दिल्लीतील जंतरमंतर परिसरात आंदोलक आणि पोलिस यांच्यात झालेला संघर्ष लोकशाही व्यवस्थेसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. एका बाजूला आपली भूमिका मांडण्यासाठी रस्त्यावर उतरलेले नागरिक होते, ज्यांच्यात मतदानाचा अधिकारही अद्याप न मिळालेले अनेक तरुण सहभागी होते; तर दुसऱ्या बाजूला त्यांचे संरक्षण आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेले पोलीस होते. लोकशाहीत या दोघांमधील विश्वासाचे नाते अत्यंत महत्त्वाचे असते. ते तुटणे ही कोणत्याही समाजासाठी चांगली …
Read More »‘द व्वान’च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता
सिद्धार्थ मल्होत्रा आणि तमन्ना भाटिया यांच्या मुख्य भूमिका असलेला ’द व्वान’ हा आगामी पौराणिक आणि काल्पनिक (फोकलोर फँटसी) चित्रपट आता 25 सप्टेंबर 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याची अधिकृत घोषणा निर्मात्यांनी केली आहे. या घोषणेसोबतच निर्मात्यांनी चित्रपटाचे एक अत्यंत रहस्यमय आणि आकर्षक पोस्टर देखील सोशल मीडियावर शेअर केले आहे, ज्याने प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली आहे. या नवीन पोस्टरमध्ये एका …
Read More »अभिव्यक्ती स्वातंत्र्याची कसोटी
भारतीय चित्रपटसृष्टीने आपल्या स्थापनेपासून समाजाचे वास्तव, त्यातील संघर्ष, विसंगती आणि बदलत्या काळाचे प्रतिबिंब पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र जेव्हा जेव्हा या माध्यमाने व्यवस्था, सत्ताकेंद्रे किंवा प्रस्थापित सामाजिक कथनांना प्रश्न विचारण्याचे धाडस केले, तेव्हा तेव्हा त्याला राज्यसत्ता, दबावगट आणि रूढीवादी शक्तींच्या विरोधाला सामोरे जावे लागले. अलीकडे अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझ यांच्या ‘सतलुज’ या चित्रपटाभोवती निर्माण झालेला वाद हा अशाच …
Read More »संकट आले की पळू नका, स्वतःला अपग्रेड करा!
आयुष्याचा सर्वात कठीण प्रश्न कोणता असेल, तर तो बहुधा असा – जेव्हा सगळे काही चुकीचे घडत असेल, तेव्हा स्वतःला कसे सावरायचे? कारण यशाच्या दिवसांत सोबत करणारे अनेक असतात; पण अडचणीच्या काळात माणूस शेवटी स्वतःसोबतच उभा असतो. परीक्षेत अपयश, करिअरमधील अनिश्चितता, आर्थिक अडचणी, नातेसंबंधांमधील तणाव किंवा अपेक्षाभंग… प्रत्येक पिढीचे प्रश्न वेगळे असतात, पण संकटाचे स्वरूप मात्र सारखेच असते. ते अचानक येते, …
Read More »केसांना नैसर्गिंक चकाकी देण्यासाठी…
केस सरळ आणि चमकदार दिसावेत यासाठी आजकाल अनेक तरुण-तरुणी पार्लरमध्ये जाऊन ‘रिबॉन्डिंग’ किंवा ‘कॅरेटिन’ सारख्या रासायनिक प्रक्रियांचा आधार घेतात. मात्र या रासायनिक उपचारांचे परिणाम तात्पुरते असतात आणि कालांतराने रासायनिक प्रक्रियांमुळे केस अधिक कोरडे व निर्जीव होऊ लागतात. केसांचे नैसर्गिक आरोग्य जपून त्यांना घरच्या घरीच पार्लरसारखी चकाकी मिळवून द्यायची असेल, तर स्वयंपाकघरातील काही साध्या घटकांचा वापर करणे अधिक फायदेशीर ठरते. नैसर्गिकरीत्या …
Read More »एक हत्यार…किंमत पाच अब्ज!
काळाच्या ओघात शस्त्रास्त्रांचेही स्वरूप बदलत गेले. आधुनिक काळात अनेक प्रकारची शस्त्रे व अस्त्रे पाहायला मिळतात. जागतिक स्थरावर आपले वर्चस्व दाखवण्यासाठी, देशाच्या संरक्षणासाठी बहुतांश देश अद्ययावत शस्त्रांची निर्मिती करीत आहेत. अनेक देश बजेट सादर करतानाच शस्त्र निर्मितीसाठी मोठी आर्थिक तरतूद करत आहेत. जगात एक असं हत्यार आहे ज्याची किंमत भारतीय रुपयांमध्ये तब्बल 5 अब्जांपेक्षा अधिक रुपये आहे. हे पृथ्वीवरील सगळ्यात महागडं …
Read More »दुर्गम गावातील तरुणाला अडीच कोटींचे पॅकेज
आजच्या स्पर्धात्मक तंत्रज्ञानविश्वात जागतिक दर्जाच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कोट्यवधी रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळवण्यासाठी ‘आयआयटी’सारख्या नामांकित संस्थेची पदवी आवश्यक मानली जाते. मात्र, कर्नाटकातील एका दुर्गम गावातून आलेल्या पृथ्वीराजने हा समज पूर्णपणे खोटा ठरवला आहे. कोणत्याही प्रतिष्ठित संस्थेचा शिक्का नसतानाही केवळ स्वतःच्या कौशल्याच्या, सातत्यपूर्ण मेहनतीच्या आणि जिद्दीच्या बळावर त्याने जगातील आघाडीची चिप आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान कंपनी ‘एनव्हिडिया’मध्ये तब्बल 2.6 कोटी रुपयांच्या वार्षिक …
Read More »स्वागत ठाम भूमिकेचे
काल-परवापर्यंत ज्या भारत- अमेरिका ऐतिहासिक करारावर 99 टक्के सहमती झाली म्हणून ढोल वाजवले जात होते, त्याच करारावरून भारताने अचानक पाऊल मागे घेतले. ही माघार नसून, अमेरिकेच्या अरेरावीला दिलेला एक सुस्पष्ट आणि कणखर धोरणात्मक संदेश अथवा चपराक आहे. ‘आम्हाला व्यापार करार हवा आहे, पण देशाचे हित धाब्यावर बसवून नाही, हा वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांचा संदेश आजच्या घडीला अत्यंत गरजेचा होता. …
Read More »हरित हायड्रोजन मोहिमेसमोरील आव्हाने
भारताने जानेवारी 2023 मध्ये ‘राष्ट्रीय हरित हायड्रोजन मोहीम’ सुरू केली. 2030 पर्यंत दरवर्षी किमान 50 लाख मेट्रिक टन हरित हायड्रोजनचे उत्पादन करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट देशाने ठेवले आहे. यासाठी 19,744 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून 8 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीची अपेक्षा आहे. मात्र, मोहीम सुरू होऊन तीन वर्षेउलटल्यानंतरही जमिनीवरील वास्तव आणि कागदावरील उद्दिष्टे यात मोठी दरी असल्याचे संसदेत सादर …
Read More »48 हजार कोटींचे वीजबिल माफ
राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार 585 कोटी रुपयांची कर्जमुक्ती देणारी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ सरकारने जाहीर केली आहे. 2019च्या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना 50 हजारांऐवजी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय अलीकडेच घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या किसान मोर्चाच्या वतीने बुधवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित केलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सत्कार सोहळ्यात त्यांनी थकीत …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र