लेख-समिक्षण

इनर स्टोरी

आले फ्लाईंग कारचे युग

नवाच्या कल्पनाशक्तीने विज्ञानाला नेहमीच दिशा दिली आहे. शतकानुशतकं माणूस जमिनीवरून आकाशाकडे पाहत राहिला आणि त्या आकाशात झेप घेण्याचं स्वप्न पाहत राहिला. हेच स्वप्न प्रथम विमानांच्या रूपाने साकारले, आणि आता त्याच स्वप्नाचा पुढचा टप्पा म्हणजे ‘उडणारी कार’ किंवा ‘फ्लायिंग कार’. विज्ञानकथांमध्ये, चित्रपटांत आणि कल्पनारम्य कथांमध्ये आपण अशा कार पाहिल्या होत्या; पण आता त्या कल्पना प्रत्यक्ष वास्तवात उतरू लागल्या आहेत. आगामी काळात …

Read More »

आयात डाळीचे संकट

भारत हा जगातील सर्वात मोठा डाळ उत्पादक देश आहे. जगातील एकूण डाळीच्या लागवडीपैकी तब्बल ३५.८७ टक्के क्षेत्र भारतात आहे. परंतु उत्पादनाच्या प्रमाणात आपला वाटा केवळ २७.४ टक्के इतकाच आहे. म्हणजेच लागवड जास्त, पण उत्पादन कमी. या तफावतीमुळे भारत जगातील सर्वात मोठा डाळ आयातदार बनला आहे. देशात डाळींचा सध्याचा उपभोग सुमारे २९ दशलक्ष टन इतका आहे, तर उत्पादन केवळ २५.२३८ दशलक्ष …

Read More »

निराशेतून आशेचा शोध घेणारा साहित्यक

दरवर्षी साहित्यातील नोबेल कुणाला जाहीर होणार याकडे सर्व साहित्यप्रेमींचे, वाचनप्रेमींचे लक्ष लागून राहिलेले असते. हा पुरस्कार जगभरातील साहित्य कलाकृतींमधील सर्वोत्कृष्ट साहित्याला दिला जात असल्याने त्याचे मोल अनन्यसाधारण असते. गतवर्षी दक्षिण कोरियाच्या लेखिका हान कांग यांची निवड या पुरस्कारासाठी झाली होती. यंदाच्या वर्षी स्वीडिश अकादमीने साहित्यातील नोबेल पुरस्कारासाठी हंगेरीच्या लास्झलो क्रॅस्नाहोरकाई यांची निवड केली आहे. हा पुरस्कार जाहीर करताना स्वीडिश अकादमीने …

Read More »

एआय मुळे बुद्ध्यांक खालावतोय?

शिकण्याचा मुद्दा येतो तेव्हा त्यात विचार करणे अणि मेहनत करणे क्रमप्राप्त ठरते. यातूनच विश्लेषणात्मक विचार करण्याचे कौशल्य विकसित होते. एखादा निबंध लिहण्यासाठी किंवा अन्य कामासाठी विद्यार्थी किंवा तरुण चॅटजीपीटीचा वापर करतात तेव्हा ते शिकण्याची क्षमता नकळतपणे कमी करतात. एआय शिकण्याच्या कामात अडचणी आणतो, तेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या बुद्ध्यांकाचे होणारे नुकसान कळत नाही आणि ते नकळतपणे त्याच्या आहारी जातात. पालकांचे लक्ष मात्र …

Read More »

न्यायिक सुधारणांचे अवकाश

न्यायपालिका ही आर्थिक व सामाजिक पायाभूत रचनेचा भाग असून ती वेगवान व निष्पक्ष असणं आवश्यक आहे, पण प्रत्यक्षात ती प्रलंबित खटल्यांच्या ओझ्याखाली दबलेली दिसते. या परिस्थितीमुळेच लोकांना न्यायालयात जाण्याची भीती वाटते. दहा-वीस वर्षेचाललेले दहशतवादविरोधी खटले, मोठमोठ्या घोटाळ्यांतील दशकानुदशके चाललेली सुनावणी आणि शेवटी आरोपींची निर्दोष सुटका हे सर्व नागरिकांमध्ये तसेच गुंतवणूकदारांमध्ये न्यायव्यवस्थेच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्न निर्माण करणारे ठरण्याची भीती असते. यामुळे परदेशी …

