गेल्या काही वर्षांत क्रेडिट कार्डच्या चक्रव्यूहात अडकलेल्यांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. परिणामी, बँकिंग क्षेत्रापुढे, खास करुन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना त्यांच्या क्रेडिट कार्ड पोर्टफोलिओमध्ये वाढत्या थकबाकीचे आव्हान निर्माण झाले आहे. रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार, जानेवारी 2025 अखेर भारतातील एकूण क्रेडिट कार्ड थकबाकी 2.9 लाख कोटी रुपये होती, जी गेल्या वर्षभरात 13 टक्क्यांनी वाढली आहे. संपूर्ण बँकिंग क्षेत्रातील सरासरी क्रेडिट कार्ड थकबाकीचे …
Read More »इनर स्टोरी
‘शिवशाही’ची दारुणावस्था
आठ वर्षांपूर्वी भाजपा-शिवसेना युतीच्या काळात राज्यात शिवशाही बससेवेची सुरुवात झाली. राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना किफायतशीर दरामध्ये वातानुकूलित गाडीतून लांबचा प्रवास करता यावा या उद्देशाने शयन आणि आसनी अशा दोन्ही स्वरुपात या बससेवेचा प्रारंभ झाला खरा; परंतु सुरुवातीपासूनच या बसेसविषयी नागरिकांच्या तक्रारी पाहायला मिळाल्या. विशेषतः शिवशाहीला होणार्या अपघातांनी नागरिकांमध्ये भीती पसरलेली दिसून आली आणि आजही ती कायम आहे. नादुरुस्त बस, अधूनमधून बंद …
Read More »दीदींचे फासे, भाजपचे उसासे!
हल्दियाचे आमदार तापसी मंडल यांचा पक्षात समावेश करून तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का दिला आहे. 2026 च्या विधानसभा निवडणुकीला अद्याप बराच काळ असला तरी पश्चिम बंगालमध्ये आतापासूनच चढाओढ सुरू झाल्याचे यावरुन दिसत आहे. ममता बॅनर्जी यांनी टीएमसी सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांशी संपर्क साधण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. 2021 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचे 12 आमदार टीएमसीमध्ये सामील झाले …
Read More »थरुरांचे काय होणार?
केरळमधील काँग्रेसचा चेहरा असणारे शशी थरूर हे सध्या भाजप नेत्यांच्या जवळीकतेवरून चर्चेत आहेत. केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्यासमवेतच्या सेल्फीने ते पुन्हा राजकीय वादात सापडले आहेत. शिवाय काँग्रेसही गेल्या काही वर्षांपासून थरूर यांना मुख्य प्रवाहात सामील करून घेताना दिसत नाही. आता केरळची विधानसभा निवडणूक दीड वर्षावर आलेली असताना भाजपचे नेते तेथे सत्ता मिळवण्यासाठी थरुर यांना आपल्या तंबूत ओढतील का? असा प्रश्न …
Read More »कायद्याने ‘हमी’ मिळेल?
भारत हा जेनेरिक औषधांचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. जगभरातील मागणीच्या तुलनेत वीस टक्के पुरवठा भारतातून केला जातो. अमेरिकेला 40 टक्के आणि ब्रिटनला 25 टक्के औषधी भारतातून जातात. 2018-19 मध्ये देशातून सुमारे 1,920 कोटी डॉलरच्या औषधांची निर्यात करण्यात आली. आता केंद्र सरकार रुग्णांना स्वस्तात औषधी उपलब्ध करुन देण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याची तयारी करत आहे. यानंतर डॉक्टरांना रुग्णांसाठी ब्रँडेड नाही तर …
Read More »व्यवस्थापनाचा ‘कुंभ’ रिकामाच!
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीचा प्रकार नवीन नाही. यापूर्वी दिवाळी, छटपूजेच्यावेळी गर्दीचा उच्चांक राहिलेला आहे आणि चेंगराचेंगरीचे प्रकारही घडले आहे. पण त्यावेळी जखमींची संख्या फारशी नसल्याने पुढे फार उपायांची आवश्यकता रेल्वेला वाटली नाही. पण यावेळी कुंभमेळ्याला जाणार्या भाविकांनी गर्दीचे उच्चांक मोडले आणि दुर्घटना घडली. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी छटपूजेच्या वेळी देखील अशीच चेंगराचेंगरीची घटना घडली होती. त्यानंतर रेल्वेने छटपूजेच्या काळात रेल्वे …
Read More »आव्हान विद्यार्थ्यांच्या ‘पानगळी’ चे
काही दिवसांपूर्वी आयआयटी रुरकी येथे बीटेकच्या दुसर्या वर्षात शिकणार्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. या संस्थेत गेल्या वर्षभरात तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. आयआयटी संस्थांत देशातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. अशावेळी उच्च शिक्षण देणार्या संस्थांतील विद्यार्थ्यांची आत्महत्या ही चिंताजनक बाब आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, गेल्या दोन दशकांत विद्यार्थ्यांनी आत्महत्या करण्याच्या प्रमाणात दोन टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या दहा वर्षात तर विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचा दर …
Read More »चीनचे ‘मनाचे’ उद्योग
माहिती-तंत्रज्ञानाने जग जवळ आणले हे वास्तव असले तरी या प्रक्रियेने काही धोकेही जवळ आले आहेत. आज इंटरनेटच्या विश्वातील गुन्हेगारांची संख्या ही प्रत्यक्ष जमिनीवरील चोर-लुटेरे, डाकू यांपेक्षा मोठी बनत चालली आहे. तशाच प्रकारे शत्रू राष्ट्राला हादरे देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर राष्ट्रे मोठ्या प्रमाणावर करत चालली असून त्यामाध्यमातून प्रत्यक्ष युद्धातील हानीप्रमाणे वित्तीय नुकसान होताना दिसत आहे. विघातक कृत्यासाठी तंत्रज्ञानाच्या पोटातून काही आविष्कार जाणीवपूर्वक …
Read More »प्रोत्साहनाची थाप
दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केल्या जाणार्या पद्म पुरस्कारांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेले असते. साहित्य, कला, कृषी, क्रीडा, उद्योग, शिक्षण, सामाजिक कार्य, संशोधन आदी क्षेत्रात अमूल्य योगदान देणार्या व्यक्तींना या पुरस्काराने गौरवण्यात येतो. याहीवेळी पद्म विजेत्यांत देशातील आणि विदेशातील नामवंताचा समावेश असून त्यापैकी काही जण प्रसिद्धीपासून नेहमीच दूर राहिलेले आहेत. गेल्या दहा वर्षांमध्ये या पुरस्कारांमध्ये राजकीय हित बाजूला सारुन …
Read More »हिप हिप हुर्ये…
कबड्डी आणि खोखोसारखे क्रीडाप्रकार हे वर्षानुवर्षे गावाखेड्यातील शाळांमधील मुले-मुली खेळत आले आहेत. या मैदानी खेळातून शारीरिक विकासाबरोबरच सांघिकतेचे गुण विकसित होत जातात. परंतु तरीही या क्रीडाप्रकारांची क्रिकेटच्या तुलनेत उपेक्षाच झाली होती. मध्यंतरी कबड्डी प्रो लिगमुळे या खेळाचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनद्वारे खो-खो विश्वचषक स्पर्धांचे आयोजन करुन आणखी एक मोठे पाऊल टाकण्यात आले. या स्पर्धेमध्ये भारताच्या पुरुष …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र