लेख-समिक्षण
  • 9 august 2026

अंक मिळणेसाठी


एकूण वाचक संख्या : 4212

TimeLine Layout

February, 2025

  • 16 February

    देवीयों और सज्जनो…

    भरपूर मसाला असणार्‍या कौटुंबिक कथानकांवर आणि पौराणिक साहित्यावर आधारीत मालिकांनी प्रदीर्घ काळ छोट्या पडद्यावर राहण्याचा विक्रम केल्याची अनेक उदाहरणे आहेत; परंतु सलग अडीच दशकं टिव्हीवर चालणारा ‘कौन बनेगा करोडपती’ अर्थात केबीसी हा कदाचित एकमेव गेम शो असावा. एखादी मालिका टिव्हीवर सुरू असेपर्यंतच ती प्रेक्षकांच्या ध्यानात राहते. पण केबीसी याला अपवाद ठरले. वर्षांत दोन ते अडीच महिने या कार्यक्रमाचे प्रसारण होते …

    Read More »
  • 16 February

    एक्सरसाईजनंतर हात थरथरतात?

    फिट आणि फाईन राहणं हे प्रत्येक तरुण-तरुणींची सर्वांत आवडती बाब असते. अलीकडील काळात हेल्थअवेअरनेस प्रचंड वाढला आहे. यासाठी अनेकजण एक्सरसाईज करतात. जीममध्ये घामही गाळला जातो. अनेकदा जीममध्ये वजन उचलल्याने किंवा एक्सरसाईज केल्याने काहींंचे हात थरथरू लागतात. वर्कआउटनंतर हात थरथरणं ही बर्‍याच लोकांना जाणवणारी एक सामान्य समस्या बनली आहे. मात्र काही वेळाने हात स्वत:हून थरथरणं आपोआप थांबतं. जेव्हा आपण व्यायाम करतो …

    Read More »
  • 16 February

    संगोपनाचे आव्हान आणि आई

    आई म्हणून मुलाचे संगोपन करणे हे एक मोठे आव्हान असते आणि हे आव्हान पूर्ण करण्यात आईच्या आयुष्याचा मोठा भाग जातो. यादरम्यान आईच्या संयमाची सत्वपरीक्षा असते. लहान मुलं तांडव करतात, हट्टी असतात आणि अनेक चुका करतात, अशा परिस्थितीत आईला धीर न सोडता त्यांना सांभाळणे गरजेचे असते. मुले मोठी होईपर्यंत आईचा बहुतेक वेळ त्यांची काळजी घेण्यात जातो. पण, याचा अर्थ असा नाही …

    Read More »
  • 16 February

    वार्धक्य रोखायचंय?

    वार्धक्य रोखण्याबाबत सतत नवनवे संशोधन होत असते. आहारातील बदलही यासाठी उपयुक्त ठरत असतात. कमी कर्बोदके व कमी उष्मांक असलेला आहार हा वार्धक्याच्या प्रक्रियेचा वेग कमी करतो. कारण त्यात विशिष्ट प्रकारचे संयुग असते, असे वैज्ञानिकांचे मत आहे. ग्लॅडस्टोन प्रयोगशाळेतील संशोधक एरिक वेर्दिन यांनी सांगितले की, मानवी शरीरातील एक संयुग हे वार्धक्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. वयाशी निगडित असलेले हृदयरोग, …

    Read More »
  • 16 February

    जिज्ञासेतून उभारली कंपनी आणि…

    चेन्नईतील बायोटेक्नॉलॉजी पदवीधर अनिस अहमद यांना लहानपणापासून निसर्ग आणि गार्डनिंगची विशेष आवड होती. नारळसमृद्ध भागात वाढलेले असल्यामुळे त्यांना वडिलांच्या मार्गदर्शनाने कोको पीट या संकल्पनेची ओळख झाली. बायोटेक्नॉलॉजीची पदवी पूर्ण केल्यानंतर अनिस यांनी एडिनबर्ग युनिव्हर्सिटी आणि सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रॅकिशवॉटर अ‍ॅक्वाकल्चर येथे संशोधक म्हणून काम केले. याच काळात त्यांची कोको पीटविषयीची जिज्ञासा वाढली आणि त्यांनी या पदार्थाच्या गुणधर्मांबद्दल सखोल संशोधन सुरू …

