लेख-समिक्षण

संपादकीय

स्वागत ठाम भूमिकेचे

काल-परवापर्यंत ज्या भारत- अमेरिका ऐतिहासिक करारावर 99 टक्के सहमती झाली म्हणून ढोल वाजवले जात होते, त्याच करारावरून भारताने अचानक पाऊल मागे घेतले. ही माघार नसून, अमेरिकेच्या अरेरावीला दिलेला एक सुस्पष्ट आणि कणखर धोरणात्मक संदेश अथवा चपराक आहे. ‌‘आम्हाला व्यापार करार हवा आहे, पण देशाचे हित धाब्यावर बसवून नाही, हा वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांचा संदेश आजच्या घडीला अत्यंत गरजेचा होता. …

Read More »

हरित हायड्रोजन मोहिमेसमोरील आव्हाने

भारताने जानेवारी 2023 मध्ये ‌‘राष्ट्रीय हरित हायड्रोजन मोहीम‌’ सुरू केली. 2030 पर्यंत दरवर्षी किमान 50 लाख मेट्रिक टन हरित हायड्रोजनचे उत्पादन करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट देशाने ठेवले आहे. यासाठी 19,744 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून 8 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीची अपेक्षा आहे. मात्र, मोहीम सुरू होऊन तीन वर्षेउलटल्यानंतरही जमिनीवरील वास्तव आणि कागदावरील उद्दिष्टे यात मोठी दरी असल्याचे संसदेत सादर …

Read More »

शहरांचे प्राक्तन

गेल्या काही वर्षांत पावसाळा हा सुखावणाऱ्या क्षणांपेक्षा विविध आपत्तींमुळे भयकारक बनला आहे. यंदाचा 2026 चा मान्सूनही त्याला अपवाद ठरलेला नाही. ‌‘इकॉनॉमिस्ट इंटेलिजेंस यूनिट‌’ (ईआईयू) चा ताजा ‌‘ग्लोबल लिवेबिलिटी इंडेक्स‌’ प्रसिद्ध झाला आहे आणि नेहमीप्रमाणे आपल्या देशातील एकही शहर जगातील पहिल्या 100 राहण्यायोग्य शहरांच्या यादीत स्थान मिळवू शकलेले नाही. देशाची राजधानी नवी दिल्ली या यादीत थेट 120 व्या स्थानावर आहे, तर …

Read More »

कानउघाडणीचा अन्वयार्थ

पोलीस दल जेव्हा कायद्याचे रक्षक राहण्याऐवजी सत्ताधाऱ्यांची मर्जी सांभाळणारे बनू पाहते, तेव्हा कोणाच्या तरी स्वातंत्र्यावर गदा येते, हे निश्चित. अशाच एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला ताजा निर्णय म्हणजे केवळ एका राजकीय कार्यकर्त्याला मिळालेला दिलासा नाही, तर लोकशाहीचा दुरूपयोग करू पाहणाऱ्या प्रवृत्तींना वठणीवर आणणारी एक सणसणीत चपराक आहे. ‌’नागरिक हे सरकारचे गुलाम बनू शकत नाहीत‌’, हे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती …

Read More »

विजयपर्व

देशातील विविध राज्यांमध्ये विविध प्रकारचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक खेळ सुरू असताना तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून प्रथमच सत्तेवर आलेले नवोदित विजय यांच्या राज्यामध्ये मात्र बरेच काही चांगले सुरू आहे. मुख्यमंत्री विजय यांनी मात्र गेल्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये विविध प्रकारचे निर्णय घेऊन आपली भविष्यातील दिशा निश्चित केलेली दिसते. अर्थात, कोणत्याही व्यक्तीला जेव्हा एखादे पद मिळते तेव्हा प्रारंभीचा उत्साह चांगला असतो, याच जाणिवेतून विजय यांनी …

Read More »

