लेख-समिक्षण

सततचा एसी; त्वचेचं काय?

हल्ली अनेक जणींच्या बाबतीत असं होतं की, घरात, ऑफिसमध्ये आणि गाडीत सतत एसीचा आधार घ्यावा लागतो. कडाक्याच्या उन्हाळ्यात ही थंडगार हवा शरीराला सुखावणारी असते; पण सततचा एसीतील वावर हा तुमच्या त्वचेसाठी हानिकारक ठरतो. यामुळे आपली त्वचा कोरडी आणि निस्तेज होण्याचा धोका वाढतो.
एसीच्या हवेत ‘ह्युमिडिटी’ म्हणजेच ओलावा नसतो. यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलसरपणा हरवतो. कोरड्या त्वचेमुळे त्वचा लवकर वयोमान दाखवते. सूक्ष्म रेषा आणि सुरकुत्या वेळेआधीच दिसू लागतात. ओठ फाटणे, बोटांभोवतीची त्वचा सोलवटणे किंवा हाताच्या अंगठ्याभोवती काळेपणा ‡ या तक्रारी वाढतात.
ज्या महिलांची त्वचा आधीपासूनच संवेदनशील आहे, त्यांच्यासाठी एसी अधिक धोकादायक ठरतो. या महिलांमध्ये रेडनेस, इचिंग, पिंपल्स किंवा पिग्मेंटेशन वाढू शकते.
काय काळजी घ्यावी?
एसीमध्ये सतत राहात असाल तर चांगल्या क्वालिटीचा हायड्रेटिंग मॉईश्चचरायझर वापरायला हवे. सामान्यतः हायलुरॉनिक अ‍ॅसिडयुक्त उत्पादने उत्तम असतात. वचेला आतून ओलावा मिळवायचा असेल तर दिवसभरात किमान ८-१० ग्लास पाणी प्यावे. तसेच नारळपाणी, फळांचे रस याचाही वापर करा. दिवसभरात २-३ वेळा चेहर्‍यावर गुलाबजल शिंपडा. यामुळे त्वचेला हायड्रेशन मिळतो आणि फ्रेश वाटतं. अनेक महिला फक्त बाहेर जाताना सनस्क्रीनचा वापर करतात. पण घरात आणि ऑफिसमध्ये एसी असेल तर त्वचा युव्ही रेडिएशनचा सामना करत असते. साहजिकच अशा वेळी सन स्क्रीन लोशन त्वचेवर लावणे गरजेचे ठरते. सतत एसीमध्ये राहणार्‍या महिलांनी रात्री झोपताना स्लीपिंग मास्क, विटॅमिन ई किंवा अ‍ॅलोवेरा जेल लावून झोपल्याने एसीच्या परिणामांचा प्रभाव कमी होतो. अशा महिलांनी आहारामध्ये अक्रोड, बदाम, फ्लॅससीड्स, सफरचंद, दही यांचा समावेश करायला हवा. यामुळे त्वचेला नैसर्गिक पोषण मिळतं.घरातील वातानुकूलित खोलीत ह्युमिडिफायर लावल्यानं हवेत योग्य आर्द्रता राखता येते. एसीमुळे त्वचा आधीच कोरडी होते, त्यात मॅट फिनिश फाउंडेशन वापरल्यास ती आणखीन ड्राय दिसू शकते, हे लक्षात ठेवा. एसीमध्ये काम करणार्‍या महिलांनी लिप बाम न विसरता लावायहला हवे. विशेषतः लिक्विड लिपस्टिकच्या आत वापरावे.

Check Also

लहान मुले आणि व्हिडिओ कॉलिंग

लहान मुलांच्या निरागस हालचाली सर्वांनाच मोहवून टाकतात. अनेकदा दूर राहणारे नातेवाईक किंवा मित्रमंडळी बाळाला पाहण्यासाठी …