चेन्नईतील बायोटेक्नॉलॉजी पदवीधर अनिस अहमद यांना लहानपणापासून निसर्ग आणि गार्डनिंगची विशेष आवड होती. नारळसमृद्ध भागात वाढलेले असल्यामुळे त्यांना वडिलांच्या मार्गदर्शनाने कोको पीट या संकल्पनेची ओळख झाली.
बायोटेक्नॉलॉजीची पदवी पूर्ण केल्यानंतर अनिस यांनी एडिनबर्ग युनिव्हर्सिटी आणि सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रॅकिशवॉटर अॅक्वाकल्चर येथे संशोधक म्हणून काम केले. याच काळात त्यांची कोको पीटविषयीची जिज्ञासा वाढली आणि त्यांनी या पदार्थाच्या गुणधर्मांबद्दल सखोल संशोधन सुरू केले. त्यांना आढळले की कोको पीट, ज्याला ‘कोको पिठ’ असेही म्हणतात, हे नारळाच्या भुसापासून तयार होणारे उपउत्पादन आहे. फायबर वेगळे काढल्यानंतर हे उरते आणि पूर्वी ते फक्त कचर्यासारखे फेकले जात असे. मात्र, यामध्ये मोठी क्षमता आहे हे ओळखून अनिस यांनी 2013 मध्ये चेन्नई येथे ‘ग्लोबल ग्रीन कॉयर’ या स्टार्टअपची स्थापना केली.
ग्लोबल ग्रीन कॉयर हायड्रॉलिक मशीनच्या मदतीने कोको पीटचे ब्लॉक्स तयार करते, जेणेकरून त्याचा वाहतूक खर्च कमी होईल आणि अधिक प्रमाणात साठवणूक करता येईल. जेव्हा अनिस यांनी या क्षेत्रात पाऊल ठेवले, तेव्हा कोको पीट तुलनेने कमी प्रचलित होते आणि केवळ काही कंपन्या त्याचा वापर करत होत्या. मात्र, आज ग्रीनहाऊस, नर्सरी, इनडोअर गार्डनिंग आणि मातीला पर्याय म्हणून कोको पीटचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे.
हे स्टार्टअप नारळाच्या भुसापासून कोको पीटचा वापर करून पॉट्स, ब्रिक्स, ब्लॉक्स आणि ग्रोथ बॅग्स यांसारखी उत्पादने तयार करते, जी आंतरराष्ट्रीय बाजारात निर्यात केली जातात. भारतातही पंजाब, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि उत्तराखंडमध्ये ही उत्पादने मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. विविध उत्पादनांसाठी कंपनी दर महिन्याला सुमारे 200 ते 250 टन कोको पीटचा वापर करते.
आज, ‘ग्लोबल ग्रीन कॉयर’ ही कंपनी 75 कोटी रुपयांच्या वार्षिक उलाढालीसह अनेक देशांमध्ये कोको पीट निर्यात करत आहे आणि पर्यावरणपूरक गार्डनिंगसाठी एक महत्त्वाचा ब्रँड बनली आहे.
निसर्गातील कोणतीच गोष्ट टाकावू नसते ही बाब वरील संशोधनावरुन स्पष्ट होत नाही काय?
Check Also
शून्यातून बनला कोट्याधीश…
शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस यशाची कोणतीही शिखरं सर करू …
पांचजन्य वृत्तपत्र