सध्या बहुचर्चित, बहुप्रतिक्षित ‘रामायर्ण या चित्रपटाच्यानिमित्तान रणीबर कपूरने साकारलेल्या रामाच्या व्येितेखेवरुन वाद सुरू आहेत. वास्तविक कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य, त्याची सिनेकारकिर्द आणि कलाकृतींमधील त्याचा अभिनय याची सांगड घातली जाता कामा नये, असे संकेत आहेत. कारण सिनेमा-नाटक या कलाकृतीमधील व्यक्तिरेखेला कलाकार सार्थपणाने न्याय देतो का, तो ताकदीने साकारतो का इथवरच प्रेक्षकांचा संबंध असतो. पण आपल्याकडे पौराणिक, ऐतिहासिक चित्रपटांच्या निमित्ताने ही सांगड हमखास …
Read More »सुट्टी ‘फलदायी’ ठरण्यासाठी…
दहावी आणि बारावीची परीक्षा म्हणजे शालेय जीवनातील दोन महत्त्वाचे टप्पे. परीक्षांचे दिव्य पार पाडल्यानंतर नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीचा हा काळ विद्यार्थ्यांसाठी एका अर्थाने संभ्रमाचा आणि दुसऱ्या अर्थाने संधीचा असतो. अनेकदा परीक्षा संपली की आता फक्त मौजमजा करायची, असा विद्यार्थ्यांचा कल असतो. मात्र, स्पर्धात्मक युगाचा विचार करता या सुट्ट्यांचा काळ केवळ विश्र्ांतीसाठी न वापरता तो फलदायी कसा ठरेल, याकडे लक्ष …
Read More »जन्मानंतर बाळाचा रंग सावळा का होतो ?
बाळ जन्माला आले की, त्याचे गुलाबी-पांढरे रूप पाहून सर्वच जण सुखावतात. मात्र, काही आठवड्यांनंतर हळूहळू बाळाचा हा रंग बदलू लागतो आणि ते सावळे दिसू लागते. अशा वेळी नातेवाईक किंवा शेजाऱ्यांच्या टोकण्यामुळे पालकांच्या मनात धडकी भरते. बाळ ’गोरे’ व्हावे यासाठी मग हळद, चंदन किंवा गव्हाच्या पिठाचे उटणे लावण्यासारखे प्रयोग केले जातात. मात्र, यामुळे बाळाची नाजूक त्वचा अधिक कोरडी आणि काळवंडलेली होऊ …
Read More »महाकाय ग्रहनिर्मितीबाबत नवा सिध्दांत
विज्ञानातील सिद्धांतही अनेक वेळा गृहितकेच असतात. कालौघात नवे संशोधन आधीच्या सिद्धांताला छेद देणारे व नवा सिद्धांत स्थापन करणारे असू शकते. यापूर्वी लहान मातृताऱ्याभोवती महाकाय ग्रहाची निर्मिती होऊ शकत नाही, असे मानले जात होते. मात्र, एका महाकाय ग्रहाच्या शोधाने या समजालाही असाच छेद गेला. या ग्रहाचे नाव आहे ‘एनजीटीएस-1बी’. वार्विक विद्यापीठाचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. डॅनियल बेल्लिस यांनी म्हटले होते की, या ग्रहाचा …
Read More »शून्यातून बनला कोट्याधीश…
शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस यशाची कोणतीही शिखरं सर करू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ’ऑटो बेस्ट एम्पेरिओ’चे संस्थापक अवनीत सिंह कोहली उर्फ सन्नी. दिल्लीतील एका सुखवस्तू व्यापारी कुटुंबात जन्मलेल्या सन्नी यांचा प्रवास अत्यंत संघर्षाचा राहिला आहे. 1996 मध्ये ते जेव्हा आठवीत होते, तेव्हा त्यांच्या वडिलांचा भीषण अपघात झाला आणि पुढील तीन वर्षे ते अंथरुणाला …
Read More »बंदी स्वागतार्ह; पण पुरेशी नाही
ऑनलाईन गेमिंगचे वाढते जाळे आणि त्यातून निर्माण होणारी मुलांमधील व्यसनाधीनता हा आज केवळ कौटुंबिक नव्हे, तर एक गंभीर राष्ट्रीय प्रश्न बनला आहे. केंद्र सरकारने या संदर्भात नियम निश्चित करून ऑनलाईन जुगारावर आणि सट्टेबाजीवर जी बंदी घातली आहे, ती स्वागतार्ह असली तरी मूळ समस्येचे निराकरण करण्यासाठी ती पुरेशी नाही. तांत्रिक प्रगती आणि सामाजिक स्वास्थ्य यांच्यातील सीमारेषा पुसट होत असताना, या आव्हानाचा …
Read More »कर्मचारी कपातीची लाट
जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मायक्रोसॉफ्टने आपल्या कार्यपद्धतीत आणि मनुष्यबळ नियोजनात एक अत्यंत महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक वळण घेतले आहे. तब्बल 51 वर्षांचा यशस्वी प्रवास करणाऱ्या या कंपनीने आपल्या हजारो कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना म्हणजेच ‘व्हीआरएस’ जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, कंपनीच्या स्थापनेपासून अशा प्रकारचा निर्णय घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. या निर्णयाने केवळ माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातच नव्हे, तर …
Read More »बच्चू कडू यांची ‘प्रहार’ इतिहासजमा
विधानपरिषदेची आमदारकी मिळवण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रहार जनशक्ती पक्ष शिंदेसेनेत विलीनीकरण करण्यास सहमती दिली आहे. ‘एकनाथ शिंदे यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाल्याशिवाय विलीनीकरण शक्य नाही. मात्र शिवसेना ही आपल्या मातीतील संघटना आहे. भविष्यात प्रहारचे विलीनीकरण झाले तरी हरकत नाही, असे बच्चू कडू म्हणाले. एक लढाऊ संघटनेची निर्मिती सत्तेसाठी करण्यात आली होती आणि ती संघटना …
Read More »निकालांची महाप्रतीक्षा
अनेक आठवड्यांच्या वादळी प्रचारानंतर आणि राजकीय चढाओढीनंतर देशातील चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांच्या निकालांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरीमधील यंदाच्या निवडणुका भारतीय राजकारणाच्या बदलत्या प्रवाहांचे प्रतीक ठरल्या आहेत. या पाचही राज्यांमधील राजकीय संस्कृती, समाजकारण, अर्थकारण आणि मतदारांची मानसिकता भिन्न असली, तरी लोकशाहीप्रती असलेली त्यांची निष्ठा विक्रमी मतदानाच्या रूपाने पुन्हा …
Read More »तापमानाची काहिली
जगात सर्वाधिक उष्ण असणाऱ्या वीस ठिकाणांत भारतातील 19 ठिकाणांचा समावेश झाला आहे. या ठिकाणचे तापमान 44 ते 46.9 अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदविले गेले. वाढते तापमान ही केवळ हवामानाची नोंद नसून तो एक चिंताजनक विषय आहे. पूर्वी मे आणि जून महिन्यांत तापमानाचा उच्चांक नोंदला जात असताना आता एप्रिलमध्येच या तापमानाने नागरिकांना त्रस्त केले आहे. कमाल तापमानात विक्रमी वाढ होण्यामागे पर्यावरण, मानवी …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र