लेख-समिक्षण

कव्हर स्टोरी

फटाफुटीची भाषा कशासाठी?

सध्या एक स्लोगन खूपच व्हायरल होत आहे. ‘बटेंग तो कटेंगे.’ अर्थात ती भुलभुलैय्या निर्माण करणारे स्लोगन आहे. याचा अर्थ प्रत्येकासाठी वेगळा राहू शकतो. ज्याने त्याने आपापल्या परीने त्याचा अर्थ लावायचा. आता तर त्याच्याशी मिळतेजुळत्या स्लोगनचे पेव फुटले आहे. पण मुळातच बटेंगेसाठी आपण एकत्र आहोत का, याचा विचार करायला हवा. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करुन शंभरीकडे जाणार्‍या भारतातील समाज आज जातीजातींमध्ये …

Read More »

सुरुक्षित पदार्पण

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी या प्रथमच निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी 23 ऑक्टोबर रोजी केरळच्या वायनाड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रियांका या अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या राजकारणात पडद्यामागे सक्रिय राहिल्या आहेत. 1990 च्या दशकाच्या शेवटच्या काळात त्यांनी आई सोनिया गांधी यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली. याशिवाय 2004 मध्ये अमेठीत राहुल गांधी उतरले तेव्हा प्रियांका गांधी यांनी त्यांच्यासाठी जोरदार जनसंपर्क अभियान …

Read More »

विकसित भारतासाठी

भारत आणि भारतातील लोक विकसित देशांच्या श्रेणीत असल्याचे म्हणायचे असेल तर तीन निकष पाहावे लागतील. पहिले म्हणजे प्रत्येक घरात नळाद्वारे स्वच्छ पाण्याची उपलब्धता. दुसरे म्हणजे स्थानिक सरकारी शाळेची गुणवत्ता. तिसरा मोठा निकष म्हणजे सार्वजनिक वाहतुकीचा वापर. याखेरीज हवेची गुणवत्ता, कामगारांची उत्पादन क्षमता, आरोग्य स्थिती, ज्येष्ठांची देखभाल, वनक्षेत्र, उर्त्सजन कमी, जैवविविधता देखील निकष आहेत. याजोडीला पुढील 25 वर्षांत 30 हजार डॉलरपेक्षा …

Read More »

याला ‘आजार’ ऐसे नाव?

मथळा वाचून तुम्हाला एखादा गंभीर आजार किंवा रोगाविषयी लेख असेल, असे वाटू शकते. मात्र इथेच तुमची गल्लत होऊ शकते. अलीकडेच उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी एका ठिकाणी बोलताना देशाबाहेर जाण्याचा तरुणांना ‘आजार’ झाला असल्याचे मत मांडले. अर्थात तरुणाई देशाबाहेर का जात आहे? कशामुळे देश सोडण्याची वेळ आली ? यामागची प्रत्येकाची कारणं वेगळी असू शकतात. श्रीमंत देश वगळली तर सर्वच विकसनशील देशात …

Read More »

आघाडीची कसोटी

लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीने अचूक रणनिती आखल्याने चांगली कामगिरी केल्याचे दिसून आले. आघाडीचा प्रमुख उद्देश हा भाजपशी थेट सामना करणे आणि भाजपच्या विरोधातील मतांची फाटाफूट होणार नाही याची खबरदारी घेणे हा होता. आघाडीने वादग्रस्त मुद्दे बाजूला ठेवले आणि म्हणूनच त्यांना चांगल्या जागा मिळवत्या आल्या. पण काँग्रेसच्या हरियानातील पराभवाने ‘महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकांमध्ये स्थिती पालटली आहे. कमकुवत काँग्रेस पक्ष घटक …

Read More »

दीपस्तंभ…

रतनजी टाटा यांच्या निधनाने देशाचा एक तेजस्वी तारा निखळला आहे. आज जगातील पाचव्या क्रमांकावर पोहोचलेल्या भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्यात आणि रोजगार निर्मितीमध्ये त्यांचे योगदान इतिहास कधीही विसरु शकणार नाही. आपण आयुष्यात काय करतो, किती पैसा मिळवतो यापेक्षाही दैनंदिन व्यवहारात आपलं आचरण हे नम्रतापूर्ण, शालीनतापूर्ण असलं पाहिजे आणि तीच आपली खरी ताकद आहे. ही खूप मोठी शिकवणूक रतन टाटांसोबतच्या क्षणांनी मला …

Read More »

‘अभिजात’ तेचा मुकुट मिरवताना…

केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या घोषणेमध्ये पाली, प्राकृत, बांगला, असामिया आणि मराठी या भाषांचा समावेश अभिजात भाषांच्या सूचीमध्ये करण्यात आला आहे. मराठी भाषेला क्लासिकल किंवा अभिजात दर्जा मिळणे ही ऐतिहासिक बाब आहे. हा दर्जा देण्याची मागणी याआधीही पूर्ण करता आली असती. नेमकी निवडणुकीच्या तोंडावर ती पूर्ण करणे हा योगायोग आहे की प्रयोजन आहे हा विचार करण्यासारखा आहे. पण आजच्या महाराष्ट्रामध्ये मराठीच्या …

Read More »

एकत्रित निवडणुकीलो आव्हान ‘एकमताचे’

केंद्रीय मंत्रिमंडळाने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशी स्वीकारत ‘एक देश एक निवडणुक’ प्रस्तावाला मंजुरी दिली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात विधेयक आणले जावू शकते. या विधेयकाला मिळणार्‍या संमतीवरच या निर्णयाचे भवितव्य अवलंबून असेल. एक देश एक निवडणुकीला काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल, द्रमुक, ‘आप’सारखे जवळपास 15 पक्ष आक्षेप नोंदवत असतील तर हा अजेंडा पुढे सरकेल, असे वाटत नाही. केंद्र …

Read More »

राहुल गांधीच्या विदेशवाणीचा अन्वयार्थ

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नुकत्याच पार पडलेल्या अमेरिका दौर्‍यादरम्यान भारतात शीख धर्मियांचे धार्मिक स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे आणि संघराज्याचा पाया मोडला जात आहे, धार्मिक उन्माद वाढवण्याचा प्रयत्न केला जात असून भाषे सोबत छेडछाड केली जात आहे, जम्मू-काश्मीर आणि ईशान्येत हुकूमशाही सुरू आहे अशा अनेक आरोपांची माळ उडवली आहे. राहुल गांधी आणि इतर नेते भारतातही या सगळ्या गोष्टी …

Read More »

मणिपूर ‘वाचवायचे’ तर…

मणिपूर सरकार, सुरक्षा दल आणि केंद्र सरकार सध्या हिंसाचाराच्या अप्रत्यक्ष भोवर्‍यात अडकले आहे. गुप्तचर संघटनांना मणिपूरमधील ताज्या हल्ल्याचा अंदाज घेण्यात अपयश आले किंवा प्रत्युत्तराची बाजू कमी पडली असे म्हणावे लागेल आणि अर्थातच ही बाब दुर्देवी आहे. कुकी आता केवळ वेगळे राज्यच नाही तर वेगळा देश कुकीलँड मागत आहेत. त्यात संपूर्ण ईशान्य आणि बांगलादेशचा काही भागाचा समावेश करत आहे. दुसरीकडे नागा …

Read More »