भारतीय चित्रपटसृष्टीत आजवर अनेक सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक प्रश्नांवर बोट ठेवणारे चित्रपट आले, मात्र ‘दशावतार’ या मराठी चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनाला भिडणारे वेगळे स्थान पटकावले आहे. पौराणिक अवतारांचा आधार घेत वर्तमानातील भ्रष्ट व्यवस्था, अन्याय्य विकासाची संकल्पना आणि निसर्गविनाशाचे भयावह वास्तव उलगडून दाखवणारा हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता न राहता विचारप्रवृत्त करणारा ठरतो. दिग्दर्शकाची कलादृष्टी, प्रभावी संवाद आणि कलाकारांचा बहुआयामी, हृदयस्पर्शी अभिनय यामुळे …
Read More »मुलाखतासाठीची तयारी
सध्याच्या स्पर्धेच्या युगात नोकरी मिळवणे सोपे राहिलेले नाही. तुमच्याकडे उच्च शैक्षणिक पात्रता असली तरी केवळ त्या आधारावर नोकरी मिळण्याची खात्री राहिलेली नाही. त्यामुळेच नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांचा उमेदवारांनी विचार केला पाहिजे. ही कौशल्ये प्रयत्नांद्वारे आत्मसात करता येतात. नोकरी मिळवण्यासाठी शैक्षणिक पात्रतेबरोबरच आपले व्यतिमत्त्व प्रभावी असणे गरजेचे आहे. नोकरी मिळवण्यासाठी उमेदवाराच्या अंगी कोणते गुण, कौशल्ये असली पाहिजेत यासंबधी तज्ज्ञांनी केलेले …
Read More »व्हर्सेटाईल लेगिंग्ज
लेगिंग्ज म्हणजे टाईट फिटिंग असणारा वस्त्रप्रकार. कॅज्युअल आउटफिट म्हणून घालण्यासाठी अतिशय सहज सोपा आणि आरामदायी तसेच दिसायलाही आकर्षक. त्यामुळे महिला वर्गात लेगिंग्जची लोकप्रियता मोठी असल्याचे दिसते. या लेगिंग्ज आपण वेगवेगळ्या प्रकारे घालून पेहरावात वेगळेपण आणू शकतो. ब्लॅक, ब्राउन या नेहमीच्या लेगिंग्जपेक्षा बाजारामध्ये सध्या रंगांची खूपच विविधता दिसून येत आहे. केवळ रंगातच नाही तर स्टेश्चर आणि पॅटनमध्येसुद्धा या भरपूर व्हरायटी दिसून …
Read More »धूम्रपान आणिं मनारोग्य
माणसाने अनेक विचित्र सवयी स्वतःला लावून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये नाका-तोंडातून धूर काढणार्या धूम्रपानाचा समावेश होतो. ‘नाकाचा वापर धुराड्यासारखा व्हावा अशी देवाची इच्छा असती तर त्याने नाकपुड्या उफराट्या ठेवल्या नसत्या का?’ असे महान कृषीशास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांनी म्हटले होते. ‘धूम्रपान आरोग्यासाठी घातक असते’, असे वाक्य सिगारेटच्या पाकिटावरही लिहिलेले असते; पण तरीही अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करतात आणि सर्रास धूम्रपान करतात. …
Read More »यशोकहाणी भूगर्भशास्त्रज्ञाची
लंडनजवळील ओल्ड सारम कॅम्प येथे डॉ. रॅडलिफ यांच्या शाळेतील काही नवीन मुले एका जुन्या बोगद्याच्या तोंडाशी थांबली होती. तो बोगदा प्राचीन काळी पाण्याकरिता वापरला जात असे. काळोख्या बोगद्यात शिरताना सगळ्यांची भीतीने थरथर कापणारी अवस्था होती. त्याच वेळी मोठ्या मुलांनी त्यांच्या टोप्या आत फेकून दिल्या. भीतीवर मात करून लहान मुले सरपटत त्या बोगद्यात शिरली. तेथे खूप अंधार होता, खडकावर पाणी ठिबकत …
Read More »नीतीमूल्यांची पायमल्ली
नेहमीच वादग्रस्त बोलणारे गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर केलेल्या टीकेनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दूरध्वनी करून आपली नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्रातील महायुती सरकारचे घटक असणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीसुद्धा अशा प्रकारच्या विधानाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. आता देवेंद्र फडणवीस यांनी या विधानाची दखल घेऊन गोपीचंद पडळकर यांना समज …
Read More »सवलतींचे वास्तव
देशात २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी स्लॅबची अंमलबजावणी सुरू झाली. त्यातून अनेक ग्राहक उपयोगी आणि जनसामान्यांच्या गरजेच्या वस्तू काही प्रमाणात स्वस्त झाल्या आहेत. हा बचत उत्सव असल्याचे मोदी सरकारचे म्हणणे आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य कुटुंबाचे वर्षाला कमीत कमी ३० ते ४० हजार रुपये वाचतील, असा सरकारचा दावा आहे. सरकारी महसुलात या निर्णयामुळे किती तूट येईल यावरसुद्धा वेगवेगळे दावे सुरू आहेत. काही …
Read More »मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ शेतकर्यांच्या बांधावर
मराठवाडा, पश्चिम विदर्भात पावसाने हाहा:कार माजवला आहे. शेतकर्यांनी ओला दुष्काळ घोषित करण्यासाठी टाहो फोडल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, सामाजिक न्यायमंत्री संजय सिरसाट, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह राज्यातील वरिष्ठ अधिकार्यांनी बुधवारी लातूर, सोलापूर जिल्ह्यात दौरा केला. शेतकर्यांच्या बांधावर जाऊन पीक नुकसानीची पाहणी केली. या दौर्यात मुख्यमंत्री फडणवीस …
Read More »ई सिमकार्ड घोटाळ्याचा चक्रव्यूह
इंटरनेटच्या विस्ताराने माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणली; पण या विस्तारणार्या सायबरविश्वात गुन्हेगारीही वाढत चालली आहे. सायबर गुन्हेगार आजच्या काळात नवनवीन शक्कल लढवून लोकांची फसवणूक करत आहेत. परिणामी, आपल्या हातात असणारा मोबाईल कोणत्या क्षणी आपले बँक खाते रिकामे करेल हे सांगता येत नाही अशी स्थिती आहे. अलीकडील काळात गाजत असलेला ई-सिम घोटाळा हा यातीलच एक प्रकार असून त्याबाबत अत्यंत सजग …
Read More »जीएसटी सुधारणा आणि कंपन्यापुढे पेच
भारतातील ग्राहक वस्तूंच्या बाजारपेठेत एक नवा टप्पा सुरु झाला आहे. वस्तू आणि सेवा कराच्या दुसर्या टप्प्यातील सुधारणा म्हणजेच जीएसटी २.० लागू झाल्यानंतर सर्वसामान्यांच्या खरेदी पद्धती, कंपन्यांची किंमत ठरवण्याची नीती आणि संपूर्ण पुरवठा साखळी यामध्ये लक्षणीय बदल होणार आहेत. दशकानुदशके ग्रामीण आणि शहरी बाजारपेठेत समान महत्त्व राखणारे ५ रुपये व १० रुपयांचे पॅक आता हळूहळू गायब होत आहेत. या किमती म्हणजेच …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र