लेख-समिक्षण

स्पर्धेच्या युगातील सक्सेस मंत्र

अधिक माहिती मिळवावी ः ज्या क्षेत्रात करिअर करायचे त्या क्षेत्रातील प्रस्थापित लोकांकडून त्यातील चांगल्या-वाईट आणि प्रारंभी येणार्‍या अडचींबाबत संपूर्ण माहिती एकत्र करावी. ग्लॅमरला प्राधान्य नको ः ग्लॅमरप्रधान करिअर तरुणाईला भुरळ घालत असतात. अभिनय, मॉडेलिंग, एअर हॉस्टेस, पत्रकार किंवा पंचतारांकित हॉटेलमधील फ्रंट ऑफिसचे काम दिसायला खूप ग्लॅमरस दिसते; पण या करिअरमध्ये अपार मेहनत, निराशा, शॉर्ट टर्म मागणी, इतर अनेक गोष्टींच्या अडचणी …

Read More »

मुलांच खोटं बोलणं आणि पालक

मुलांच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये अनेक टप्पे असतात. त्यामधील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे खोटं बोलण्याची सुरुवात. पालक म्हणून आपल्याला मुलं खोटं बोलतात, तेव्हा आपल्याला चिंता वाटणे, राग येणे स्वाभाविक असते. काही वेळा किंवा आपण स्वतःवरच शंका घेऊ लागतो. परंतु मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून खोटं बोलणं हे मुलांच्या मानसिक आणि सामाजिक विकासाचा एक स्वाभाविक भाग असल्याचं बालमानसशास्राच्या अभ्यासकांचं म्हणणं आहे. ‘थिअरी ऑफ माइंड’ काल्पनिकता बहुतांश …

Read More »

झोपेबाबत नवं संशोधन

दिवस उगवल्यावर जागे होणे आणि रात्री झोप येणे या क्रिया मानवासह बहुसंख्य प्राणिमात्रांमध्ये अनादि काळापासून चालू आहेत. आपल्या अनेक शरीरक्रिया त्यावर अवलंबून असतात. जीवशास्त्राच्या भाषेत त्याला ‘सरकॅडियन र्हिदम’ किंवा ‘बॉडी क्लॉक’ (जैविक घड्याळ) असे म्हणतात. मात्र, दररोज नित्यनेमाने ही क्रिया कशी चालते, याबाबत शास्त्रज्ञांना कायमच कुतूहल होते. प्राण्यांच्या शरीरात अशी कोणती कळ (स्वीच) आहे, ज्यामुळे झोपणे आणि जागे होणे या …

Read More »

साहसी संशोधकाची ध्येययात्रा

महान संशोधक सर जेम्स लार्क रॉस यांची जीवनगाथा धैर्य, चिकाटी आणि ज्ञानलालसेचा महाग्रंथ आहे. स्कॉटलंडमध्ये जन्मलेला हा तरुण लहानपणापासून समुद्राकडे ओढला गेला. समुद्रावर जावे हेच त्याचे पहिले स्वप्ने होते. प्रसिद्ध आर्टिक संशोधक सर जॉन रॉस यांच्या साहसकथा ऐकत तो मोठा झाला आणि बारा वर्षांचा असतानाच त्याने नेव्हीत प्रवेश केला. त्यानंतर समुद्रच त्याचे विद्यापीठ ठरले. गणित, नौकानयन, भूचुंबकत्व यांचे धडे त्याने …

Read More »

गळचेपी करणारी अटक

लडाखमधील सामाजिक आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना करण्यात आलेली अटक हा सध्याचा हॉट टॉपिक ठरला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरून त्यांच्या अटकेचा निषेध केला जात आहे. भारतातल्याही अनेक ज्येष्ठ विचारवंतांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी वांगचुक यांच्या अटकेवर तीव्र नाराजी व्यक्त करीत सरकारला ही अटक महागात पडेल, असा इशारा दिला आहे. अगदी मोदी सरकारचे समर्थक समजले जाणारे काही विचारवंतसुद्धा या अटकेच्या विरोधात आपले …

