लेख-समिक्षण

इनर स्टोरी

मिमांसा मान्सूनच्या लहरीपणाची

भारतीय हवामान खात्याने यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवलेली असतानाच मे महिन्याच्या उत्तरार्धातच वरुणराजाने आगमन करत धुवाँधार बरसात केली खरी; पण त्यानंतर मान्सूनने दडी मारल्यामुळे पेरण्यांसाठी खोळंबलेला शेतकरी संभ्रमात पडला आहे. भारतात आजही शेती ही अर्थव्यवस्थेची कणा आहे. शेतकर्‍यांना मान्सून एक विशिष्ट वेळेला येईल अशी अपेक्षा असते. पण हवामान बदलांमुळे मान्सूनचा लहरीपणा वाढला आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे महासागराचे तापमान वाढत आहे. …

Read More »

रणरागिणी रणांगणात…

शुक्रवार,३० मे,२०२५ हा भारतीय लष्कर आणि त्याचे खडकवासलामधील मूलभूत गुरुकुल म्हणजेच एनडीए या दोघांसाठी एक ऐतिहासिक दिवस ठरला. या दिवशी एकूण १७ महिला कॅडेटसच्या पहिल्या बॅचने, ३०० समकक्ष पुरुष कॅडेट्सबरोबर एनडीएच्या विस्तीर्ण परेड ग्राउंडमधून मार्च करत आपला अंतिम पग मेन ब्लॉकमध्ये टाकला. एनडीएसाठी हा खूप अभिमानास्पद, ऐतिहासिक क्षण आहे. या महिला कॅडेट्सनी एनडीएचा झेंडा उंच फडकवला आहे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं …

Read More »

भुजबळांचे पुनरागमन

ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा समावेश अखेर राज्य मंत्रिमंडळात झाला आहे. त्यांना महायुतीच्या विद्यमान सरकारमध्ये प्रारंभी डावलले जाणे आणि आता आकस्मिकपणे मंत्रिपद बहाल केले जाणे, या दोन्ही बाबी असंख्य राजकीय कार्यकर्त्यांसाठी अनाकलनीय आहेत. हाविकास आघाडीने गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात घवघवीत यश मिळविले. असाच निकाल त्यानंतर जेमतेम सहा महिन्यांनी होत असलेल्या विधानसभेच्या रिंगणातही लागेल, असा आत्मविश्वास आघाडीच्या नेत्यांना होता. प्रत्यक्षात त्याच्या …

Read More »

संघर्षविरामावरुन अनाठायी गहजब

’ऑपरेशन सिंदुर’ अंतर्गत भारताने पाकिस्तानला योग्य तो धडा शिकवला आहे. तरीही संघर्षविरामानंतर समाजमाध्यमांमधून काही अनाठायी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पण आपण लक्षात घेतले पाहिजे की भारताने आपल्या सैन्याला पाकिस्तानी लष्करी तळ काबीज करण्याचे किंवा पाकव्याप्त भारतीय काश्मीरला आपल्या प्रजासत्ताक काश्मीरमध्ये परत जोडण्याचे आदेश अथवा उद्दिष्ट दिलेलेच नव्हते. आपला उद्देश दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करणे आणि प्रतिहल्ला करणार्‍या पाकिस्तानला धडा शिकवणे …

Read More »

वैशिष्ट्ये ऐतिहासिक कारवाईची

पहलगाममध्ये झालेल्या दशहतवादी हल्ल्याला भारत प्रत्युत्तर कधी देणार, या प्रश्नाचे उत्तर मॉकड्रीलसाठी निवडलेल्या ७ मे रोजी पहाटे सबंध देशाला मिळाले. भारताने केलेल्या एअरस्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करण्यात आले असून सुमारे १०० हून अधिक दहशतवादी यामध्ये मारले गेले आहेत. ‘ऑपरेशन सिंदुर’ असे अत्यंत मार्मिक नाव देऊन आखण्यात आलेले हे मिशन अत्यंत नियोजनबद्धरित्या यशस्वी करण्यात आले. हा भारताने केलेला हल्ला नसून …

Read More »

काश्मीरमधील पर्यटनाचे काय होणार?

