लेख-समिक्षण

कव्हर स्टोरी

मांगल्यदायी गणेशोत्सव

भाद्रपद शुल चतुर्थीच्या दिवशी मातीची गणेशमूर्ती तयार करून तिचे यथासांग पूजन करावे आणि वाहत्या पाण्यात ती मूर्ती विसर्जित करावी, असे शास्र सांगते. या व्रताला सिद्धिविनायक व्रत म्हटले जाते. हे व्रत जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी, अपकीर्ती निवारणासाठी, कीर्ती पुनःप्राप्तीसाठी केले जाते. कृष्णाला स्यमन्तक मणि चोरीच्या खोट्या आरोपातून मुक्त होण्यासाठी नारदांनी हे व्रत सांगितले होते. महाभारतातील युद्धकाळी कृष्णाने युधिष्ठिरालाही याच व्रताची शिकवण …

Read More »

‘पिरियड शेमिंग’ चा डाग

महाराष्ट्रासारख्या पुरोगामी म्हणवल्या जाणार्‍या राज्यातील ठाणे जिल्ह्यात एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मासिक पाळीसंदर्भात विद्यार्थिनींशी करण्यात आलेली वर्तणूक ही अमानवी आणि घृणास्पद आहे. मासिक पाळीविषयीची लाज ही मासिक पाळीला एक अनावश्यक शारीरिक घटना मानण्याच्या सामाजिक धारणेचा परिणाम आहे. वास्तविक पाहता तो शरीरधर्म आहे. असे असूनही मासिक पाळीकडे नकारात्मक प्रक्रिया म्हणून पाहिले जाणे, ही घृणास्पद आणि वीट आणणारी मानसिकता आहे. अलीकडेच महाराष्ट्रातील …

Read More »

भारत झुकेगा नही…

 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसर्‍या कार्यकाळात भारत व अमेरिकेतील व्यापार आणि गाढ मैत्री ज्या चमकदार उंचीवर पोहोचेल, अशी जी अपेक्षा होती, ती १ ऑगस्ट रोजी ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केल्यानंतर आणि ६ ऑगस्ट रोजी रशियाकडून तेलखरेदीचे कारण पुढे करत अतिरिक्त २५ टक्के दंडात्मक शुल्कआकारणी जाहीर केल्यामुळे धुळीस मिळाल्याचे दिसत आहे. इतकेच नाही, तर ट्रम्प यांनी …

Read More »

‘फेक नॅरेटिव्ह’ ला चपराक

मालेगावच्या मशिदीमध्ये झालेल्या स्फोटाच्या खटल्याचा निकाल नुकताच लागला असून राष्ट्रीय तपास संस्थेच्या न्यायालयाने (एनआयए) या खटल्यातील सर्व सातही आरोपींना निर्दोष घोषित केले आहे. मालेगाव येथे २९ सप्टेंबर २००८ रोजी घडलेल्या बॉम्बस्फोटप्रकरणाचा निकाल १७ वर्षांनी येणे हे आपल्या न्यायप्रणालीचे अपयशच असून अशा प्रकारे इतक्या वर्षांनी आरोपी निर्दोष असल्याचे समोर येत असेल तर ती बाब अधिक गंभीर आहे. पण या निकालामध्ये सर्व …

Read More »

उपराष्ट्रपतींचे वादपुराण

जगदीप धनखड यांनी अचानकपणे उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्याने देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडवली आहे. संसदेत पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सर्व कामकाज सुरळीत पार पडत असताना सायंकाळी अचानक त्यांनी इतका मोठा निर्णय का घेतला? हा प्रश्न सध्या सर्वत्र विचारला जात आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या रुपातून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉ. झाकिर हुसेन, गोपाल स्वरुप पाठक, आर. वेंकटरमन, शंकरदयाळ शर्मा, डॉ. के. आर. नारायणन, कृष्णकांत, …

Read More »

