण होत नाहीत? आणि चांगल्या नोकऱ्या …
Read More »आरोपांच्या राजकारणाने काय साधणार?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भाजपसोबत आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न राहुल गांधी सातत्याने करीत आले आहेत. आता देशात ‘संविधान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यात संघर्ष सुरू आहे,’ असे सांगून त्यांनी संघावरील टीकेला पुन्हा धार दिली आहे. भाजप आणि संघ संविधानाचा आदर करीत नाहीत, उलट संविधान संपविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, हा त्यांचा जुना आरोपच नव्या स्वरूपात पुढे आला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत …
Read More »कंगना-तापसी वाद पुन्हा पेटला
कंगना रणौत आणि तापसी पन्नू यांच्यातील जुना शाब्दिक संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. काही काळ शांत असलेला हा वाद तापसीच्या एका मुलाखतीनंतर पुन्हा चर्चेत आला. तापसीने केलेल्या वक्तव्याचा संबंध आपल्या आई-वडिलांशी आणि संगोपनाशी जोडत कंगनाने सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. तापसी पन्नू सध्या तिच्या आगामी ‘गांधारी’ चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यस्त आहे. याचदरम्यान एका कार्यक्रमात तिला कंगना रणौतसोबत असलेला जुना …
Read More »फाळणीच्या वेदनेचे रुपेरी प्रतिबिंब
स्वातंत्र्य मिळाले त्याच वेळी देशाच्या फाळणीने लाखो माणसांचे आयुष्य उद्ध्वस्त केले. त्या काळातील दंगली, निर्वासितांचे लोंढे, ताटातूट आणि धर्माच्या नावाने उभ्या राहिलेल्या भिंतींचे चित्रण हिंदी चित्रपटांनी वेगवेगळ्या काळात केले. ‘धर्मपुत्र’ आणि ‘गरम हवा’पासून ‘तमस’, ‘ट्रेन टू पाकिस्तान’, ‘1947 अर्थ’, ‘पिंजर’ आणि ‘गदर’पर्यंत अनेक कलाकृतींनी या विषयाला आपापल्या पद्धतीने हात घातला.- सोनम परब ———————- 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला; …
Read More »‘वन साईज फिटस् ऑल’चा भ्रम
फॅशन ही केवळ कपडे परिधान करण्याची बाब नाही, तर स्वतःची ओळख, व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वास व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम मानले जाते. प्रत्येक व्यक्तीला आपल्या आवडीनुसार पोशाख निवडण्याचे स्वातंत्र्य असावे, असा संदेश फॅशन उद्योग सातत्याने देत असतो. मात्र या चकचकीत जगामागे एक मोठा विरोधाभास लपलेला आहे. वन साईज फिट्स ऑल म्हणजेच एकच आकार सर्वांनाच योग्य ठरतो, ही संकल्पना आजही अनेक ब्रँडच्या उत्पादनांमध्ये …
Read More »‘ओनलीनेस’ कडे पाहताना…
आपल्या डोक्यात अचानक एक नवी कल्पना आली आणि ती मोठ्या आवाजात आपण सांगू शकलो नाही, असा प्रसंग आपल्याही आयुष्यात कधी आला आहे का? त्यावेळी कदाचित आपल्या विचाराला फारसे कोणी गांभीर्याने घेणार नाही. मात्र स्वत:च्या विचाराचा कायम पुरस्कार करणे हे गरजेचे आहे. स्वत:ला कमी न लेखणे आणि भूमिकेवर ठाम राहणे ही बाब व्यक्तिमत्त्व विकासाला आणि प्रतिमा निर्माण करण्यासाठी फायद्याची ठरते. जर …
Read More »नऊ तास खुर्चीत बसताय?
दिवसभर डेस्क जॉब करणाऱ्या लोकांसाठी एक आरोग्यविषयक महत्त्वाचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. रक्तवाहिन्यांचे सर्जन तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही दिवसातील 9 तास खुर्चीवर बसून असाल, तर सायंकाळी 10,000 पावले चालूनही तुमच्या रक्तवाहिन्यांचे (व्हेन्स) झालेले नुकसान भरून काढता येत नाही. रक्ताभिसरण (ब्लड सर्क्युलेशन) हे तुम्ही एकूण किती पावले चालता यावर अवलंबून नसून, तुम्ही किती वारंवार हालचाल करता, यावर अवलंबून असते. जास्त वेळ …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र