लेख-समिक्षण

एक्सरसाईजनंतर हात थरथरतात?

फिट आणि फाईन राहणं हे प्रत्येक तरुण-तरुणींची सर्वांत आवडती बाब असते. अलीकडील काळात हेल्थअवेअरनेस प्रचंड वाढला आहे. यासाठी अनेकजण एक्सरसाईज करतात. जीममध्ये घामही गाळला जातो. अनेकदा जीममध्ये वजन उचलल्याने किंवा एक्सरसाईज केल्याने काहींंचे हात थरथरू लागतात. वर्कआउटनंतर हात थरथरणं ही बर्‍याच लोकांना जाणवणारी एक सामान्य समस्या बनली आहे. मात्र काही वेळाने हात स्वत:हून थरथरणं आपोआप थांबतं.
जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा आपल्या शरीराला खूप मेहनत करावी लागते. जेव्हा मसल्सची क्रिया वाढते तेव्हा शरीरात लॅक्टिक ऍसिड तयार होतं. यामुळे थकवा आणि क्रॅम्स येऊ शकतात. शिवाय, जेव्हा आपण हाय-इंटेंसिटी वर्कआउट करतो तेव्हा शरीरातील ऊर्जा खर्च होते आणि ग्लुकोजच्या कमतरतेचा त्रास होऊ शकतो. या कारणाने हात थरथरण्याची स्थिती उद्भवू शकते.
वर्कआउट करताना घामामुळे शरीरातून सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारख्या इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता होऊ शकते. त्यांच्या कमतरतेमुळे क्रॅम्प्स आणि थरथरण्याची तक्रार उद्बवू शकते.
जास्त वेळ अधिक वजन उचलल्याने शरीराचे स्नायू थकतात. यावेळी स्नायूंना मेंदूकडून पुरेसे सिग्नल मिळत नाहीत. यामुळे स्नायूंच्या समस्या देखील उद्भवू शकतात.
र्ी काय काळजी घ्याल?
संतुलित आहार ः व्यायामापूर्वी आणि नंतर योग्य आहार घ्या. कार्बोहायड्रेट्स, प्रथिने यांचं सेवन करा जेणेकरून शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते.
हायड्रेशन ः व्यायामादरम्यान आणि नंतर योग्य प्रमाणात पाणी पिणं फार महत्वाचे आहे. पाण्यासोबतच इलेक्ट्रोलाइट्स असलेलं पेय देखील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखण्यासाठी मदत करतं.
पुरेशी झोप ः शरीराच्या रिकवरीसाठी झोप खूप महत्त्वाची आहे. पुरेशी झोप न मिळाल्यास, वर्कआउट केल्यानंतर स्नायू पूर्णपणे बरे होत नाहीत.

Check Also

लहान मुलांना लिहिण्यास शिकवण्याची योग्य पध्दत

लहान मुलांना लिहिण्यास शिकवणे हे पालकांसाठी मोठे आव्हान असते. अनेकदा पालक थेट अक्षरे गिरवण्यापासून सुरुवात …