इंटर्नशिपला अर्थ देणारा निर्णय

देशातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधून दरवर्षी लाखो पदवीधर तरुण बाहेर पडतात; परंतु नोकरीच्या बाजारपेठेत पाऊल ठेवताना या पदव्या आणि उद्योग जगताच्या प्रत्यक्ष अपेक्षा यांमध्ये एक मोठी दरी निर्माण झाल्याचे पाहायला मिळते. भारतात पदव्यांची संख्या मोठी असली तरी व्यावहारिक ज्ञान आणि वास्तविक कार्यक्षमता (स्कील) असलेल्या तरुणांची प्रचंड कमतरता असल्याची तक्रार उद्योग क्षेत्रातून सातत्याने केली जात आहे. हीच त्रुटी दूर करण्यासाठी आणि शिक्षणाला …

Read More »

महायुती सरसच; पण…

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे महायुतीचाच बोलबाला राहिला. नाशिक तेवढे अपवाद ठरले. ज्या पद्धतीने महायुतीचे राज्यात तर त्यांच्या वरिष्ठ आवृत्तीचे म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे केंद्रात वर्चस्व आहे ते पाहता विरोधकांना आता अशा निवडणुकांमध्ये किंवा कोणत्या निवडणुकांमध्ये वाव राहिला आहे असे दिसत नाही. तथापि, काही वेळा धक्कादायक निकालांचीही नोंद होते आहे. त्यामुळे एकूण महायुती अथवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या प्रकृतीवर …

Read More »

स्वागतार्ह पाऊल

भारतात किरकोळ आजारांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय सल्ल्याशिवाय थेट मेडिकल स्टोअरमधून औषधे खरेदी करून घेण्याची सवय अनेकांमध्ये आढळते. सर्दी, खोकला, ताप किंवा इतर सामान्य तक्रारींसाठी डॉक्टरांकडे जाण्याऐवजी स्वतःच्या अंदाजाने औषधे घेणे ही गोष्ट इतकी सामान्य झाली आहे की त्यातील धोके अनेकदा दुर्लक्षित राहतात. परंतु हीच सवय कधी-कधी गंभीर परिणामांना कारणीभूत ठरू शकते. अलीकडच्या काही वर्षांत भारतीय औषध उद्योगासमोर उभ्या राहिलेल्या आव्हानांनी …

Read More »

पारदर्शकतेला खिंडार

अयोध्येतील श्र्ीराम मंदिरातील दानपेट्यांमधील देणग्यांच्या रकमेत झालेल्या कथित अपहाराच्या प्रकरणाने देशभरातील कोट्यवधी रामभक्तांच्या मनात अस्वस्थता निर्माण केली आहे. शेकडो वर्षांच्या संघर्षानंतर आणि अनेक पिढ्यांच्या प्रतीक्षेनंतर उभे राहिलेले श्रीराम मंदिर हे हिंदू समाजाच्या सांस्कृतिक स्मृतीचे आणि श्रद्धेचे केंद्र आहे. त्यामुळे या मंदिराशी संबंधित कोणतीही अनियमितता ही केवळ आर्थिक गैरव्यवहार म्हणून पाहता येत नाही. ती थेट भाविकांच्या विश्वासाशी जोडलेली बाब ठरते. म्हणूनच …

Read More »

सशस्त्र दलांतील महिलाराज

अलीकडेच भारतीय सशस्त्र दलांच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण आणि अभिमानास्पद घटना घडली. राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या (एनडीए) पहिल्या महिला तुकडीतील 14 कॅडेटस्‌‍नी कठोर प्रशिक्षण पूर्ण करून भारतीय लष्कर आणि हवाई दलात अधिकारी म्हणून प्रवेश मिळवला. महिला सक्षमीकरण, लैंगिक समानता आणि राष्ट्रनिर्माणाच्या दृष्टीने हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. भारतीय सैन्य व्यवस्थेतील हा बदल केवळ एका संस्थेपुरता मर्यादित नसून देशातील सामाजिक परिवर्तनाचेही …

Read More »