लेख-समिक्षण

देशभर ‌‘लोकशाही‌’चा एल्गार

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश यांच्या राजीनाम्याची मागणी करीत देशातील सर्व विरोधी पक्ष आणि तरुणांच्या कॉक्रोच जनता पक्षाने 2 ऑक्टोबरपासून रणशिंग फुंकले आहे. मुंबईत कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वात तरुणांचे आंदोलन पेटले. त्यांना नियंत्रित करण्यासाठी पेोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली. दुसरीकडे निवडणुकीतील निष्पक्षता राखण्यासाठी आणि लोकशाही हक्कांचे संरक्षण करायचे म्हणत संपूर्ण विरोधी पक्ष एकजूट झाला. इंडिया आघाडीने 2 ते 8 ऑक्टोबरदरम्यान देशव्यापी ‌‘लोकशाही वाचवा मोर्चा‌’ आयोजित करणे सुरू केले. या आंदोलनाचा एक भाग म्हणून, आघाडीतील सर्व विरोधी पक्षांचे खासदार 6 ऑक्टोबर रोजी संसदेपासून निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत पायी मोर्चा काढतील, अशी घोषणा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली आहे.
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके आणि त्यांच्या इतर नेत्यांनी यापूर्वी केंद्रीय मंत्रिपदावरून धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा देण्यास बाध्य केले. त्या शॉकमधून मोदी सरकार बाहेर पडलेले नसताना महात्मा गांधी यांच्या जयंती दिन 2 ऑक्टोबरपासून पुन्हा तरुणांचे आंदोलन सुरू झाले. या आंदोलनाला पुरक ठरणारे इंडिया आघाडीचे मोर्चे निघणे सुरू झाले. इंडिया आघाडीने बुधवारी दिल्लीत साडेतीन तासांची बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी सांगितले की, ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात राष्ट्रपतींसोबत बैठक आणि देशभरात पाच भव्य रॅली आयोजित केल्या जातील. इंडिया आघाडीच्या घटक पक्षातील नेते आणि कार्यकर्ते 2 ते 8 ऑक्टोबरदरम्यान देशातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांसमोर आंदोलन करणार आहेत. लोकशाही कशी धोक्यात आली आहे, हे आपण तेथे जाऊन लोकांना याची जाणीवही करून देऊ की, आपण हे काम कशासाठी करत आहोत.
दुसऱ्या टप्प्यात 6 ऑक्टोबरला सर्व विरोधी पक्षाचे खासदार निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. तिसऱ्या टप्प्यात विरोधी पक्षनेते हे राष्ट्रपतींकडे भेटीची वेळ मागतील. हे ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होईल. त्यानंतर आम्ही त्यांना सर्वजण मिळून आम्हाला घटनात्मक कशा अडचणी येत आहेत? सरकार आमच्यासमोर घटनात्मक कशा अडचणी निर्माण करत आहे, हे सांगू. चौथ्या टप्प्यात आम्ही पाच मोठ्या रॅली काढणार आहोत. त्याच्या डेट्स आणि प्लॅन आम्ही सर्व मिळून ठरवू. या पाच रॅलीच्या माध्यमातून आम्ही देशातील जनतेला सरकार कशा प्रकारे तुमचा मतदानाचा अधिकार हिसकावून घेत आहे, हे पटवून सांगू, अशी माहिती खर्गे यांनी दिली. नोव्हेंबर पहिल्या आठवड्यात दिल्लीत एक मोठी रॅली होणार आहे. या रॅलीत ेदेखील आम्ही ‌‘मत चोरी‌’, ‌‘निवडणूक चोरी‌’बाबत सर्वांना माहिती देणार आहोत. राहुल गांधी यांनी अनेक गोष्टी यापूर्वीच सांगितल्या आहेत. आता सरकारमधील लोकांनीच हे बाहेर काढले आहे. निवडणूक आयोगातील सदस्यांनीच हे केले आहे, असेही ते म्हणाले.
कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये आयोजित बैठकीत काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट), शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रीय जनता दल, माकप, भाकप, जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, झारखंड मुक्ती मोर्चा, भाकप (माले), इंडियन युनियन मुस्लीम लीग, केरळ काँग्रेस (एम), एमडीएमके, व्हीसीके, आरएसपी, केरळ काँग्रेस (जे) आणि ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक यांच्यासह 20 विरोधी राजकीय पक्ष सहभागी झाले.

Check Also

संकट भीषण दुष्काळाचे

महाराष्ट्रातील दुष्काळाचे संकट दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालले असून, राज्यातील कृषी उत्पन्नावर मोठे सावट पसरले …