महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडताना राज्यातील बळीराजाला दिलासा देणारी एक घोषणा केली आहे. दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाला माफी देण्याची ही घोषणा कर्जबाजारीपणामुळे त्रासलेल्या काही शेतकऱ्यांसाठी दिलासाजनक असली, तरी सरसकट बळीराजा खूश होईल अशी परिस्थिती नाही. देवेंद्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेल्या या निर्णयावर अपेक्षेप्रमाणे विरोधी पक्षांनी टीका केली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमच्या काळात आम्ही सरसकट …
Read More »संपादकीय
घरखरेदीदारांना दिलासा
घरखरेदीदारांच्या हक्कांचे संरक्षण करणारा एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दूरगामी निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. सदनिका किंवा घराच्या देयकावरून (पेमेंट) निर्माण झालेल्या वादाचे भांडवल करून विकासक (बिल्डर) आता खरेदीदाराला संक्षिप्त कायदेशीर प्रक्रियेचा आधार घेऊन घरातून बेदखल करू शकणार नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. अशा प्रकरणांमध्ये विकासकांना नियमित दिवाणी प्रक्रियेचाच अवलंब करावा लागेल, असे बजावत न्यायालयाने घरखरेदीदारांची बाजू भक्कम …
Read More »युद्धाचे चटके
जगातील सर्वात मोठी महासत्ता असलेली अमेरिका आणि नेहमीच लष्करी संघर्षाच्या तयारीत असलेला इस्रायल यांनी एकमेकांच्या साथीने इराणवर केलेल्या युद्ध हल्ल्यामुळे आधीच होरपळलेल्या जगाला युद्धाचे चटके अधिकच तीव्रतेने जाणवणार आहेत. गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षाने जगाला हादरवून सोडले होते. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील छोटा लष्करी संघर्षही समोर आला होता. इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील लष्करी संघर्ष दीर्घकाळ …
Read More »वाढत्या बंडखोरीची काँग्रेसला डोकेदुखी
एप्रिल महिन्यात राज्यसभेच्या दहा राज्यांतील 37 जागा रिक्त होत असून यासाठी 16 मार्च रोजी मतदान होणार आहे. राज्यसभेतील संख्याबळ पाहिल्यास अलीकडच्या काळात भाजपच्या स्थितीत सातत्याने सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे. खरी समस्या तर काँग्रेस आणि विरोधी पक्षांची आहे. काही जागांवर काँग्रेसचा झेंडा पुन्हा फडकू शकतो, परंतु क्रॉस व्होटिंग म्हणजेच मतविभाजनामुळे काही जागा गमावण्याची नामुष्की काँग्रेसवर मागील काळातही ओढवली आहे. …
Read More »अविमुक्तेश्वरानंदांचा संघर्ष
प्रयागराजमधील माघ मेळ्याच्या वेळी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांना तेथे स्नानास बंदी करून त्यांना आणि त्यांच्या शिष्यांना हुसकावून लावण्याचा प्रकार घडला होता. त्यातून शंकराचार्य विरुद्ध योगी आदित्यनाथ असा संघर्ष निर्माण झालेला आहे. या संघर्षाने आता अधिक उग्र स्वरूप धारण केले आहे. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी गो संरक्षणाचा मुद्दा पुढे करत योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात मोठा लढा हाती घेतला आहे. उत्तर प्रदेशात गाईचे रक्षण …
Read More »वाढत्या बंडखोरीची काँग्रेसला डोकेदुखी
एप्रिल महिन्यात राज्यसभेच्या दहा राज्यांतील 37 जागा रिक्त होत असून यासाठी 16 मार्च रोजी मतदान होणार आहे. राज्यसभेतील संख्याबळ पाहिल्यास अलीकडच्या काळात भाजपच्या स्थितीत सातत्याने सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे. खरी समस्या तर काँग्रेस आणि विरोधी पक्षांची आहे. काही जागांवर काँग्रेसचा झेंडा पुन्हा फडकू शकतो, परंतु क्रॉस व्होटिंग म्हणजेच मतविभाजनामुळे काही जागा गमावण्याची नामुष्की काँग्रेसवर मागील काळातही ओढवली आहे. …
Read More »महागाईची टांगती तलवार
भारताने जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याचा मान मिळवला असून, लवकरच आपण तिसऱ्या क्रमांकावर झेप घेऊ, असे दावे सरकारी स्तरावरून केले जात आहेत. भक्कम देशांतर्गत उपभोग आणि धोरणात्मक सुधारणांमुळे हे यश मिळाल्याचे सांगितले जाते. मात्र, विकासाच्या या लखलखत्या आकड्यांच्या मागे सामान्य जनतेच्या जगण्यातील संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे. सध्याची परिस्थिती पाहता, आर्थिक विकासाचे हे मोजमाप करताना महागाईच्या विळख्याकडे सोयीस्कर …
Read More »उच्चपदस्थांच्या करसवलतींचा पर्दाफाश
भारतातील करप्रणालीमध्ये गेल्या काही वर्षांत जे पारदर्शकतेचे युग अवतरले आहे, त्याचे चटके आता कॉर्पोरेट जगतातील बड्या धुरिणांना बसू लागले आहेत. वार्षिक 50 लाख रुपयांहून अधिक वेतन घेणाऱ्या आणि समाजातील आर्थिक स्तरावर वरच्या पायरीवर असलेल्या शेकडो वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्राप्तिकर विभागाने धाडलेल्या नोटिसा हे केवळ एका प्रशासकीय कारवाईचे लक्षण नसून, ते करचुकवेगिरीच्या बदलत्या स्वरूपावर ओढलेले ताशेरे आहेत. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, …
Read More »रीलवेडात हरवलेला विवेक
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात स्मार्टफोन हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग झाला असला, तरी त्याचे भीषण परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. समाजमाध्यमांवर स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात माणूस कशा प्रकारे आपल्या विवेकाचा बळी देत आहे, याचे ज्वलंत उदाहरण उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात घडलेल्या घटनेतून दिसते. एका महिलेने केवळ रील बनवण्यासाठी गळफास घेण्याचे नाटक केले, परंतु दुर्दैवाने तिचा जीव खरोखरच गेला. ही घटना …
Read More »द्रमुकचे पायही मातीचेच
शाची राजधानी दिल्ली 1 फेब्रुवारी रोजी जेव्हा अर्थसंकल्पीय भाषणाच्या चर्चेत मग्न होती, अगदी त्याच दिवशी तामिळनाडूतील सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) पक्षाने आपल्या विधानसभा निवडणूक प्रचाराचा शंखनाद केला. 1 फेब्रुवारीला माघी पौर्णिमा होती आणि याच दिवशी तामिळ संस्कृतीतील महत्त्वाचा ‘थाईपुसम’ उत्सव साजरा केला जातो. तामिळनाडूतील धार्मिक जनतेसाठी या दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. च दीर्घकाळ स्वतःला नास्तिक म्हणवून घेणाऱ्या द्रमुक पक्षाने …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र