देशातील आघाडीच्या बँकांमध्ये सध्या एक मूक क्रांती आणि तितकीच मोठी पडझड सुरू आहे. ग्राहक सेवा वेगवान करणे आणि अचूकता आणणे या नावाखाली बँकिंग क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) आणि प्रगत रोबोटिक्सचा वापर कमालीचा वाढला आहे. परंतु, या तथाकथित तांत्रिक प्रगतीमागे मनुष्यबळ कपातीचे एक अघोषित वादळ दडले आहे, ज्याचा पहिला मोठा तडाखा कनिष्ठ आणि लिपिकीय कर्मचाऱ्यांना बसू लागला आहे. बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपच्या …
Read More »कव्हर स्टोरी
नाव प्रेमाचं, विसर माणुसकीचा
पाश्चात्त्य समाजांकडे पाहिले, तर तिथेही गुन्हे घडतात, तिथेही हिंसा आहे. पण खासगी नात्यांमध्ये होणारी अशी टोकाची क्रूरता तिथे सर्वसामान्य घरांमध्ये फारशी आढळत नाही; ती बहुधा अपवादात्मक, गंभीर मानसिक विकृतीच्या प्रकरणांपुरती मर्यादित राहते. तिथे नाते न पटल्यास वेगळे होणे स्वीकारले जाते; एखाद्या नात्यात फरफटत राहणे तिथल्या संस्कृतीला मान्य नाही. आपल्याकडे मात्र नाते तुटणे हे जणू काही स्वतःच्या अस्तित्वालाच आव्हान वाटते, आणि …
Read More »शुध्दीकरण मोहीमेचा धडाका
महाराष्ट्रात अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए) पदावर तुकाराम मुंडे यांची नियुक्ती झाल्यापासून राज्यातील भेसळखोरीच्या साम्राज्याला सुरुंग लागला आहे. दूध, पनीर, औषधे, वेफर्स, गुटखा, चहापत्ती, खाद्यतेल अशा सर्वसामान्यांच्या रोजच्या आहारातील पदार्थांमध्ये बिनदिक्कतपणे भेसळ करून लोकांच्या जीवाशी अत्यंत घातक खेळ सुरू होता. आपल्या धाडसत्रांनी या निर्ढावलेल्या भेसळखोरांच्या मुसक्या आवळण्याचे काम ज्या तडफदारपणाने सुरू आहे त्याबद्दल आयुक्त तुकाराम मुंडे यांचे सर्व स्तरातून कौतुक …
Read More »द्विपक्षीय लोकशाहीकडे?
वर्तमान राजकारणात देशातील प्रादेशिक पक्ष ज्या प्रकारे फुटून विखुरत चालले आहेत, त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे देशाच्या संपूर्ण सामाजिक आणि राजकीय जाणिवांमध्ये झालेला आमूलाग्र बदल. आर्थिक आघाडीवर संपूर्ण भारत एकात्मतेच्या दिशेने वाटचाल करत असल्याने प्रादेशिक पक्षांचे राजकारण हळूहळू अप्रस्तुत ठरत चालले आहे. ही परिस्थिती स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. प्रादेशिक पक्षांचे प्रस्थापित नेतृत्व आता जनतेकडून नाकारले जात आहे. लोकशाहीत विरोधी …
Read More »अन्वयार्थ फुटीचा
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेली ’ऑपरेशन टायगर’ची चर्चा ही अफवा नव्हती तर, एक वास्तव होते हे बुधवारी सिद्ध झाले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील 9 पैकी 6 खासदारांनी लोकसभेमध्ये स्वतंत्र गट स्थापन केला आहे. या गटाला लोकसभेच्या अध्यक्षांनी मान्यता दिली आहे. येत्या दोन दिवसांच्या कालावधीत म्हणजे शिवसेनेच्या वर्धापनदिनी हे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये सहभागी होतील …
Read More »आघाडीची धडपड
काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्याने आणि त्या पक्षावर अजूनही गांधी परिवाराचीच हुकूमत असल्याने हा पक्ष क्षीण झाला असला तरी, संपलेला नाही किंवा तो फुटीच्या उंबरठ्यावरही उभा नाही. त्यामुळे काँग्रेसच्या झेंड्याखाली निःसंशयपणे एकत्र येऊन भाजपाला समर्थ पर्याय देण्याची क्षमता इंडिया आघाडीच्या पक्षांमध्ये नक्कीच आहे, प्रश्न फक्त संघर्षाचा खडतर मार्ग पत्करण्यापुरता मर्यादित आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या कारभाराला जनता कंटाळली आहे, ही वस्तुस्थितीच …
Read More »ये रे ये पावसा…
सुमारे तीन महिन्यांच्या अत्यंत कडक अशा उन्हाळी हंगामानंतर केवळ धरतीच नव्हे तर धरतीवर राहणारे सर्व प्राणिमात्र चातक पक्ष्याप्रमाणे आता पावसाची प्रतीक्षा करत आहेत. सर्वसाधारणपणे मे महिन्याच्या अखेरीस आणि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये भारतामध्ये मान्सूनचा हंगाम सुरू होत असला, तरी यावर्षी एल निनो परिणामामुळे काही प्रमाणात मान्सूनची वाटचाल संथ झाल्याने पावसाचे थेंब पडण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. गेल्या काही …
Read More »कर्नाटकातील खांदेपालटाचा अन्वयार्थ
कर्नाटकामध्ये अखेर सत्तापालट झाला असून सिद्धरामैया यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. प्रदीर्घ ओढाताण आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या हस्तक्षेपानंतर त्यांनी आपली खुर्ची डी. के. शिवकुमार यांच्याकडे सोपवली आहे. मे 2028 पर्यंत शिवकुमार हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर या सत्तांतराची रणनीती आखली जात होती. त्याला अखेर सिद्धरामैया यांनी संमती दिली. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असला, …
Read More »बोलबाला झुरळ पार्टीचा
होर्मुझची सामुद्रधुनी गेल्या 75 दिवसांपासून बंद असल्याने जगातील एकूण इंधन पुरवठ्यापैकी 20 टक्के पुरवठा ठप्प झाला आहे. इंधनाचे दर फेब्रुवारीच्या तुलनेत तब्बल 40 ते 45 टक्क्यांनी वाढले आहेत. यामुळे देशातील तेल कंपन्यांना दररोज 1,000 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. रुपयाचे मूल्य 96 पर्यंत घसरल्याने दुहेरी संकट उभे राहिले आहे. सरकारने अद्याप या दरवाढीचा बोजा ग्राहकांवर टाकलेला नाही, परंतु …
Read More »विपर्यास नको, सहभाग हवा!
होर्मुझची सामुद्रधुनी गेल्या 75 दिवसांपासून बंद असल्याने जगातील एकूण इंधन पुरवठ्यापैकी 20 टक्के पुरवठा ठप्प झाला आहे. इंधनाचे दर फेब्रुवारीच्या तुलनेत तब्बल 40 ते 45 टक्क्यांनी वाढले आहेत. यामुळे देशातील तेल कंपन्यांना दररोज 1,000 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. रुपयाचे मूल्य 96 पर्यंत घसरल्याने दुहेरी संकट उभे राहिले आहे. सरकारने अद्याप या दरवाढीचा बोजा ग्राहकांवर टाकलेला नाही, परंतु …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र