काश्मीरमध्ये सुमारे 5 लाख लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे पर्यटन उद्योग व व्यवसायातून रोजगार मिळालेला आहे. तेथील बहुसंख्य लोकांसाठी टॅक्सी सेवा, हॉटेल, मार्गदर्शक, हस्तकला व पर्यटनाशी संबंधित इतर व्यवसाय हे उपजीविकेचे प्रमुख साधन आहे. तथापि, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये विक्रमी संख्येने येणार्‍या पर्यटकांची संख्या आता घटताना दिसत आहे. मोठ्या प्रमाणात पर्यटक आपली हॉटेल व फ्लाइट बुकिंग रद्द करत आहेत. याचा थेट …

Read More »

झळा पाणीटंचाईच्या

नवीन वर्षात जानेवारी 25 पासूनच राज्यात अनेक जिल्ह्यात गावोगावी वाड्यांवर महत्त्वाच्या शहरात तेथील अनेक सोसायट्या दरम्यान, गृहप्रकल्पात टँकर फेर्‍या वाढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुंबई महानगर सुद्धा याला सध्या अपवाद नाही. आज अनेक वर्षापासून भूगर्भातले पाणी उपसणे नियंत्रणात आणण्यासाठी कायदा अस्तित्वात असून त्याची म्हणावी तशी अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. राज्यातील अनेक ठिकाणच्या धरणांमधील सातत्याने पाणी कमी होऊ लागल्याचे अत्यंत विदारक …

Read More »

साक्षर राज्यातलं भेदक वास्तव

निसर्गानं मुक्त हस्तानं वरदान केलेल्या केरळ राज्यात सोनेरी भविष्याच्या शोधात आखाती देशांमध्ये जाण्याची स्पर्धा आहे. या राज्यात प्रत्येक पाचव्या घरातून एक व्यक्ती परदेशात गेली आहे. परदेशातून येणार्‍या ‘रेमिटन्स’मुळे केरळमधील अनेक कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळाले. गावागावात भव्य घरं, आधुनिक गाड्या आणि शहरी जीवनशैली दिसू लागली. पण ही उन्नती एकाकीपणाची सावली घेऊन आली. तरुण मुलं-मुली शिक्षण पूर्ण होताच परदेशात गेले आणि गावात …

Read More »

अवकाळीनं मोडले कंबरडे

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरील बाष्पयुक्त वार्‍यांचा संगम होऊन मागील आठवड्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांत वीजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने थैमान घातल्याचे दिसून आले. या पावसाचा मोठा फटका शेतकर्‍यांना बसला आहे. यादरम्यान झालेल्या गारपिटीमुळे रब्बी हंगामातील गहू, कांदा, डाळिंब, भाजीपाला, द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जवळपास 1400 हेक्टरवरील पीकाला याचा फटका बसला आहे. बेमोसमी पाऊस आणि त्यामुळे शेतीचे आणि शेतकर्‍यांचे …

Read More »

वादळ बेताल ‘ग्रोक’ चे

भारतात आता चॅटजीपीटीनंतर आणखी एका एआय मॉडेलची जोरात चर्चा असून एलॉन मस्कच्या एक्सएआय कंपनीच्या ‘ग्रोक-3’ चा गाजावाजा होत आहे. या टूलने अनफिल्टर्ड आणि धाडसी वक्तव्यांनी हाहाकार माजवला आहे. एलॉन मस्क यांच्याप्रमाणेच ग्रोकही बिनधास्त आहे. त्याला जे योग्य वाटते, ते बोलून टाकतो. अगदी प्रश्न कोण विचारत आहे, याची पर्व न करता. शिवाय कोणत्या संदर्भात विचारणा केली जात आहे, याचा विचार न …

Read More »