लेख-समिक्षण

इनर स्टोरी

लोकपरंपरेला अमरत्व देणारा स्वर

पंडवानी या लोककथागायन परंपरेला आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायकी, अभिनय आणि अद्वितीय सादरीकरणातून अमरत्व प्राप्त करून देणाऱ्या ज्येष्ठ लोकगायिका तीजनबाई आता आपल्यात नाहीत. अदम्य जिद्द, संघर्ष आणि कलेवरील निष्ठेच्या बळावर त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. काही आवाज असे असतात की ते अनेक पिढ्यांच्या मनोविश्वात कायमचे घर करून राहतात. कालांतराने ते लोकजीवनाच्या सामूहिक जाणिवेचाच भाग बनतात. आज छत्तीसगडच्या भूमीवर शतकानुशतके घुमणारी महाभारताची …

Read More »

संघर्षाची रेल्वे ‌‘रुळावर‌’ कधी?

तसं पाहिलं तर आपल्या आयुष्यातील रोजच्या संघर्षांना अंतच नाही. निवांत, निर्धास्त आयुष्य आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या नशिबी कुठे असते? इथल्या आपण या शब्दाचा अर्थ गॅस सिलिंडर, पेट्रोल पंप, बँका, पोस्ट ऑफिस, वीज कार्यालय, पाणीपुरवठा विभाग, महापालिका, रेल्वे, जनता दरबार, रुग्णालये अशा प्रत्येक ठिकाणी रांगेत उभे दिसणारे सामान्य नागरिक असा आहे. म्हणजेच रांग संस्कृतीचा भाग असलेले लोक. बाकी जे आपल्यासारखे नाहीत, ते …

Read More »

संकट गोड्या पाण्याचे

जागतिक बँकेच्या एका अहवालानुसार, जगभरात दरवर्षी सुमारे 324 ट्रिलियन लिटर म्हणजेच 85.6 ट्रिलियन गॅलन गोड्या पाण्याचा ऱ्हास होत आहे. हे प्रमाण तब्बल 28 कोटी लोकांची वार्षिक गरज भागवण्यासाठी पुरेसे आहे. वाढत्या जागतिक तापमानामुळे आणि भूगर्भातील पाण्याच्या अनिर्बंध उपशामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीला वाळवंटीकरण म्हणजेच जमिनीचे वेगाने वाळवंटात होणारे रूपांतर असे संबोधले जाते. जागतिक बँकेच्या एका अहवालानुसार, जगभरात दरवर्षी सुमारे 324 …

Read More »

चिरंतन सौंदर्याचा ध्यास

मानवी संस्कृतीच्या सुरुवातीपासूनच कायम तरुण आणि देखणे दिसण्याची इच्छा माणसाच्या मनात राहिली आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्राचीन काळातील नैसर्गिक उपचारांपासून ते आधुनिक काळातील विज्ञान, औषधोपचार आणि आता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. आधुनिक विज्ञानाच्या प्रगतीमुळे आता सौंदर्याचा एखादा कायमस्वरूपी तोडगा लवकरच उपलब्ध होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. 19 व्या शतकापासूनच विज्ञान या प्रश्नाचे …

Read More »

आता खरी परीक्षा

दिल्लीत सन 2014 पूर्वी झालेल्या अण्णा आंदोलनाचा हा दुसरा टप्पा असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. कारण, अण्णा आंदोलनाला संघ परिवाराचा पाठिंबा होता तसाच हा काहीसा प्रकार त्यापैकी अनेकांना वाटतो आहे. संघ परिवार, सरकार किंवा भाजप पक्ष यांच्याशी हातमिळवणी करूनच अभिजीत दिपके यांच्या या आंदोलनाचे नाटक सुरू केले गेले असावे, असे त्यांच्यापैकी अनेकांनी थेट स्वरूपात नमूद केले आहे. अण्णा हजारे यांनी काँग्रेस …

Read More »

