लेख-समिक्षण

इंटर्नशिपला अर्थ देणारा निर्णय

देशातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधून दरवर्षी लाखो पदवीधर तरुण बाहेर पडतात; परंतु नोकरीच्या बाजारपेठेत पाऊल ठेवताना या पदव्या आणि उद्योग जगताच्या प्रत्यक्ष अपेक्षा यांमध्ये एक मोठी दरी निर्माण झाल्याचे पाहायला मिळते. भारतात पदव्यांची संख्या मोठी असली तरी व्यावहारिक ज्ञान आणि वास्तविक कार्यक्षमता (स्कील) असलेल्या तरुणांची प्रचंड कमतरता असल्याची तक्रार उद्योग क्षेत्रातून सातत्याने केली जात आहे. हीच त्रुटी दूर करण्यासाठी आणि शिक्षणाला …

Read More »

आणखी एक आमदार फुटला

15 दिवसांपृर्वी शिवसेना ठाकरे गटातून सहा खासदारांनी बंडखोरी करत शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर, शिवसेना (ठाकरे)ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी आणखी एक धक्का दिला आहे. ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर विधानपरिषद उपसभापतीपदाच्या मोबदल्यात शिंदेसेनेत सहभागी झाले आहेत. अहिर यांनी शिंदेंच्या शिवसेनेकडून विधानपरिषद उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानतंर, त्यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. सचिन अहिर हे ठाकरेंचे अत्यंत …

Read More »

शुध्दीकरण मोहीमेचा धडाका

महाराष्ट्रात अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए) पदावर तुकाराम मुंडे यांची नियुक्ती झाल्यापासून राज्यातील भेसळखोरीच्या साम्राज्याला सुरुंग लागला आहे. दूध, पनीर, औषधे, वेफर्स, गुटखा, चहापत्ती, खाद्यतेल अशा सर्वसामान्यांच्या रोजच्या आहारातील पदार्थांमध्ये बिनदिक्कतपणे भेसळ करून लोकांच्या जीवाशी अत्यंत घातक खेळ सुरू होता. आपल्या धाडसत्रांनी या निर्ढावलेल्या भेसळखोरांच्या मुसक्या आवळण्याचे काम ज्या तडफदारपणाने सुरू आहे त्याबद्दल आयुक्त तुकाराम मुंडे यांचे सर्व स्तरातून कौतुक …

Read More »

संघर्षाची रेल्वे ‌‘रुळावर‌’ कधी?

तसं पाहिलं तर आपल्या आयुष्यातील रोजच्या संघर्षांना अंतच नाही. निवांत, निर्धास्त आयुष्य आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या नशिबी कुठे असते? इथल्या आपण या शब्दाचा अर्थ गॅस सिलिंडर, पेट्रोल पंप, बँका, पोस्ट ऑफिस, वीज कार्यालय, पाणीपुरवठा विभाग, महापालिका, रेल्वे, जनता दरबार, रुग्णालये अशा प्रत्येक ठिकाणी रांगेत उभे दिसणारे सामान्य नागरिक असा आहे. म्हणजेच रांग संस्कृतीचा भाग असलेले लोक. बाकी जे आपल्यासारखे नाहीत, ते …

Read More »

करीना आणि पृथ्वीराजचा ‌‘दायरा‌’

करीना कपूर खान आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‌‘दायरा‌’ या आगामी चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. हा बहुप्रतीक्षित चित्रपट येत्या 18 सप्टेंबर 2026 रोजी देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने हे दोन दिग्गज कलाकार पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुभव सिन्हा यांनी केले आहे. ‌‘मुल्क‌’, …

Read More »

बालपट हरवले कोठे?

आजकाल शाळकरी मुले मैदानावर खेळण्यापेक्षा किंवा पालकांसमवेत फिरायला जाण्यापेक्षा घरातच मोबाईलवर खेळणे पसंत करतात. अर्थात काही मुले अपवाद असू शकतात, मात्र बऱ्याच ठिकाणी असेच चित्र पाहवयास मिळते. पूर्वी उन्हाळी सुटी आली की लहान मुलांना जादुचे प्रयोग, लहान मुलांसाठीचे चित्रपट, भटकंती यासारखे उपक्रम दिसायचे. आता जादूच्या प्रयोगाला मुलांपेक्षा पालकांचीच गर्दी अधिक दिसते. दुसरीकडे लहान मुलांचे चित्रपट टॉकीजवर लागतातच असे नाही आणि …

Read More »

यशाच्या शिखरावर पोहोचायचंय?

आजच्या अत्यंत स्पर्धात्मक युगात केवळ कठोर परिश्रम (हार्ड वर्क) करून चालत नाही. पूर्वीच्या काळी जो जास्त वेळ काम करायचा, त्याला यशस्वी मानले जायचे. परंतु, आधुनिक काळात वेळेचे नियोजन करून, कमी श्रमात अधिक आणि दर्जेदार काम करणे म्हणजेच ‌‘स्मार्ट वर्क‌’ करणे अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. यश मिळवण्यासाठी आणि करिअरमध्ये मोठी झेप घेण्यासाठी स्मार्ट वर्क कसे करावे, याच्या काही सोप्या आणि प्रभावी …

Read More »

कलरींग केल्यानंतरही केस पांढरे दिसताहेत ?

केसांना कलर केल्यानंतर अवघ्या आठवडाभरातच मुळाशी पांढरे केस दिसू लागतात. अशा वेळी पुन्हा पूर्ण केसांना कलर केल्यास केसांचा पोत आणि आधीचा रंग खराब होऊ शकतो. केवळ मुळापाशी आलेला पांढरेपणा प्रभावीपणे कसा घालवायचा? रुट टचअपसाठी रंगाचे मिश्र्ण तयार करताना प्रमाण अत्यंत महत्त्वाचे असते. तज्ज्ञांच्या मते, यासाठी 1:1.3 (एक जसे दीडच्या जवळ) हे गुणोत्तर वापरावे. कलर: 20 ग्राम आणि डेव्हलपर: 30 ग्राम …

Read More »

काही माणसं झोपेत का बडबडतात?

मेंदू हा आपल्या शरीरातील सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. मेंदू आपल्या शरीराला कार्य करण्यास मदत करतो. उदाहरण संवाद साधणं, कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देणं तसेच उठण्या-बसण्यापर्यंतही सगळ्या गोष्टींसाठी मेंदू संकेत देतो की, आपण आता हे करायला हवं. कोणतीही क्रिया करताना अनेकदा आपण विचार करतो तर अनेकदा काही गोष्टी पुढच्या सेकंदाला घडतात तर हे कशामुळे तर हे मेंदू जे आपल्याला संकेत देतात त्यावरून …

Read More »

दुर्धर आजारांवर मात करत यशोशिखरावर

राकेश चंदोला यांचे बालपण सामान्य मुलांसारखे आनंदी नव्हते, तर ते आरोग्याच्या विविध समस्यांनी आणि वेदनांनी वेढलेले होते. एका टप्प्यावर त्यांना तब्बल 17 आजारांनी ग्रासले होते, ज्यामध्ये अँकायलोझिंग स्पॉन्डिलायटिससारख्या अत्यंत गंभीर आणि वेदनादायी आजाराचाही समावेश होता. या आजारामुळे त्यांना वारंवार रुग्णालयात जावे लागत असे. प्रदीर्घ उपचार आणि शारीरिक कमजोरीमुळे त्यांचे वजन झपाट्याने कमी झाले होते, ज्यामुळे अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे त्यांच्यासाठी …

Read More »