आपण सर्वजण कधी ना कधी वैयक्तिक आणि कौटुंबिक संकटांतून जातो, त्यांचा सामना करतो, त्यातून शिकतो आणि पुढे जातो. समाजाकडूनही हीच अपेक्षा असते. परंतु काय ही अपेक्षा बहुतेकदा पूर्ण होत नाही. याचे कारण सामूहिक परिणाम करणारी एखादी गोष्ट घडते किंवा संकट येते तेव्हा अविश्वासाचे, भीतीचे आणि लोभाचे चित्र सर्वदूर दिसते. त्यामुळेच एखादी अफवा पसरते आणि आपण विचार न करता तिच्या मागे …
Read More »इनर स्टोरी
भारतासाठी धोक्याची घंटा
जागतिक राजकारणाच्या पटावर सध्या मध्यपूर्वेतील घडामोडींनी एक अत्यंत स्फोटक वळण घेतले आहे. विशेषतः 28 फेब्रुवारी 2026 च्या रात्री इराण आणि अमेरिका यांच्यात जो अभूतपूर्व क्षेपणास्त्र संघर्ष झाला, तो आधुनिक युद्धतंत्राच्या भविष्यातील दिशेचा एक संकेत होता. इराणने अमेरिकेच्या सागरी सामर्थ्याचे केंद्र असलेल्या अब्राहम लिंकन या महाकाय विमानवाहू जहाजाला लक्ष्य करण्याचा जो धाडसी प्रयत्न केला, त्याने संपूर्ण जगाचे सामरिक लक्ष वेधून घेतले. …
Read More »नारीशक्तीच्या हाती विकसित भारताची दोर
अनेक दशकांपासून देशातील महिलांचे सामाजिक आणि आर्थिक सशक्तीकरणातील योगदान शून्य आहे, असे त्यांच्या मनावर बिंबवले गेले आणि चित्र निर्माण केले. अवमूल्यन करणाऱ्या या विचारसरणीमुळे साहजिकच या ‘आधी आबादी’ने आत्मसन्मान गमावला. त्यांच्या वेदना, समस्या या कोणाच्याच अजेंडयावर नव्हत्या. परंतु गेल्या दहा वर्षांमध्ये महिलाकेंद्री योजना तळागाळात पोहोचवण्यात आल्या आणि त्याचे सुपरिणाम प्रकर्षाने दिसून येऊ लागले. जगभरातील विकसित देशात कामकाज आणि उद्योग क्षेत्रात …
Read More »आव्हानांच्या बोजाखाली आयटी क्षेत्र
भारतीय आयटी उद्योग एका निर्णायक टप्प्यावर उभा आहे. स्वयंचलनामुळे पारंपरिक सेवा पद्धतींना आव्हान निर्माण झाले असले, तरी याच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने भारताच्या आर्थिक विकासाला नवी चालना मिळू शकते. योग्य धोरणे, कौशल्य विकास आणि नियोजन यांच्या आधारे या बदलत्या तंत्रज्ञानाला स्वीकारणे हेच पुढील काळात भारतासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. देशाची माहिती तंत्रज्ञान उद्योगव्यवस्था अनेक दशकांपासून भारतीय अर्थव्यवस्थेचा मजबूत आधारस्तंभ राहिली आहे; मात्र …
Read More »महामार्गावरील धावपट्टीचा संदेश
आंतरराष्ट्रीय स्तरावर पाहिले तर सिंगापूर, तैवान आणि स्वीडन सारख्या देशांनी आपल्या महामार्गांचा वापर लष्करी धावपट्टया म्हणून करण्याचे कसब आधीच आत्मसात केले आहे. भारतानेही त्याच धर्तीवर आपली सुरक्षा व्यवस्था अधिक लवचिक बनवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील मोरान येथे ‘सी-130 जे’ सुपर हर्क्युलिस विमानातून ज्या प्रकारे आपत्कालीन लँडिंग सुविधेवर (ईएलएफ) पदार्पण केले, ती प्रतीकात्मक कृती चीनच्या सीमेवर भारताच्या वाढत्या हवाई …
Read More »महाशिवरात्रीचा बोधार्थ
माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला येणारी महाशिवरात्री हा हिंदू धर्मियांमध्ये सर्वदूर साजरा होणारा एक महाउत्सव. आध्यात्मिक उन्नती,आत्मबोध आणि विश्वातील लयाचा हा उत्सव शिव आणि शक्तीच्या मीलनाचा सोहळा म्हणूनही साजरा होतो. चेतना आणि ऊर्जा एकरूप होऊन सृष्टीच्या संतुलनाचा संदेश देतात. मानवी जीवनातील अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश प्रज्वलित करण्याची ही पर्वणी मानली जाते. आपल्यातील अहंकार आणि षड्रिपूंचा नाश करून आत्मस्वरूपाकडे …
Read More »हरित महाराष्ट्राच्या स्वप्नपूर्तीसाठी…
जागतिक तापमानवाढीचे चटके आणि निसर्गाच्या बदलत्या चक्रामुळे निर्माण झालेली संकटे पाहता, 2026 हे वर्ष महाराष्ट्रासाठी एका नव्या हरित क्रांतीची पहाट ठरणार आहे. विकासाच्या धावपळीत मानवाकडून निसर्गाचे जे नुकसान झाले, त्याची भरपाई करण्यासाठी राज्य सरकारने आता कंबर कसली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2026 ते 2031 या 5 वर्षांच्या काळात तब्बल 300 कोटी वृक्षलागवडीचे महाभयंकर पण तितकेच महत्त्वाचे उद्दिष्ट राज्यासमोर ठेवले …
Read More »लिव्ह इन ची कोंडी
अलीकडेच मद्रास उच्च न्यायालयाने लिव्ह इन रिलेशनशिपच्या वाढत्या प्रस्थवरून चिंता व्यक्त केली. अशा संबंधामध्ये असलेल्या महिलांना जोडीदाराने पत्नीचा दर्जा देऊन सुरक्षा प्रदान करायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तरुण मुले-मुली स्वत:ला आधुनिक विचारसरणीचे पाईक मानतात आणि लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतात. मात्र कालांतरांने या संबंधातून विवाहासंस्थेसारखी सुरक्षा मिळत नसल्याचे लक्षात येते. पश्चिमेकडील संस्कृतीचा अंगीकार करणे म्हणजे पुढारलेपण असा …
Read More »रथसप्तमीचा भावार्थ
माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी ‘रथसप्तमी’ हा उत्सव देशभरात विविध पद्धतींनी साजरा केला जातो, पण त्यामागील भावना समान आहे. उत्तर भारतात छठपूजेसारखी सूर्योपासना, दक्षिणेत भव्य मंदिर विधी, पश्चिम भारतात तिळगुळाचे पदार्थ,तर पूर्व भारतात कृषीपर परंपरा, असे त्याचे विविध रंग दिसतात. तरीही सूर्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे, निसर्गाशी सुसंवाद साधणे आणि जीवनातील अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संकल्प करणे, हाच रथसप्तमीचा केंद्रबिंदू आहे. मकर …
Read More »लाडक्या बहिणी काय करतात?
अलीकडेच धाराशिव इथे पार पडलेल्या उद्योजकता विकास कार्यक्रमास सहभागी झालो होतो. तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या महिला प्रशिक्षणार्थींशी लाडकी बहीण योजनेबद्दल संवाद साधला. त्यांना मिळणाऱ्या या योजनेतल्या रकमेतूनत्या नेमके काय करतात आणि त्यांच्या आयुष्यात त्या दरमहा पंधराशे रुपयांनी किती दिलासा मिळतो याबाबत त्यांचे मनोगत जाणून घेतले. त्यातल्या बऱ्याच महिला या लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या पैशाचा वापर आपल्या मुलांच्या आणि मुलींच्या शिक्षणासाठी …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र