सिझेरियन शस्त्रक्रिया किती वेळ सुरक्षित?

नेतृत्व हा कोणत्याही महिलेच्या जीवनातील अत्यंत सुखद अनुभव असतो, मात्र त्यासोबतच हा काळ शारीरिकदृष्ट्या तितकाच आव्हानात्मक असतो. नैसर्गिक प्रसूती न होता जेव्हा शस्त्रक्रियेद्वारे म्हणजेच सी-सेक्शनद्वारे बाळाचा जन्म होतो, तेव्हा परिस्थिती अधिक नाजूक बनते. शस्त्रक्रियेदरम्यान आणि त्यानंतर मातेच्या शरीरावर त्याचे दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. अशा वेळी सिझेरियन शस्त्रक्रिया किती वेळा करणे सुरक्षित आहे? हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. प्रसिद्ध गायनॅकॉलॉजिस्ट डॉ. प्रियंका यांनी इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून याविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे.
डॉ. प्रियंका यांच्या मते, सिझेरियन ही कोणतीही छोटी-मोठी प्रक्रिया नसून ती एक मेजर सर्जरी आहे. या शस्त्रक्रियेमध्ये पोटाचे एकूण 7 थर कापले जातात आणि बाळाच्या जन्मानंतर ते पुन्हा टाके घालून जोडले जातात. त्यामुळे शस्त्रक्रियांची संख्या जशी वाढते, तशी गुंतागुंत आणि जीविताचा धोकाही वाढत जातो. वारंवार त्याच ठिकाणी टाके घातल्यामुळे गर्भाशयाची भिंत कमकुवत होते. यामुळे पुढच्या प्रेग्नंसीमध्ये टाके उघडण्याचा किंवा गर्भाशय फाटण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
तज्ज्ञांच्या मते, सिझेरियन शस्त्रक्रियेची संख्या जितकी कमी असेल तितके चांगले. साधारणपणे दोन ते तीन वेळा केलेली शस्त्रक्रिया सुरक्षित मानली जाते.
तीनपेक्षा जास्त वेळा शस्त्रक्रिया केल्यास प्रसूतीदरम्यान रक्तस्त्राव होणे किंवा इतर अवयवांना इजा होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो.
यापेक्षा जास्त वेळा शस्त्रक्रिया करावी लागणार असेल, तर दोन मुलांमध्ये योग्य अंतर राखणे, नियमित तपासणी करणे आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहणे अनिवार्य आहे.

Check Also

पहिल्या पगारातून कायापालटाची कहाणी

तुमचा पहिला पगार 120 मुलांचे आयुष्य बदलू शकतो का? स्नेहा शर्मा यांची ही प्रेरणादायी कथा …