लेख-समिक्षण
  • 9 august 2026

अंक मिळणेसाठी


एकूण वाचक संख्या : 4212

TimeLine Layout

March, 2026

  • 15 March

    मलमपट्टीने काय साधेल?

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडताना राज्यातील बळीराजाला दिलासा देणारी एक घोषणा केली आहे. दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाला माफी देण्याची ही घोषणा कर्जबाजारीपणामुळे त्रासलेल्या काही शेतकऱ्यांसाठी दिलासाजनक असली, तरी सरसकट बळीराजा खूश होईल अशी परिस्थिती नाही. देवेंद्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेल्या या निर्णयावर अपेक्षेप्रमाणे विरोधी पक्षांनी टीका केली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमच्या काळात आम्ही सरसकट …

    Read More »
  • 15 March

    घरखरेदीदारांना दिलासा

    घरखरेदीदारांच्या हक्कांचे संरक्षण करणारा एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दूरगामी निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. सदनिका किंवा घराच्या देयकावरून (पेमेंट) निर्माण झालेल्या वादाचे भांडवल करून विकासक (बिल्डर) आता खरेदीदाराला संक्षिप्त कायदेशीर प्रक्रियेचा आधार घेऊन घरातून बेदखल करू शकणार नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. अशा प्रकरणांमध्ये विकासकांना नियमित दिवाणी प्रक्रियेचाच अवलंब करावा लागेल, असे बजावत न्यायालयाने घरखरेदीदारांची बाजू भक्कम …

    Read More »
  • 15 March

    भारताकडे येणाऱ्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला

    इराण आणि अमेरिकेतील युद्ध भडकलेले असतानाच, बुधवारी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारताकडे येणाऱ्या थायलंडच्या एका मालवाहू जहाजासह तीन जहाजांवर पुन्हा हल्ले झाले. या हल्ल्‌‍यामुळे एका जहाजाला भीषण आग लागली असून, जहाजावरील खलाशांना वाचवण्यासाठी तातडीने बचाव मोहीम राबवण्यात आली आहे, असे वृत्त ‌‘एएफपी‌’ने दिले. या व्यापारी जहाजावरील दोन भारतीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून एक भारतीय बेपत्ता आहे. हा हल्ला इराणने केला असल्याचे मानले …

    Read More »
  • 15 March

    धास्ती ‌‘सुपर अल निनो‌’ ची

    जागतिक तापमानवाढीच्या भीषण काळात आता निसर्गाचे एक असे रूप समोर येत आहे, ज्याने जगभरातील हवामान शास्त्रज्ञांची आणि धोरणकर्त्यांची झोप उडवली आहे. युरोपीय हवामान केंद्राच्या (ईसीएमडब्ल्यूएफ) ताज्या आकडेवारीनुसार, या वर्षाच्या अखेरपर्यंत ‌‘सुपर अल नीनो‌’चा प्रभाव निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. ही घटना इतकी दुर्मिळ आणि शक्तिशाली आहे की, ती साधारणपणे दर 10 ते 15 वर्षांनी एकदाच येते आणि संपूर्ण जगाच्या हवामान …

    Read More »
  • 15 March

    भारतासाठी धोक्याची घंटा

    जागतिक राजकारणाच्या पटावर सध्या मध्यपूर्वेतील घडामोडींनी एक अत्यंत स्फोटक वळण घेतले आहे. विशेषतः 28 फेब्रुवारी 2026 च्या रात्री इराण आणि अमेरिका यांच्यात जो अभूतपूर्व क्षेपणास्त्र संघर्ष झाला, तो आधुनिक युद्धतंत्राच्या भविष्यातील दिशेचा एक संकेत होता. इराणने अमेरिकेच्या सागरी सामर्थ्याचे केंद्र असलेल्या अब्राहम लिंकन या महाकाय विमानवाहू जहाजाला लक्ष्य करण्याचा जो धाडसी प्रयत्न केला, त्याने संपूर्ण जगाचे सामरिक लक्ष वेधून घेतले. …

