लेख-समिक्षण

व्होट जिहाद संज्ञेची चौकशी होणार

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह झारखंडमधील विधानसभा निवडणुकीची घोषणा मंगळवारी दुपारी केली. महाराष्ट्रात एका टप्प्यात म्हणजे 20 नोव्हेंबर रोजी मतदान होईल. तर मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी पाड पडेल.झारखंडमध्ये दोन टप्प्यात म्हणजेच 13 आणि 20 नोव्हेंबर रोजी मतदान होईल. यानंतर बुधवारी राज्य निवडणूक मुख्य अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत व्होट जिहाद संज्ञेचे चौकशी करण्याचा इशारा दिला. राज्यातील 288 तर झारखंडमधील …

Read More »

आघाडीची कसोटी

लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीने अचूक रणनिती आखल्याने चांगली कामगिरी केल्याचे दिसून आले. आघाडीचा प्रमुख उद्देश हा भाजपशी थेट सामना करणे आणि भाजपच्या विरोधातील मतांची फाटाफूट होणार नाही याची खबरदारी घेणे हा होता. आघाडीने वादग्रस्त मुद्दे बाजूला ठेवले आणि म्हणूनच त्यांना चांगल्या जागा मिळवत्या आल्या. पण काँग्रेसच्या हरियानातील पराभवाने ‘महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकांमध्ये स्थिती पालटली आहे. कमकुवत काँग्रेस पक्ष घटक …

Read More »

हरहुन्नरी अतुल

आपल्या दमदार अभिनयकौशल्याच्या जोरावर मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टी, रंगमंच आणि टीव्ही मालिका गाजवणारे अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन सर्वांनाच चटका लावून गेलं. ‘व्यक्ती आणि वल्ली’तील ‘पुलं’ साकारताना प्रत्यक्ष पु. ल. देशपांडे यांच्याकडून दाद मिळवणार्‍या परचुरे यांनी ‘कापूस कोंड्याची गोष्ट’, ‘नातीगोती’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘बे दुणे पाच’, ‘गेला माधव कुणीकडे’ यांसारख्या नाटकांमध्ये केलेल्या भूमिका प्रेक्षकांना खूप भावल्या. नाटक-जाहिराती-चित्रपट अशा विविध माध्यमांवर …

Read More »

बॉबीचा ‘दक्षिण धमाका’

अभिनेता बॉबी देओल ’अ‍ॅनिमल’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला होता. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार देखील मिळाला. यानंतर तो दाक्षिणात्य चित्रपट ‘कंगुवा’मध्ये दिसणार आहे. सध्या बॉबी देओल एकापेक्षा एक हिट चित्रपटांमध्ये दमदार अभिनय करताना दिसत आहे. याचदरम्यान आता तो ‘थलपथी 69’मध्ये दमदार अवतारात दिसणार आहे. बॉबी देओलला साऊथचा सुपरस्टार थलपथी विजयचा चित्रपट ‘थलपथी 69’ मध्ये कास्ट करण्यात …

Read More »

सन्मान मिथुनदांचा

बॉलिवूडचे दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मिथुन यांचे खरे नाव गौरांग होतेे. त्यांनी खूप मेहनत करून नाव आणि संपत्ती कमावले आहे. आज करोडोंमध्ये खेळणार्‍या मिथुन चक्रवर्तीने कमालीची गरिबी पाहिली आहे. त्यांच्या संघर्षाच्या दिवसांत त्यांना मुंबईच्या फूटपाथवर अनेक रात्री रिकाम्या पोटी …

Read More »

पोलो टी-शर्टची चलती

पुरुषांच्या व्यक्तिमत्वाला उठाव देणारा पोलो नेक चा एक तरी टीशर्ट आपल्या कपाटात असतो. ते स्मार्ट आणि कॅज्युअल लूक देतात. पोलो नेक टी शर्ट हा शर्ट पर्याय ठरु शकतो, त्याचवेळी तो अधुनिक आणि कूल असतो. त्यामुळे उन्हाळ्यात अतिशय उत्तम असतो. कोटा पासून ते स्विमिंगच्या पँटवरही तो खास दिसतो. कोणत्याही वयाच्या आणि आकाराच्या पुरुषांना वेगळा लूक द्यायचे काम या पोलो नेकचेच. श्रकॅज्युअल …

Read More »

नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज करताना…

ही वर्षांपूर्वी नोकरीसाठी अर्ज भरण्यासाठी एक पारंपारिक पद्धती वापरली जात असे. बर्‍याचदा पोस्टाद्वारे अर्ज केल्यानंतर तो अर्ज पोहचला की नाही, हे पाहण्यासाठी कुठलीच सोय उपलब्ध नव्हती. ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या पद्धतीमुळे या समस्यांचे निराकरण झाले आहे. पण ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. या गोष्टी काय आहेत ते पाहू. ———————– सध्याच्या काळात नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज पाठवावा लागतो. ही …

Read More »

दीडशे किलोंचे ‘सॅटेलाईट ड्रोन’

ब्रिटनमधील एका कंपनीने सॅटेलाईटशी स्पर्धा करणार्‍या सोलर-इलेक्ट्रिक ड्रोनची निर्मिती केली आहे. ‘पीएचएएसए-35’नावाचे हे ड्रोन सॅटेलाईटपेक्षाही सरस असल्याचा कंपनीचा दावा आहे. लवकरच ते सॅटेलाईटची जागाही घेऊ शकेल असेही कंपनीचे म्हणणे आहे. हे ड्रोन पांडाच्या वजनाइतके म्हणजेच केवळ 150 किलोंचे आहे. एखाद्या सॅटेलाईटचे वजन हजारो किलोंचे असते. हे ड्रोन बनवण्यासाठीचा खर्चही तुलनेने अतिशय कमी आहे. सॅटेलाईट म्हणजेच कृत्रिम उपग्रह हे पृथ्वीच्या वातावरणाच्या …

Read More »

टाटांची जीवनमूल्ये

भारतीय उद्योग विश्वामध्ये गेल्या सहा दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणार्‍या टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचं निधन झालं. त्यांच्या निधनामुळे उद्योगविश्वावर शोककळा पसरली आहे. पण त्यांच्या निधनानंतरही अजरामर झालेली त्यांची काही वाक्यं ही फक्त नव्या पिढीसाठीच नाही, तर त्यांच्या समकालीन आणि पुढे येणार्‍या कित्येक पिढ्यांनाही प्रेरणा देत राहतील. उद्योगासोबतच रतन टाटांनी समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी केलेले अखंड प्रयत्न यातूनच …

Read More »

सत्ताधार्‍यांना आरसा

सरकारच्या धोरणांवर आणि निर्णयांवर टीका करणे हा पत्रकारांचा अधिकार आहे, असे सांगून सर्वोच्च न्यायालयाने सत्तेत असलेल्यांना आरसा दाखवला आहे. राज्यांतील विविध राजकीय पक्षांच्या सरकारांविरुद्ध आवाज उठवल्यामुळे दडपशाहीला बळी पडलेल्या पत्रकारांसाठी सर्वोच्च न्यायालयाची ही टिप्पणी निश्चितच दिलासा देणारी आहे. अनेक राज्यांत पत्रकारांना अटक, मारहाण आणि गंभीर कलमांखाली तुरुंगात टाकण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर घडले आहेत. अनेक पत्रकार संशयास्पद परिस्थितीला …

Read More »