लेख-समिक्षण

वयाहून मोठे यश

शिकण्याला वयाचे कोणतेही बंधन नसते, हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो. इंदूरच्या सुषमा प्रदीप मोघे यांनी हे वाक्य प्रत्यक्षात उतरवत नकारात्मक विचार करणाऱ्यांपुढे आदर्श उभा केला आहे. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी संपादित केलेले यश देशभरातील तरुण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. एका सेवानिवृत्त शिक्षिकेने आपल्या जिद्दीच्या जोरावर एम. ए. मराठी साहित्य या पदव्युत्तर अभ्यासक्रमात थेट विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावला आणि सुवर्णपदकावर आपले …

Read More »

पारदर्शकतेला खिंडार

अयोध्येतील श्र्ीराम मंदिरातील दानपेट्यांमधील देणग्यांच्या रकमेत झालेल्या कथित अपहाराच्या प्रकरणाने देशभरातील कोट्यवधी रामभक्तांच्या मनात अस्वस्थता निर्माण केली आहे. शेकडो वर्षांच्या संघर्षानंतर आणि अनेक पिढ्यांच्या प्रतीक्षेनंतर उभे राहिलेले श्रीराम मंदिर हे हिंदू समाजाच्या सांस्कृतिक स्मृतीचे आणि श्रद्धेचे केंद्र आहे. त्यामुळे या मंदिराशी संबंधित कोणतीही अनियमितता ही केवळ आर्थिक गैरव्यवहार म्हणून पाहता येत नाही. ती थेट भाविकांच्या विश्वासाशी जोडलेली बाब ठरते. म्हणूनच …

Read More »

सशस्त्र दलांतील महिलाराज

अलीकडेच भारतीय सशस्त्र दलांच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण आणि अभिमानास्पद घटना घडली. राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या (एनडीए) पहिल्या महिला तुकडीतील 14 कॅडेटस्‌‍नी कठोर प्रशिक्षण पूर्ण करून भारतीय लष्कर आणि हवाई दलात अधिकारी म्हणून प्रवेश मिळवला. महिला सक्षमीकरण, लैंगिक समानता आणि राष्ट्रनिर्माणाच्या दृष्टीने हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. भारतीय सैन्य व्यवस्थेतील हा बदल केवळ एका संस्थेपुरता मर्यादित नसून देशातील सामाजिक परिवर्तनाचेही …

Read More »

शिवसेनेत तिसरी फूट

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेस आणि पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्याविरोधात षडयंत्र पूर्णत्वास नेण्यात आले, त्याला आठवडाही होत नाही, तोच महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले ‌‘ऑपरेशन टायगर‌’ अखेर यशस्वी करण्यात आले. पॅटर्न तोच होता. आधी पक्षातून फुटायचे, मग बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र देऊन संसदेत स्वतंत्र आसन व्यवस्था करण्याची मागणी करायची आणि लोकसभा …

Read More »

अन्वयार्थ फुटीचा

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेली ‌’ऑपरेशन टायगर‌’ची चर्चा ही अफवा नव्हती तर, एक वास्तव होते हे बुधवारी सिद्ध झाले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील 9 पैकी 6 खासदारांनी लोकसभेमध्ये स्वतंत्र गट स्थापन केला आहे. या गटाला लोकसभेच्या अध्यक्षांनी मान्यता दिली आहे. येत्या दोन दिवसांच्या कालावधीत म्हणजे शिवसेनेच्या वर्धापनदिनी हे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये सहभागी होतील …

Read More »

चिरंतन सौंदर्याचा ध्यास

मानवी संस्कृतीच्या सुरुवातीपासूनच कायम तरुण आणि देखणे दिसण्याची इच्छा माणसाच्या मनात राहिली आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्राचीन काळातील नैसर्गिक उपचारांपासून ते आधुनिक काळातील विज्ञान, औषधोपचार आणि आता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. आधुनिक विज्ञानाच्या प्रगतीमुळे आता सौंदर्याचा एखादा कायमस्वरूपी तोडगा लवकरच उपलब्ध होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. 19 व्या शतकापासूनच विज्ञान या प्रश्नाचे …

Read More »

‌‘बंटवारा‌’साठी आमीरचा पुढाकार

आमिर खान, सनी देओल आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्या बहुप्रतीक्षित ‌‘लाहोर 1947‌’ या चित्रपटाच्या शीर्षकात (टायटल) मोठा बदल करण्यात आला असून, आता हा चित्रपट ‌‘बंटवारा‌’ या नावाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शीर्षकाचे हक्क मिळवण्यासाठी स्वतः निर्माता आमिर खानने घेतलेल्या पुढाकारामुळे हा महत्त्वपूर्ण बदल शक्य झाला आहे. या चित्रपटाचे नाव आधी ‌‘लाहोर 1947‌’ असे निश्चित करण्यात आले होते. मात्र, एका …

Read More »

गुप्तहेरपटांची कालातीत मोहिनी

बदलत्या राजकीय वास्तवासह, युद्धांच्या स्वरूपासह आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीसह गुप्तहेरपटांचे रूप बदलत गेले; मात्र रहस्य, थरार आणि राष्ट्रनिष्ठा यांचा संगम हा त्यांचा स्थायीभाव राहिला. देव आनंद यांच्या शैलीदार गुप्तहेरापासून ते आधुनिक काळातील जागतिक मोहिमा पार पाडणाऱ्या उच्च-तंत्रसज्ज नायकांपर्यंतचा हा प्रवास भारतीय प्रेक्षकांनी नेहमीच डोक्यावर घेतला. रहस्याचा धूसर पडदा, शत्रूच्या छावणीतून येणारे गुप्त संदेश, प्रत्येक क्षणी बिंग फुटण्याचा धोका आणि …

Read More »

संरक्षणदलातील आधुनिक करिअरसंधी

लष्करी रणनीती आणि युद्धपद्धतीचे पारंपारिक स्वरूप आता पूर्णपणे बदलले असून, आधुनिक संरक्षण क्षेत्र हे केवळ बंदुका आणि रणगाड्यांच्या पल्याड गेले आहे. आज जगातील प्रत्येक राष्ट्रे प्रत्यक्ष युद्धभूमीपेक्षा डिजिटल आणि तांत्रिक आघाड्यांवर अधिक सक्रिय आहेत. यामुळेच संरक्षण दलांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा आणि प्रगत लष्करी तंत्रज्ञान या क्षेत्रांना अभूतपूर्व महत्त्व प्राप्त झाले आहे. तंत्रज्ञानाची आवड असणाऱ्या आणि देशसेवेची इच्छा बाळगणाऱ्या तरुण …

Read More »

लहान मुलांना लिहिण्यास शिकवण्याची योग्य पध्दत

लहान मुलांना लिहिण्यास शिकवणे हे पालकांसाठी मोठे आव्हान असते. अनेकदा पालक थेट अक्षरे गिरवण्यापासून सुरुवात करतात, परंतु बालरोगतज्ज्ञ डॉक्टर अर्पित गुप्ता यांच्या मते ही पद्धत चुकीची आहे. मुलांचे हात आणि मेंदू अक्षरे लिहिण्यासाठी लगेच तयार नसतात. त्यामुळे त्यांना टप्प्याटप्प्याने आणि खेळाच्या माध्यमातून लिहिण्यास शिकवले पाहिजे, जेणेकरून त्यांच्यावर कोणताही ताण येणार नाही. 1. सुरुवातीला फक्त ओरखडे (स्क्रिबलिंग) काढू द्या डॉक्टर अर्पित …

Read More »