    Read More »
  • 16 February

    स्वागतार्ह पाऊल

    राजकीय गुन्हेगारीकरणामुळे लोकशाहीचे होत असलेले वस्त्रहरण थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठाने निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला यासंदर्भात जाब विचारुन लोकशाहीचे पवित्र मंदिर असलेल्या संसद आणि विधानसभांच्या स्वच्छतेसाठीचे स्वागतार्ह पाऊल टाकले आहे. देशातील खासदार आणि आमदारांविरोधातील फौजदारी प्रकरणे तातडीने निकाली निघावी आणि दोषी नेत्यांवर आयुष्यभर निर्बंध लादण्याची मागणी एका जनहित याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली …

    Read More »
  • 16 February

    अमरपट्ट्याची विक्री

    सर्वांत प्रगत आणि किफायतशीर चॅटबॉट कुणाचा, यावरून ओपन एआय आणि चीनचे डीपसीक यांच्यात संघर्ष सुरू असण्याच्या काळातसुद्धा मानवजातीच्या इतिहासातलं सर्वांत जुनं वास्तव बदललेलं नाही. ते म्हणजे, पृथ्वीच्या पाठीवरचं सगळ्यात गुंतागुंतीचं, आश्चर्यजनक आणि अमूल्य यंत्र म्हणजे मानवी शरीर. मानवी जीवनात प्रत्येक वस्तूला पर्याय देता येईल; पण मानवी शरीराला पर्याय नाही. हे यंत्र बिघडलं तर दुरुस्त होऊ शकतं; पण संपलं की त्याचं …

    Read More »
  • 16 February

    निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाचा चाप

     ईव्हीएमच्या पडताळणीसाठी धोरण आखण्याची मागणी करणार्‍या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली. या याचिकेत निवडणूक आयोगाने ईव्हीएमच्या मेमरी/मायक्रोकंट्रोलरची चाचणी आणि पडताळणीसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची मागणी केली आहे. त्यावर सुनावणी करत न्यायालयाने निवडणूक आयोगाकडून उत्तर मागितले असून, सध्या ईव्हीएममधून कोणताही डेटा हटवू नका किंवा कोणताही डेटा रि-लोड करू नका, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर)च्या या …

    Read More »
  • 16 February

    पातळीहीनतेचे रणवीर नाट्य

     काही दिवसांपूर्वीच प्रसारित झालेल्या एका मालिकेत युटयूबर रणवीर अलाहाबादियाने अतिशय हिन पातळीवर भाष्य करत वाद निर्माण केला आणि एका नव्या चर्चेला तोंड फुटले. प्रत्यक्षात दृक श्राव्य माध्यमात आक्षेपार्ह मुद्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही तरतूदी आहेत. पण सोशल मीडियाने मात्र हे सर्व नियम धाब्यावर बसविले. सोशल मीडियाचा दुष्परिणाम म्हणजे लोकप्रियता आणि लाइक मिळ्वण्यासाठी पातळी सोडून कंन्टेट तयार केला जात आहे. एवढेच नाही …

    Read More »
  • 16 February

    आव्हान विद्यार्थ्यांच्या ‘पानगळी’ चे

    काही दिवसांपूर्वी आयआयटी रुरकी येथे बीटेकच्या दुसर्‍या वर्षात शिकणार्‍या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. या संस्थेत गेल्या वर्षभरात तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. आयआयटी संस्थांत देशातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. अशावेळी उच्च शिक्षण देणार्‍या संस्थांतील विद्यार्थ्यांची आत्महत्या ही चिंताजनक बाब आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, गेल्या दोन दशकांत विद्यार्थ्यांनी आत्महत्या करण्याच्या प्रमाणात दोन टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या दहा वर्षात तर विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचा दर …

    Read More »