मुलीच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे. पूर्वी आजी आजोबा हे नातवासाठी खाते सुरू करत असत. मात्र नव्या मागदर्शक सूचनेनुसार केवळ कायदेशीर पालकच (आई वडिल) खाते सुरू करू शकतात आणि बंद करू शकतात. म्हणून आजी-आजोबांनी सुरू केलेल्या जुन्या खात्यांना आई वडिलांच्या नावावर स्थानांतरित करावे लागेल. यासाठी बेसिक अकाउंटचे पासबुक, मुलीचे वय आणि नात्याचा पुरावा, जन्म प्रमाणपत्र आणि …
Read More »गुहेत सापडला अतिप्राचीन पूल
स्पेनच्या एका बेटावरील गुहेत संशोधकांना तब्बल 5600 वर्षांपूर्वीचा मानवनिर्मित पूल आढळून आला आहे. गुहेतील पाण्यावर बांधलेल्या या पुलाने अर्थातच संशोधकांचे कुतूहल वाढवले आहे. स्पेनमध्ये मालोर्का नावाचं एक बेट आहे. येथे एका गुहेत पाण्यात बुडालेला पूल सापडला आहे. हा पूल 5600 वर्षेजुना व मानवनिर्मित आहे. यावरून दोन गोष्टी स्पष्ट होतात. पहिली गोष्ट म्हणजे त्या काळी या गुहेत माणसांचे वास्तव्य होते किंवा …
Read More »संघर्ष हीच यशाची हमी
ही यशोगाथा आहे सीड नायडू या असामान्य तरुणाची. अगदीच सामान्य असलेला सीड आज कोट्याधीश आहे. पण कधीकाळी या तरुणाने घरोघरी जाऊन वृत्तपत्र वाटपाचं काम केलं. आपल्या कुटुंबाला गरिबीतून वर काढण्यासाठी तो परिस्थितीसी झुंजला. त्याने स्वतःचा रस्ता जोखला. त्यावर तो टिकला आणि आज तो कोट्यवधी कंपनीचा मालक आहे. कधीकाळी संघर्षाच्या गर्तेत अडकलेल्या सीड नायडूला आज ओळखीची गरज नाही. सीड प्रोडक्शन या …
Read More »काश्मीरचा पेच
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा बहाल करण्याच्या संदर्भातील प्रस्ताव राज्य विधानसभेत संमत झाला आहे. अलीकडे झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनी मतदारांना जे आश्वासन दिले आहे त्याची त्यांनी पूर्तता केली किंवा त्याचा दिखावा केला एवढाच या खटाटोपाचा अर्थ. त्याचे कारण केंद्र सरकारने जम्मू- काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा बहाल करणारे कलम 370 रद्द केले आहे आणि ते परत …
Read More »जॉनीची प्रेमयात्रा
वन्यजीवाची शिकार करणं हा आपल्याकडे गंभीर गुन्हा मानला जातो. त्यासाठी भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमात विविध अनुसूचींमध्ये वन्यजीवांचे वर्गीकरण केलं गेलंय. हे वर्गीकरण संबंधित प्राणीप्रजातीला असलेला विलुप्त होण्याचा धोका विचारात घेऊन करण्यात आलंय. वन्यजीवांना संरक्षण देणं हा त्यामागील हेतू असून, जंगलात जाऊन शिकार करणं किंवा मानवी वस्तीत शिरलेल्या वन्यजीवाला ठार मारणं हे दोन्ही गंभीर गुन्हे आहेत. उलटपक्षी, एखाद्या पाळीव जनावराने चरण्यासाठी …
Read More »महायुती उमेदवाराच्या बहिणीवर हल्ला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर प्रचारसभा घेतली. त्यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाला लक्ष्य केले. ते म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा कलम 370 लागू करण्याचे काँग्रेसचे प्रयत्न सुरू झाले आहेत. हे षडयंत्र यशस्वी झाल्यास डॉ. बाबासाहेबांचे संविधान पुन्हा काश्मीरबाहेर जाईल. मात्र, ते आम्ही होऊ देणार नाही. राज्यघटना घेऊन फिरणारे फसवे आहेत. त्यांनी काश्मीरमध्ये राज्यघटना लागू होऊ दिली नाही,’ अशी …
Read More »झोल नाही, ‘ सेल्फ गोल ’
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या सहा महिन्यांपासून राजकीय वर्तुळात वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं होतं. महाविकास आघाडी व महायुती यांच्यात थेट झालेल्या लढतीमध्ये कोण जिंकून येणार? कुणाची पीछेहाट होणार? यावरून मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. विशेषत: सत्ताधारी व विरोधी अशा दोन्ही बाजूंना शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमधील विभक्त झालेले गट असल्यामुळे यावेळच्या निकालांबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. पण निकालांनी …
Read More »क्रिकेटच्या राजकारणात पाकिस्तान ‘बोल्ड’
भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने पाकिस्तानात खेळण्यास स्पष्टपणे नकार दिला. सुरक्षा कारणावरून अनेक देशांनी पाकिस्तानचे दौरे रद्द केले आहेत. भारत आणि आयसीसीव्यतिरिक्त ब्रॉडकास्टर्सनी देखील पाकिस्तानवर दबाव आणला आहे. भारतीय संघ पाकिस्तानात येत नसल्याचा मुद्यावरून आकांडतांडव करू नका, असे बजावले आहे. स्पर्धा रद्द झाली तर सर्वाधिक आर्थिक फटका हा पकिस्तानलाच सहन करावा लागेल. भारताच्या मागणीची दखल घेत आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पीओके टूरवर …
Read More »सहजीवनाची सिलव्हर ज्युबली!
बॉलिवूड स्टार माधुरी दीक्षित नेनेच्या लग्नाला 25 वर्षेपूर्ण झाली आहेत. यशस्वी विवाहाबद्दल अभिनेत्रीने तिचे विचार शेअर केले आहेत. तिने लग्नाबाबत बोलतांना कबूल केले की आनंदी आणि यशस्वी भागीदारी करणे सोपे नाही. माधुरीने ऑक्टोबर 1999 मध्ये लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया येथील हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी सर्जन शीराम नेने यांच्याशी विवाह केला. दक्षिण कॅलिफोर्नियातील अभिनेत्रीच्या मोठ्या भावाच्या घरी हे लग्न पार पडले. या जोडप्याने …
Read More »अपार मेहनतीला पर्याय नाही
‘अग बाई अरेच्या’ या चित्रपटामध्ये माझी अगदीच छोटी भूमिका होती.तरीही माझी भूमिका असलेला पडद्यावर आलेला हाच पहिला चित्रपट. पण केदार शिंदेंच्या ‘जत्रा’ चित्रपटामुळं मला सिद्धू म्हणून सर्वदूर ओळख मिळवून दिली. माझं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचलं. किडकीडीत अंगकाठी, सामान्य चेहरा असतानाही प्रेक्षकांनी माझ्यातील अभिनय गुणांवर मनापासून प्रेम केलं याचं अप्रुप वाटतं. घरातून अभिनय क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसताना स्वकष्टाने मी या क्षेत्रात …
Read More »