लेख-समिक्षण

संगोपनाचे आव्हान आणि आई

आई म्हणून मुलाचे संगोपन करणे हे एक मोठे आव्हान असते आणि हे आव्हान पूर्ण करण्यात आईच्या आयुष्याचा मोठा भाग जातो. यादरम्यान आईच्या संयमाची सत्वपरीक्षा असते. लहान मुलं तांडव करतात, हट्टी असतात आणि अनेक चुका करतात, अशा परिस्थितीत आईला धीर न सोडता त्यांना सांभाळणे गरजेचे असते. मुले मोठी होईपर्यंत आईचा बहुतेक वेळ त्यांची काळजी घेण्यात जातो. पण, याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्वतःकडे अजिबात लक्ष देऊ नका. कारण आई असण्यासोबतच तुम्ही एक माणूस देखील आहात, त्यामुळे तुमचे छंद जोपासा आणि तुमच्या दैनंदिन जीवनात स्वतःसाठी वेळ काढा.
अनेक वेळा आई थकून जाते कारण मुलांना सांभळताना खूप काम करावे लागते. त्यामुळे याबाबतीत तुमच्या कुटुंबीयांची किंवा मित्रमंडळींची मदत घेणे ही वाईट गोष्ट नाही. एकमेकांच्या मदतीनेच कुटुंबे टिकतात. त्यामुळे जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा कामाचे ओझं स्वतःवर न घेता तुम्ही कुटुंब आणि मित्रमंडळींची, शेजार्‍यांची मदत घेऊ शकता.
एक गोष्ट सदैव लक्षात ठेवा की, जगात कोणीही परिपूर्ण नाही. तुमच्याही पालकत्वात चुका होऊ शकतात. या गोष्टी मनावर घेण्याऐवजी त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यातून धडा घ्यावा. आपल्या मुलांना चांगली संगत देणे हे आईचे कर्तव्य आहे. तुम्ही ज्या लोकांमध्ये राहता त्यांच्याकडूनच तुमचे मूलही शिकेल. आपल्या मुलांबरोबर वेळ घालवावा आणि त्यांच्या वेळेचे योग्य व्यवस्थापन करा. यातून तुमचे मूल चांगले जीवन जगण्यासाठी नवीन गोष्टी शिकतील. मूल काही शिकत नसेल किंवा ते खूप त्रास देत असेल, तर फार कठोर वागण्याची गरज नाही. मुलं निरागस असतात, एक क्षण रडतात आणि दुसर्‍या क्षणी हसतात. त्यांच्याशी कधी प्रेमाने वागा, समजावून सांगा आणि मूल किती आनंदी राहते ते पहा. कोणत्याही कामासाठी मुलाला काहीही देण्याची अट नसावी. ते काम करण्यासाठी त्याला योग्य प्रकारे प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करा. पण त्याला काही काम केले तरच बक्षीस मिळेल, अशा अटी घालू नयेत.

Check Also

लहान मुले आणि व्हिडिओ कॉलिंग

लहान मुलांच्या निरागस हालचाली सर्वांनाच मोहवून टाकतात. अनेकदा दूर राहणारे नातेवाईक किंवा मित्रमंडळी बाळाला पाहण्यासाठी …