दुर्गरत्नांवर जागतिक मोहोर

मराठेशाहीच्या समृद्ध आणि जाज्वल्य इतिहासाचे साक्षीदार असणारे गडकिल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामरीक रणनीतीचे, दूरदृष्टीचे आणि तत्कालीन अतुलनीय स्थापत्यकलेचे प्रतीक आहेत. अलीकडेच युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत १२ ऐतिहासिक मराठा किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे. अनेक इतिहासकारांनी या भुईकोटांविषयी, जलदुर्गांविषयी समृद्ध लेखन केले आहे. परंतु त्याचा आधार घेत दुर्गपर्यटनाला चालना देण्याचे प्रयत्न फारशा प्रभावीपणाने झाले नाहीत. आता युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या …

Read More »

निसर्गबदलांपुढे तंत्रज्ञान थिटे

जागतिक तापमानवाढ आणि त्यामुळे होणार्‍या हवामान बदलांच्या झळांनी आज मानवी जीवनापुढे केवळ संकटांची मालिकाच उभी राहिलेली नाहीये, तर मनुष्यप्राण्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. विशेषतः भारतासारख्या देशात मान्सूनच्या चक्रावर याचा अत्यंत प्रतिकूल परिणाम झालेला दिसत आहे. अलीकडेच चक्रीवादळांचे अचूक भाकीत करणारे ‘सायलोन मॅन’ डॉ. मृत्युञ्जय महापात्र हवामानातील बदलर टिपण्यास आधुनिक प्रणालाही अपुरी ठरत असल्याचे म्हटले आहे. तंत्रज्ञानात यथावकाश प्रगती होत …

Read More »

श्रीमंतीदर्शनाचा हुकमी एक्का

माणूस इतर प्राणीमात्रांपेक्षा वेगळा असला तरी मानवीसमूहांमध्येही मी वेगळा आहे, खास आहे हे दाखवण्याची मानसिकता त्याच्यात असते. यासाठी जमेल त्या मार्गाने आपल्या सामर्थ्याचे, संपत्तीचे दर्शन घडवणारे अनेक जण समाजात दिसतात. यामध्ये आलिशान गाड्या, भव्यदिव्य विवाहसोहळे, याबरोबरीने वाहनांसाठीच्या व्हीआयपी नंबरप्लेटही मोलाची भूमिका बजावतात. भारतात अलीकडील काळात या नंबरप्लेटसाठी हजारो नव्हे तर लाखो रुपये मोजण्यास तयार असणारा एक वर्ग तयार झाला आहे. …

Read More »

गुणांची शर्यत आणि स्पर्धकाचा बळी

केवळ सरावपरीक्षेमध्ये कमी गुण पडल्याच्या रागातून संतापलेल्या एका पित्याने स्वतःच्या मुलीलाच जात्याच्या लाकडी खुंट्या ने जबर मारहाण केली. बापाच्या या नृशंस आणि विकृत कृत्याने त्या चिमुरडीचा अंत झाला. विशेष म्हणजे मारहाण करणारी व्यक्ती शिक्षक आहे. अर्थात ही पहिली घटना नाहीये. अधिकाधिक गुण मिळायलाच हवेत, यासाठी बालमनांवर सतत दबाव आणणारे आणि त्यांना तणावग्रस्त बनवणारे असंख्य पालक आज समाजात आहेत. आपले पाल्य …

Read More »

भाषाविषयक धोरण आणि महाराष्ट्र

नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ची अमलबजावणी करताना महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी अनिवार्य करण्याचा निर्णय तूर्त तरी मागं घेण्यात आला आहे. आता भारतातील सर्व भाषा जोपासल्या, जोडल्या जातील असं भाषा धोरण आखून ते महाराष्ट्रात अमलात आणलं पाहिजे. आणि महाराष्ट्राच्या सुनियोजित भागांमध्ये मराठी-इंग्रजीच्या पाठोपाठ तिसरी भाषा म्हणून कन्नड, तेलगू, उडिया यांसारखे विविध पर्याय उपलब्ध करून दिले पाहिजेत. त्यातून संपूर्ण देशाला एकात्म करण्याचं …

Read More »