अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रिसिप्रोकल टॅक्स धोरणांतर्गत 2 एप्रिल रोजी जगातील 60 देशांविरोधात आयात शुल्कात वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आणि जगभरात खळबळ उडाली. अमेरिकन शेअर बाजारात विक्रमी घसरण झाली असून भारतीय शेअर बाजारातही मोठी पडझड झाली आहे. भारतावरही त्यांनी 26 टक्के आयात शुल्क लावले आहे. आयात शुल्काच्या भयामुळे आपण बचावाच्या भूमिकेत गेलो तर भारतालाही त्यातून काही साध्य होणार …
Read More »कव्हर स्टोरी
संकट अमेरिकन कृषीमाल आयातीचे
अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक हेड यांनी भारताला विशेषतः अत्याधिक अनुदानित अमेरिकन शेती उत्पादनांसाठी आपला बाजार खुला करण्यास सांगितले. जॉर्ज बुश ज्युनियर यांच्या कार्यकाळात वाणिज्य सचिव असलेल्या एन्न वेनमॅन यांच्यापासून सुरू झालेले हे दुटप्पी धोरण अमेरिकेच्या विविध कृषी मंत्र्यांनी वेळोवेळी पुढे रेटले आहे. आज डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या नव्या टॅरिफ युद्धामध्येही हेच घडत आहे. जागतिक व्यापार संघटनेतील अनेक वर्षांच्या …
Read More »अंतराळ दिग्विजयाला सलाम
नऊ महिन्यांपेक्षा अधिक काळ अवकाशात अडकून पडल्यानंतर अखेर भारतीय वंशांच्या अमेरिकी अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांची भारतीय प्रमाणवेळेनुसार 19 मार्च 2025 रोजी यशस्वीरित्या स्पेसएक्सच्या ड्रॅगन कुपीतून घरवापसी झाली. त्यांच्यासमवेत नासाचे अंतराळवीर निक हेग आणि रशियाचे अंतराळवीर अॅलेक्झांडर गोर्व्हुनोव्ह देखील भूतलावर परतले. हे चौघेही अवकाश स्थानकावर (आयएसएस) क्रु-9 चे सदस्य होते. त्यांची जागा घेण्यासाठी चार अन्य अंतराळवीर नासाचे अॅनी …
Read More »अर्थसंकल्पातून काय मिळाले?
महायुती सरकारचा पहिलावहिला अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अजित पवार यांनी लोकानुनयाला थारा न देता राज्याच्या वित्तीय शिस्तीच्या चौकटीचे पालन करत विकासाला चालना देण्यासाठीचे महत्तम प्रयत्न केल्याचे दिसते. कोणत्याही अर्थसंकल्पानंतर अजून खूप काही करावयास हवे होते, हा सूर नेहमीच ऐकावयास मिळतो. परंतु समोर असणारी आव्हाने आणि उपलब्ध संसाधने यांचा ताळमेळ उत्कृष्टपणाने घालणे याला कुशल वित्तीय व्यवस्थापन म्हणतात. त्यादृष्टीने एकीकडे लाडक्या बहिणींना …
Read More »जगज्जेतेपदाचा शंखनाद
क्रिकेटच्या प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा उल्लेख अत्यंत महत्त्वाचा आहे. या बहुचर्चित स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने उल्लेखनीय कामगिरी करत अनेकदा आपली छाप उमटवली आहे. 2002 मध्ये संयुक्त विजेतेपद पटकावल्यानंतर 2013 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले आणि धोनी हा सर्व आयसीसी ट्रॉफी जिंकणारा पहिला कर्णधार ठरला. आता भारताने सलग तिसर्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला …
Read More »महायुतीत काय चाललंय?
विधानसभा निवडणुकांमध्ये न भूतो… असे यश मिळूनही भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यामधील सुंदोपसुंदीमुळे महायुती सरकारमध्ये सारे काही आलबेल नाहीये, हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. भाजपाकडून आपली पद्धतशीरपणाने राजकीय कोंडी केली जात असल्याचे शिंदे यांना वाटत आहे. अशा प्रकारची राजकीय अपरिहार्यता सत्तेच्या राजकारणात अनेकांना सोसावी लागली आहे. त्याची कारणे बहुतेकदा अतिमहत्त्वाकांक्षेत दडलेली असतात. भूतकाळ आणि वर्तमान यांचा तटस्थपणाने अभ्यास करण्याऐवजी महत्त्वाकांक्षा …
Read More »आव्हान संकटग्रस्त बँकाचे
महाराष्ट्रातील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या आर्थिक स्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकेवर अनेक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे आता ग्राहक सहा महिन्यांपर्यंत बँकेतून पैसे काढू शकत नाहीयेत. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयानंतर बँक ग्राहकांमध्ये घबराट पसरली आहे. यानिमित्ताने रिझर्व्ह बँक कोणत्याही बँकेवर निर्बंध का लादते? एखादी बँक दिवाळखोरीत निघाली तर त्या बँकेत जमा असलेल्या ग्राहकांच्या ठेवींचे काय होते? ग्राहकांनी काय …
Read More »पातळीहीनतेचे रणवीर नाट्य
काही दिवसांपूर्वीच प्रसारित झालेल्या एका मालिकेत युटयूबर रणवीर अलाहाबादियाने अतिशय हिन पातळीवर भाष्य करत वाद निर्माण केला आणि एका नव्या चर्चेला तोंड फुटले. प्रत्यक्षात दृक श्राव्य माध्यमात आक्षेपार्ह मुद्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही तरतूदी आहेत. पण सोशल मीडियाने मात्र हे सर्व नियम धाब्यावर बसविले. सोशल मीडियाचा दुष्परिणाम म्हणजे लोकप्रियता आणि लाइक मिळ्वण्यासाठी पातळी सोडून कंन्टेट तयार केला जात आहे. एवढेच नाही …
Read More »आव्हान मुलांच्या ‘होरपळीचे ’
युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड (युनिसेफ) च्या ’लर्निंग इंटरप्टेड: ग्लोबल स्नॅपशॉट ऑफ क्लायमेट-रिलेटेड स्कूल डिसप्शन इन 2024’ या अहवालातील धक्कादायक निष्कर्षांमुळे मुलांबद्दलची चिंता वाढली आहे. आतापर्यंत, जागतिक तापमानवाढीचा शेती आणि हवामान चक्रावर होणार्या परिणामांचे अभ्यास निष्कर्ष समोर येत होते; परंतु मुलांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक समस्यांवर हवामान बदलाचा इतका संवेदनशील अभ्यास पहिल्यांदाच समोर आला आहे. या अहवालानुसार, गेल्या वर्षी …
Read More »आत्मविश्वासाने केलेली शस्त्रक्रिया
गेल्या दोन तीन वर्षापासून गरीब, सामान्य माणूस, युवक, महिला आणि शेतकरी या चार स्तंभावर भर देणारा अर्थसंकल्प हे मोदी सरकारचे एक समान सुत्र होय. या अनुषंंगाने यंदाच्या अर्थसंकल्पातही सहा क्षेत्रांच्या विकासावर विशेष भर देण्यात आला. विशेषत: शेती आणि शेतकरी यांच्या अनुषंगाने आत्मविश्वासपूर्ण पावले टाकण्यात आली. त्याशिवाय लघु व मध्यमउद्योग क्षेत्र तसेच पायाभूत सुविधांचा विकास, महिला आणि समाजातील दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र