लेख-समिक्षण

विशेष

अर्थव्यवस्थेची दमदार चाल

आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारताच्या जीडीपी वाढीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. एका मुलाखतीत राजन म्हणतात, हे वाढीचे आकडे खरे आहेत का? जर वाढीचे आकडे खरे नसतील, तर मोठ्या अर्थव्यवस्थेबाबतही शंका निर्माण होते. काही अशा विसंगती आहेत ज्यांची चिंता करणं गरजेचं आहे. जसे की आपण इतक्या वेगानं वाढत असू, तर अधिक नोकऱ्या का निर्माण होत नाहीत? आणि चांगल्या नोकऱ्या …

Read More »

आरोपांच्या राजकारणाने काय साधणार?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भाजपसोबत आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न राहुल गांधी सातत्याने करीत आले आहेत. आता देशात ‌‘संविधान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यात संघर्ष सुरू आहे,‌’ असे सांगून त्यांनी संघावरील टीकेला पुन्हा धार दिली आहे. भाजप आणि संघ संविधानाचा आदर करीत नाहीत, उलट संविधान संपविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, हा त्यांचा जुना आरोपच नव्या स्वरूपात पुढे आला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत …

Read More »

तीन बाळांचा मृत्यू; चौकशीचे आदेश

अमरावती जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात शिशु कक्षात सोमवारी पहाटे लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अमरावतीत घडल्याचे समोर आले आहे. तसेच सहा बालके गंभीररीत्या भाजले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. व्हेंटिलेटरमध्ये अचानक झालेल्या स्फोटानंतर पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास ही आग लागली. या घटनेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण चौकशीचे आदेश दिले असून चौकशी सुरू …

Read More »

तरुणांच्या देशातलं आक्रित

भारतात आज पदवीधरांची संख्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. गल्लीबोळांत महाविद्यालयांचे पेव फुटले आहे आणि वर्षागणिक लाखांच्या घरात तरुण हातात पदवी, पदविका किंवा प्रमाणपत्राची सुरकुतलेली वही घेऊन बाहेर पडत आहेत. विद्यापीठाच्या सुरक्षित वातावरणातून बाहेर पडताना त्यांच्या डोळ्यात उज्ज्वल भविष्याचे स्वप्न असते खरे पण या तथाकथित शिक्षणाचा देशाच्या श्रम बाजाराशी खरोखर काही संबंध उरला , आहे का? असा प्रश्न जर विद्वानांनी स्वत:ला …

Read More »

संस्कृती रक्षणाचा बेगडीपणा

पुण्यातील सिंहगडावर बर्म्युडा परिधान करून आलेल्या एका लहान मुलीच्या वडिलांना काही तथाकथित संस्कृती रक्षकांनी मारहाण केल्याचा विषय सध्या गाजत आहे. या विषयावर उलट सुलट चर्चा होत असतानाच सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा येथे नागपंचमी यात्रेदिवशी नागराजांच्या मिरवणुकीमध्ये महिलारूपी नागिणींनी जो बिभत्स नाच केला होता त्याची चर्चाही रंगू लागली आहे. सांगली जिल्हा प्रशासनाने याची दखल घेऊन संबंधित नागराज मंडळांवर जरी कारवाई केली …

Read More »

आम्ही शिंदेंना अपात्र घोषित करू शकतो का?

शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी पार पडली. शिवसेना (ठाकरे)चे पक्षाकडून कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद संपविला. सिब्बल यांचा युक्तिवाद संपल्यानंतर ठाकरे गटाचेच वकील देवदत्त कामत यांनी युक्तिवाद सुरु केला. यावेळी कामत म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष चुकले असतील तर कोर्ट आम्हाला दिलासा देऊ शकते. विधिमंडळ पक्ष कोणत्याही निवडणुकीला उमेदवार उभा करत नाही. विधिमंडळ पक्षावर सर्व अवलंबून राहण्यासाखे असेल …

Read More »

अंधश्रद्धेचा अंधार

एकविसाव्या शतकात विज्ञान आणि तंत्रज्ञानाने मानवी जीवन आमूलाग्र बदलले असतानाही अंधश्रद्धेची मुळे समाजाच्या मनात खोलवर रुजलेली आहेत. अमरावतीतील डोमा येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनींमध्ये भूतबाधेची अफवा पसरून शेकडो विद्यार्थ्यांनी वसतिगृह सोडणे, ही केवळ एका आश्रमशाळेतील घटना म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही. भीती, अफवा आणि अज्ञान यांचा संगम झाला की सुशिक्षित समाजही तर्काचा आधार सोडून अंधविश्वासाच्या आहारी जाऊ शकतो, याचे हे अस्वस्थ …

Read More »

‌‘विकसित भारता‌’चे आव्हान

देशाचा 80वा स्वातंत्र्यदिन उत्साहात पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करताना विकसित भारताचे लक्ष्य पुन्हा अधोरेखित केले. त्यांच्या भाषणाच्या केंद्रस्थानी यंदा युवा शक्ती होती. विशेषतः तरुणांच्या अपेक्षा, आकांक्षा आणि बदलत्या मानसिकतेचा विचार त्यांच्या भाषणातून प्रकर्षाने जाणवला. स्वातंत्र्यदिनाची थीमही भारतीय युवाशक्तीला केंद्रस्थानी ठेवणारी होती. तरुणांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणे, कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रशिक्षण देणे आणि त्यांना नव्या संधी उपलब्ध …

Read More »

राज्याच्या औद्योगिक प्रगतीच्या दाव्यांची पोलखोल

महाराष्ट्र हे देशाचे औद्योगिक इंजिन असल्याचा दावा केला जात असताना, केंद्र सरकारने संसदेत दिलेल्या अधिकृत आकडेवारीने या दाव्यालाच मोठा धक्का दिला आहे. गेल्या पाच आर्थिक वर्षांत महाराष्ट्रातील तब्बल 36,211 खासगी कंपन्या लिक्विडेट, विसर्जित किंवा कंपनी रजिस्टरमधून स्ट्राइक ऑफ झाल्या आहेत. लोकसभेत दिलेल्या उत्तरातून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. औद्योगिकदृष्ट्‌‍या महत्त्वाच्या नाशिक जिल्ह्यात तब्बल 840 कंपन्या बंद झाल्या, तर पुण्यात …

Read More »

तंत्रज्ञान कपन्यांना दणका

डिजिटल तंत्रज्ञानाच्या या युगात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. व्हॉट्सॲपवरील संदेश असोत, फेसबुकवरील मतप्रदर्शन असो किंवा इन्स्टाग्रामवरील रील्स; या माध्यमांनी माणसाच्या विचारसरणीला व्यापून टाकले आहे; परंतु अलीकडच्या काळात या कंपन्यांची एकाधिकारशाही, त्यांची पारदर्शकता नसलेली कार्यप्रणाली आणि डिजिटल जगातील वाढता बेजबाबदारपणा हा लोकशाही व्यवस्थेसाठी आणि सामाजिक स्वास्थ्यासाठी एक गंभीर धोका बनत चालला आहे. सगळे नियंत्रणच त्यांच्या …

Read More »