    Read More »
  • 8 March

    सूर्याचा नवा चित्रपट ‌‘विश्वनाथ अँड सन्स‌’

    तमिळ चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार सूर्या याच्या आगामी चित्रपटाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून असलेली उत्सुकता आता संपली आहे. ‌‘सूर्या 46‌’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या चित्रपटाचे अधिकृत नाव आणि पहिले पोस्टर निर्मात्यांनी प्रसिद्ध केले आहे. ‌‘विश्वनाथ अँड सन्स‌’ असे या चित्रपटाचे शीर्षक असून, हा एक कौटुंबिक मनोरंजक चित्रपट असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये सूर्या एका लहान मुलाला कडेवर घेऊन दिसतोय. त्याच्या …

    Read More »
  • 8 March

    पुन्हा उजळली चंदेरी दुनिया

    कोरोना महामारीच्या काळात वेगाने लोकप्रिय झालेल्या ओटीटी कल्चरमुळे बॉलीवूड संकटात सापडल्याची चर्चा सातत्याने होत होती. विशेषतः चित्रपटगृहांमध्ये जाऊन प्रेक्षकांनी सिनेमे पाहण्याचे प्रमाण कमी झाल्याचा दावा सर्रास केला जात होता. पण 2025 मध्ये भारतीय चित्रपटांच्या एकूण बॉक्स ऑफिस संकलनाने 13,395 कोटी रुपयांचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. ही आकडेवारी कोरोना महामारीपूर्व काळातील सरासरीच्या तुलनेत 32 टक्क्यांनी अधिक असून ती प्रेक्षकांच्या बदललेल्या मानसिकतेचे …

    Read More »
  • 8 March

    केशप्रत्यारोपण करताय?

    केसांच्या समस्येमुळे आजकाल अनेक जण हतबल झालेले दिसतात. गळणारे केस आणि टक्कल पडण्याची भीती यांमुळे लाखो रुपये खर्च करून केशप्रत्यारोपण करण्याकडे कल वाढला आहे. मात्र, इतका खर्च करूनही सर्वांनाच अपेक्षित निकाल मिळतोच असे नाही. काही प्रकरणांमध्ये केस पुन्हा विरळ होतात किंवा शस्त्रक्रिया अपयशी ठरते. असे का घडते? एफयूई आणि एफयूटीमधील फरक केशप्रत्यारोपणाच्या प्रामुख्याने दोन पद्धती प्रचलित आहेत. या दोन्ही पद्धतींमधील …

    Read More »
  • 8 March

    इन्स्टाग्रामचे भन्नाट फीचर

    इंस्टाग्राम या फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग ॲपने अलीकडेच आपल्या युजर्ससाठी एक नवे आकर्षक आणि उपयुक्त फिचर आणले आहे. या फिचरचे नाव रिस्टाईल विथ मेटा एआय असे असून याच्या मदतीने वापरकर्ते त्यांच्या जुन्या किंवा नवीन फोटोमध्ये लक्षणीय बदल करू शकतात आणि त्या फोटोला एक वेगळे व आकर्षक स्वरूप देऊ शकतात. हे फिचर केवळ फोटोपुरते मर्यादित नसून व्हिडिओ, रील्स आणि पोस्ट यांमध्येही …

    Read More »
  • 8 March

    तीस टन वजनाची उल्का!

    पृथ्वीवर अनेक वेळा उल्कावर्षाव होत असतो. अर्थात, पृथ्वीच्या वातावरणात येताच या अवकाशीय शिळा जळून त्यांचे छोटे तुकडेच जमिनीपर्यंत येत असतात. मात्र, पृथ्वीवर काळाच्या ओघात काही मोठ्या उल्काही कोसळलेल्या आहेत. अशीच एक उल्का अर्जेटिनातील कॅम्पो डेल सिएलो येथे उत्खननात सापडली होती. या उल्केचे वजन तब्बल तीस टन इतके आहे. ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी उल्का असल्याचे काहींचे म्हणणे आहे. विशेष …

    Read More »