लेख-समिक्षण

व्यक्ति विकास

दुधापासून कपडे निर्मिती

दुधाला फाटल्यानंतर तुम्ही खराब म्हणून फेकून देत असता त्यापासून डिझायनर साडी, कुर्तेआणि फॅशनेबल आऊटफिट तयार केले जात असतात. ऐकायला हे विचित्र वाटले; परंतु दुधापासून कपडे तयार करण्याची इंडस्ट्री सध्या चर्चेत आहे. या कपड्यांना ‌‘मिल्क फॅब्रिक‌’ म्हणतात. हे एक असे कापड आहे जे दिसायला रेशमासारखे मुलायम आणि परिधान करण्यासाठी खूपच आरामदायी असते. दुधापासून तयार होणारे कपडे हे आता थंडीपासूनही बचाव करत …

Read More »

टेरेसवरील शेतीपासून 20 एकरांच्या बेरी फार्मपर्यंत

मुंबईच्या केया सालोट यांचा व्यवसायाचा प्रवास वेगळ्या वाटेने जाण्याची प्रेरणा देणारा आहे. लहानपणापासूनच घरातील व्यवसायाचे वातावरण पाहिल्यामुळे उद्योजकतेची ओढ त्यांच्या मनात होती. मात्र, सुरुवातीला त्यांनी कॉर्पोरेट कायदा क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर भारतातील मोठ्या कायदेविषयक कंपन्यांमध्ये त्यांनी काम केले. काही वर्षांनी स्वतःचा व्यवसाय उभारण्याची इच्छा अधिक तीव्र झाली आणि 2018 मध्ये त्यांनी नोकरीतून ब्रेक घेतला. मुंबईतील …

Read More »

निएंडरथल धार्मिक होते का?

निएंडरथल मानवांनी त्यांच्या गूढ जीवनाबद्दल अनेक संकेत मागे सोडले आहेत. परंतु, त्यांच्या आध्यात्मिक बाजूबद्दल फार कमी माहिती उपलब्ध आहे. काही पुरातत्त्वशास्त्रज्ञ आणि मानववंशशास्त्रज्ञांना असे वाटते की, हे आदिमानव, जे 30,000 वर्षांपूर्वी नामशेष झाले, त्यांनी काही विधिवत किंवा पवित्र क्रियाकलापांमध्ये भाग घेतला असावा. निएंडरथलने केलेल्या अनेक कृती त्यांच्या धार्मिक किंवा प्रतीकात्मक विचारसरणीकडे निर्देश करतात : निएंडरथल त्यांचे मृतदेह पुरत होते, हे …

Read More »

कचऱ्यातून संधी शोधणारा उद्योजक

बंगळुरूमधील उद्योजक वैभव अनंत यांनी प्लास्टिकच्या वाढत्या वापराकडे केवळ पर्यावरणीय संकट म्हणून पाहिले नाही, तर त्यामध्ये नव्या व्यवसायाची संधीही शोधली. एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकमुळे वाढणारा कचरा आणि त्याचे पर्यावरणावर होणारे गंभीर परिणाम लक्षात घेऊन त्यांनी पर्यावरणपूरक पॅकेजिंग क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच ‌‘बॅम्ब्र्यू‌’ या कंपनीची सुरुवात झाली. ‌‘बॅम्ब्र्यू‌’मध्ये बांबू, लाकडाचा लगदा आणि नैसर्गिक तंतू यांसारख्या साहित्याचा वापर करून जैवविघटनशील …

Read More »

आता पेरु येणार वेलींवर

जर तुम्हाला एखाद्या बागेत पेरूच्या झाडाच्या फांद्या कारल्याच्या वेलीसारख्या तारांवर गुंडाळलेल्या दिसल्या, तर आश्चर्यचकित होऊ नका. ही पेरूची कोणतीही नवीन प्रजाती नसून, बागायती शेतीचे हे एक नवीन तंत्रज्ञान आहे, जे उत्पादन दुप्पट करून बागायतदारांच्या उत्पन्नात वाढ करेल. प्रयागराजसह उत्तर प्रदेशातील चार जिल्ह्यांमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून यावर काम सुरू झाले आहे. पेरूच्या उत्पादनासाठीच्या या नवीन तंत्रज्ञानाला ‌‘इस्पेलियर सघाई प्रणाली‌’ असे म्हणतात. …