Read More »

जीएसटी सुधारणा आणि कंपन्यापुढे पेच

भारतातील ग्राहक वस्तूंच्या बाजारपेठेत एक नवा टप्पा सुरु झाला आहे. वस्तू आणि सेवा कराच्या दुसर्‍या टप्प्यातील सुधारणा म्हणजेच जीएसटी २.० लागू झाल्यानंतर सर्वसामान्यांच्या खरेदी पद्धती, कंपन्यांची किंमत ठरवण्याची नीती आणि संपूर्ण पुरवठा साखळी यामध्ये लक्षणीय बदल होणार आहेत. दशकानुदशके ग्रामीण आणि शहरी बाजारपेठेत समान महत्त्व राखणारे ५ रुपये व १० रुपयांचे पॅक आता हळूहळू गायब होत आहेत. या किमती म्हणजेच …

Read More »

प्रस्थापितांसाठी इशारा

नेपाळपासून श्रीलंका आणि इराणपासून म्यानमार आणि फ्रान्सपर्यंत सर्वत्र जनतेच्या असंतोषाच्या मुळाशी दैनंदिन संघर्षमय जीवन आहे. जगाची मोठी लोकसंख्या ही युवा आहे आणि आजच्या काळातील युवा सजग, जागरूक आणि प्रश्न विचारणारा आहे. त्यांच्यात त्यांच्या पालकांसारखा किंवा वडीलधार्‍यांसारखा धीर, संयम नाही की एखाद्या सुंदर उद्याच्या प्रतीक्षेत आयुष्य घालवण्याची त्यांची तयारी नाही. जनरेशन झेडला वचनांचे, आश्वासनांचे राजकारण नको आहे, त्यांना आज आणि आत्ताच …

Read More »

नेपाळमधील अराजकाच्या मुळाशी

भारताचा शेजारी देश असणारा नेपाळ हा गेल्या जवळपास दशकभरापासून अस्थिरता-अस्वस्थता आणि अशांतता यांच्या मगरमिठीत सापडला आहे. राजेशाही व्यवस्थेचा त्याग करुन नेपाळने लोकशाहीची कास धरली खरी; पण दहा वर्षेउलटूनही तेथे लोकशाही व्यवस्था खर्‍या अर्थाने नावारुपाला आलीच नाही. सुरुवातीला राज्यघटना निर्मितीसाठी प्रचंड खल झाला. त्यानंतर राजकीय अस्थिरतेचे ग्रहण नेपाळला लागले ते कायमचेच. आज नेपाळ राजकीय आणि सामाजिक संकटाच्या नव्या वळणावर पोहोचला आहे. …

Read More »

वेध ‘समुद्रयान मिशन’चा

भारतीय अवकाश संशोधनाने जगाला भुरळ घातली आहे. चांद्रयान, मंगळयान आणि गगनयानासारख्या प्रकल्पांमुळे भारत आज अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात अव्वल ठरला आहे. पण आता केवळ आकाशच नव्हे तर अथांग महासागराकडेही भारताचे लक्ष वेधले गेले आहे. ‘समुद्रयान मिशन’ही त्या दृष्टीने भारताची एक धाडसी झेप आहे. ६००० मीटर खोलीपर्यंत मानवाला समुद्राच्या तळाशी नेणारा हा प्रकल्प केवळ वैज्ञानिक संशोधनापुरता मर्यादित नाही, तर देशाच्या भविष्यातील अर्थव्यवस्था, …

Read More »

एआय आणि भारतीय निवडणुकीचे भवितव्य

आर्टिफिशियल इंटिलिजन्स हळूहळू भारत आणि जगातील निवडणुकीच्या प्रक्रियेवर परिणाम करत आहे. त्याचा वाढता प्रभाव पाहता एआय शाप की वरदान याभोवती चर्चा फिरत आहे. आजघडीला विविध क्षेत्रात एआयचा वापर वाढलेला असताना निवडणूक प्रक्रिया देखील त्यापासून अपवाद राहिली नाही. या माध्यमातून राजकीय पक्ष, उमेदवार हे मतदारांना आकर्षित करत आहेत आणि त्यांना आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत एआयचा …

Read More »