Read More »

गर्दीबळींचे आव्हान

शनिवारी (२७ सप्टेंबर) तामिळनाडूतील करुरमध्ये अभिनेता आणि तमिझगा वेत्री कळगमचे प्रमुख विजय थलापती याच्या रॅलीत चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत तब्बल ३६ लोकांचा जीव गेला. शिवाय अनेक जखमी झाले. ही दुर्घटना कशी घडली, रॅलीसाठी कसे नियोजन केले होते, पोलिसांनी परवानगी देताना कोणती काळजी घेतली होती, आदी सर्व माहिती चौकशीत कालांतराने समोर येईल. मात्र, तोपर्यंत दुसरी दुर्घटना घडलेली असेल. आपला समाज आणि …

Read More »

दिवाळीपूर्वी ओल्या दुष्काळाप्रमाणे मदत

राज्यात ६० लाख हेटरचे नुकसान अतिवृष्टीमुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ऑगस्टपर्यंत जे नुकसान झाले होते, त्यासाठी राज्य सरकारने २ हजार २१५ कोटी रुपये वितरित करणे सुरू केले आहे. ज्या-ज्या प्रकारचे नुकसान झाले आहे, त्याबाबत सामूहिक धोरण तयार करू आणि पुढच्या आठवड्यात मदतीची घोषणा करू. ही सर्व मदत ओल्या दुष्काळाप्रमाणेच शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यात मिळावी, असा राज्य सरकारचा प्रयत्न आहे, अशी …

Read More »

बिहारमध्ये काँग्रेसचे काय होईल?

बिहारमध्ये लवकरच विधानसभा निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा केली जाईल. त्यापूर्वीच या राज्यातील रणसंग्रामाने वेग घेतलेला आहे. विशेषतः काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तर बिहारला केंद्रस्थानी ठेवत निवडणूक आयोगावर आरोपांची राळ उडवून दिली आहे. राहुल गांधींची ‘व्होटर अधिकार यात्रा’ गर्दी जमवण्याच्या आणि मथळे मिळवण्याच्या दृष्टीने बरीच यशस्वी ठरली. मात्र काँग्रेसच्या अंतर्गत आकलन अहवालानुसार या यात्रेतून निर्माण झालेला उत्साह मतांमध्ये रूपांतरित होणे कठीण …

Read More »

न्यायिक सुधारणांचे अवकाश

न्यायपालिका ही आर्थिक व सामाजिक पायाभूत रचनेचा भाग असून ती वेगवान व निष्पक्ष असणं आवश्यक आहे, पण प्रत्यक्षात ती प्रलंबित खटल्यांच्या ओझ्याखाली दबलेली दिसते. या परिस्थितीमुळेच लोकांना न्यायालयात जाण्याची भीती वाटते. दहा-वीस वर्षेचाललेले दहशतवादविरोधी खटले, मोठमोठ्या घोटाळ्यांतील दशकानुदशके चाललेली सुनावणी आणि शेवटी आरोपींची निर्दोष सुटका हे सर्व नागरिकांमध्ये तसेच गुंतवणूकदारांमध्ये न्यायव्यवस्थेच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्न निर्माण करणारे ठरण्याची भीती असते. यामुळे परदेशी …

Read More »

बजेटपेक्षा दहापट कमाई

सध्या तेलुगू चित्रपट बॉस ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. एकापेक्षा एक उत्तम चित्रपट प्रदर्शित होत आहेत आणि प्रेक्षक त्यांना भरभरून प्रतिसाद देत आहेत. दमदार कथा आणि प्रभावी अभिनय यामुळे लोक थिएटरमध्ये धावत आहेत. या दिवसांत लिटिल हार्टस् हा चित्रपट बॉस ऑफिसवर प्रचंड गाजत आहे. ५ सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या या छोट्या बजेटच्या चित्रपटाने अवघ्या दहा दिवसांत जबरदस्त कमाई केली आहे. सकारात्मक प्रतिक्रिया …

Read More »