Read More »

पर्यावरणपूरक यशोगाथा

दरवर्षी टिश्यू पेपर, स्वयंपाकघरातील कागदी पुसणी आणि इतर कागदी वस्तूंच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर झाडांची तोड केली जाते. वाढते प्रदूषण आणि नैसर्गिक साधनसंपत्तीवरील ताण लक्षात घेता पर्यावरणाला कमी हानी पोहोचवणारे पर्याय शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. याच विचारातून 2019 मध्ये अलय पटेल आणि अनिरुद्ध शर्मा या दोन मित्रांनी ‌‘बेको‌’ या उद्योगाची स्थापना केली. त्यांचे उद्दिष्ट केवळ नवा उद्योग उभारणे नव्हते, तर …

Read More »

लवंग खा झोपण्यापूर्वी

स्वयंपाकघरात असणारे मसाले फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठी नसतात, तर आरोग्यासाठीही तेवढेच महत्त्वाचे असतात. असे अनेक मसाले आहेत, जे अनेक आजारांसाठी रामबाण उपाय ठरतात. गरम मसाल्यांमधील एक म्हणजे लवंग. गरम मसाल्यातील लवंग बहुतांश खाद्यपदार्थांमध्ये वापरली जाते. लवंगेमुळे जेवणाची चव वाढते आणि आरोग्यासही लाभ मिळतात. विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी लवंग खाल्ल्‌‍यास शरीरामध्ये सकारात्मक बदल घडतात. अमेरिकेतील एका प्रसिद्ध डॉक्टरने लवंग खाण्याचे फायदे सांगितले …

Read More »

स्मार्टफोनच्या साथीने बनला कोट्यधीश

जिद्द, योग्य कल्पना आणि बदलत्या काळाची अचूक ओळख असेल तर यशासाठी मोठ्या भांडवलाची गरज नसते, हे राजस्थानमधील 22 वर्षीय जसपाल सिंह सिंधल यांनी सिद्ध करून दाखवले आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात बारावीचा विद्यार्थी असलेल्या जसपालकडे महागडा कॅमेरा किंवा संगणक नव्हता. केवळ स्मार्टफोनच्या मदतीने त्यांनी प्रेरणादायी भाषणे, टेड टॉक्स आणि विविध नामवंत व्यक्तींच्या भाषणांतील महत्त्वाचे भाग निवडून लहान व्हिडिओ तयार करण्यास सुरुवात …

Read More »

वाळवंटातील महादीर्घायुषी वनस्पती

जगातील काही झाडे दिसायला विचित्र असतात, तर काही त्यांच्या अनोख्या गुणधर्मांमुळे उठून दिसतात. वनस्पतीच्या जगात जोशुआ ट्री ही एक अनोखी प्रजाती आहे. याला युक्का ब्रेविफोलिया किंवा युक्का पाम इत्यादी नावांनीही ओळखले जाते. वाळवंटातील बुंध्यासारख्या दिसणाऱ्या या मोठ्या जीवाला पाहून असे वाटत नाही की ते खूप दीर्घायुष्यी असेल. अमेरिकेतील कॅलिफोर्निया, ॲरिझोना, उटाह आणि नेव्हाडामध्ये आढळणारे युक्का ब्रेविफोलिया 400 ते 1800 मीटर …

Read More »

अवकाश क्षेत्राला नवे क्षितिज देणारी जोडी.

भारतीय अंतराळ संशोधनाच्या इतिहासात 18 जुलै 2026 हा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला. हैदराबादस्थित स्कायरूट एरोस्पेसने विकसित केलेल्या ‌‘विक्रम-1‌’ या रॉकेटने यशस्वीपणे पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करून भारताच्या खासगी अवकाश उद्योगासाठी नवे पर्व सुरू केले. या ऐतिहासिक मोहिमेच्या केंद्रस्थानी पवन कुमार चंदना आणि नागा भरत डाका हे दोन भारतीय अभियंते होते. पवन चंदना यांनी आयआयटी खरगपूरमधून यांत्रिकी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर 2012 ते …

Read More »