‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे शिवाली परबला मोठी लोकप्रियता मिळाली. आपल्या विनोदी शैलीने तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. शिवाली लवकरच सिनेमात पदार्पण करत आहे. मात्र या चित्रपटात ती विनोदी नाही तर एका गंभीर भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
शिवाली परब ’मंगला’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात मंगला ही व्यक्तिरेखा शिवाली साकारणार असल्याचं समोर आलं आहे. नुकतेच शिवालीने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले असून गणरायाच्या चरणी तिने आगामी सिनेमाचे पोस्टरही रिलीज केले. या पोस्टरमध्ये शिवालीचे तीन लूक पाहायला मिळत आहेत. एक कौलारू घर आणि कोपर्यात एक दाम्पत्य या पोस्टरमध्ये आहे.- शरयू वर्तक
Check Also
रुपेरी पडद्यावरची विद्यार्थी आंदोलने
भारतीय लोकशाहीची खरी ताकद केवळ निवडणुकांमध्ये नाही, तर मतभिन्नता स्वीकारण्याच्या आणि शांततापूर्ण विरोधाला स्थान देण्याच्या …
पांचजन्य वृत्तपत्र