नवीन कपडे खरेदी केल्यावर एक चिंता असते ती म्हणजे हे कपडे धुताना त्यातून जाणारा रंग. विशेषतः गडद रंगाचे कपडे असल्यास ते धुताना नाकी-नऊ येतात. एक तर या कपड्यांचा रंग जातो आणि त्यात तो बाकीचे जे इतर कपडे धुवायला घेतलेले असतात त्यांना देखील लागतो. रंग गेल्यामुळे नवे कपडे दुसऱ्या दिवशीच जुने वाटू लागतात. तसेच इतर कपड्यांना नवीन कपड्यांचा रंग लागल्यामुळे ते कपडेसुद्धा खराब होतात. अशा वेळी काय करावं ते सुचत नाही. अनेक जणी ही अडचण दूर करण्यासाठी महागड्या डिटर्जंटचा वापर करून कपडे धुतात; पण तरी सुद्धा रंग जाण्याची समस्या कमी होत नाही. परिणामी, कपड्यांसोबतच महागड्या डिटर्जंटचे ही पैसे वाया गेल्यासारखे वाटू लागते.
अशा वेळी काय करता येईल? महागडे डिटर्जंट न वापरता घरगुती उपाय करून देखील रंग जाण्यापासून आणि तो इतर कपड्यांना लागण्यापासून थांबवला जाऊ शकतो का? हो… कसं ते जाणून घ्या…
सर्वांत पहिली बाब म्हणजे नवीन कपडे धुताना वॉशिंग मशीनमध्ये रंग जाणारे आणि नवीन कपडे कधीच धुवू नका. मशीनमध्ये कपडे मिक्स होऊन धुतले जात असल्याने इतर कपडे खराब होऊ शकतात. तसेच गरम पाण्यात कपडे धुतल्याने कपड्यांचा रंग पाण्यात विरघळतो आणि तो इतर कपड्यांना लागू शकतो. यामुळे नवीन कपडे किंवा गडद कपडे हे थंड पाण्यात धुवा. थंड पाण्यात रंग निघत नाही.
तसेच मीठ आणि तुरटीच्या साहाय्याने रंग स्थिर राहण्यास मदत होते. यासाठी मीठ आणि तुरटीच्या पाण्यात कपडे थोडावेळ भिजत ठेवा आणि त्यानंतर ते थंड आणि स्वच्छ पाण्याने धुवून टाका. असं केल्याने मीठामुळे शरीराला खाज येण्याचा त्रासही होणार नाही.
अनेकदा असं पाहिल जातं घरातल्या महिला कपडे धुताना त्यात व्हिनेगरचा वापर करतात तो यासाठीच असतो.
व्हिनेगर कपड्यांचा रंग टिकवून ठेवण्यास मदत करतो. तसेच कपडे धुताना ज्या कपड्यांचा रंग गडद आणि निघून जाण्यासारखा असतो असे कपडे सुर्यप्रकाशात न सुकवता ते घरात हवे खाली सुकवत ठेवा. सुर्यप्रकाशात कपडे सुकवल्याने कपड्यांचा रंग उडतो आणि कपडे फिके दिसू लागतात.
Check Also
समस्या सोडविण्याची कला शिका
परीक्षेचा ताण असो, नोकरीची चिंता असो, लग्नाची तयारी असो किंवा पैशांची अडचण असो, आयुष्यात प्रत्येक …
पांचजन्य वृत्तपत्र