क्रिकेटची अफू

नुकताच आयपीएल 2026 हंगाम संपला. काय बेफिकीर बनवून ठेवले त्याने! आणि या हंगामातील आकडे? ते तर या अफूची संपूर्ण कहाणी सांगतात. गणित ही फारच आश्चर्यकारक गोष्ट आहे. जरा विचार करा. आयपीएल 2026 तब्बल 220 अब्ज मिनिटे पाहिला गेला. 220 अब्ज मिनिटे म्हणजे 3,666,666,666.67 तास. म्हणजे 15.28 कोटी दिवस! म्हणजे 4.18 लाख वर्षे. डोके गरगरून जाईल नाहीतर काय होईल? म्हणजे केवळ …

Read More »

मॅनिफेस्टेशनचा बोलबाला

हल्ली सोशल मीडियावर रंगणाऱ्या पॉडकास्टमध्ये आणि रिल्समध्ये मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ ॲट्रॅक्शन यांवर आधारीत व्हिडिओ, मुलाखती यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. सकारात्मक विचारांमुळे माणसाच्या आयुष्याला योग्य दिशा मिळते, आनंदी आणि निरोगी जगण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन गरजेचा आहे, हे खरेच आहे; पण विचारांना कृतीची जोड न देता केवळ काल्पनिक क्रियांनी इच्छित गोष्टी साध्य होतात असे मानणे चुकीचे आहे. मानसशास्त्रज्ञ गॅब्रिएल ओटिंजेन यांनी मेंटल …

Read More »

नीट,झोप आणि झुरळं…

देशात शिक्षण, रोजगार आणि स्पर्धा परीक्षांचे जग आज इतके अस्थिर झाले आहे की, विद्यार्थ्यांच्या आयुष्यातून झोप, स्थैर्य आणि भविष्यावरील विश्वास हळूहळू नाहीसा होत चालला आहे. नीट प्रश्नपत्रिका गळतीच्या घटनेने केवळ परीक्षा व्यवस्थेतील त्रुटीच उघड केल्या नाहीत, तर मेहनत, प्रामाणिकपणा आणि संधी यांच्यातील नातेसंबंध किती कमकुवत होत चालले आहेत, हेही स्पष्ट केले. सततच्या स्पर्धा, अपूर्ण झोप, मानसिक थकवा आणि व्यवस्थेवरील कमी …

Read More »

आर्थिक दरी आणि भविष्याची चिंता

दुरावत चाललेल्या समाजात आशेचा शोध घेणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. आपल्या आजूबाजूला इतक्या विरोधाभासी गोष्टी एकाच वेळी घडताना दिसतात की समाज नेमका कोणत्या दिशेने चालला आहे, हा प्रश्न सतत पडत राहतो. एका बाजूला विकासाचे दावे, वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेची आकडेवारी आणि आधुनिकतेच्या चमकदार कथा आहेत; तर दुसऱ्या बाजूला रोजच्या जगण्यासाठी झगडणारा सामान्य माणूस, नोकरीची असुरक्षितता, वाढती आर्थिक दरी आणि भविष्याबद्दलची …

Read More »

विरोधकांपुढे आव्हान

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल हे भारतीय राजकारणातील एका मोठ्या वैचारिक परिवर्तनाचे प्रतीक आहेत. भारतीय जनता पक्षासाठी पूर्व भारताचे प्रवेशद्वार मानले जाणारे हे राज्य आता त्यांच्या ताब्यात आले आहे. या विजयाने हे स्पष्ट केले आहे की, जिथे जिथे भाजपसाठी यशाची नवीन द्वारे उघडत आहेत, तिथे तिथे विरोधकांसाठी राजकीय रस्ते कायमचे बंद होत आहेत. सद्यस्थितीत भारतीय राजकारणात ‌’सत्ताविरोधी‌’ लाटेपेक्षा ‌’सत्तासमर्थक‌’ राजकारणाचे …

Read More »