लेख-समिक्षण

व्यक्ति विकास

मिमांस वामकुक्षीची

अनेकजण दुपारी जेवणावर आडवा हात मारून लगेचच आडवे होतात. दुपारची ‌‘वामकुक्षी‌’ या नावाने अनेक लोक तासाभराची का होईना झोप काढत असतात. अर्थात, दुपारच्या जेवणानंतर झोप येणे किंवा सुस्ती येणे, हे अगदी साहजिक आहे. ऑफिसमध्ये दुपारच्या जेवणानंतर आपल्या आजूबाजूचे बरेच लोक जांभई देताना दिसतात. कधीकधी आपल्याला शरीरातून सर्व ऊर्जा निघून गेली आहे आणि झोपेशिवाय पर्याय नाही, असेही वाटते. पण, दुपारच्या जेवणानंतर …

Read More »

जिद्दीच्या बळावर यशाला गवसणी

तमिळनाडूतील एका सर्वसामान्य तरुणानं सुरुवातीला 25 हजार रुपयांची नोकरी नाकारून अवघ्या 10 हजार रुपयांची इंटर्नशिप पत्करली, केवळ मॅगी खाऊन दिवस काढले आणि आज तो एका यशस्वी कंपनीचा मालक बनला आहे. ही प्रेरणादायी यशोगाथा आहे इमॅन्युएल जॉन या तरुण उद्योजकाची. इमॅन्युएल जॉन यांनी 2018 मध्ये 25 हजार रुपयांची नोकरी नाकारून बंगळुरूमधील एका स्टार्टअपमध्ये कोडिंग शिकण्यासाठी 10 हजार रुपयांची इंटर्नशिप स्वीकारली. पैशांच्या …

Read More »

माऊंट एव्हरेस्टची उंची का वाढतेय?

ऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहे. पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या शिखरांपैकी एव्हरेस्टची उंची समुद्रसपाटीपासून सर्वांत जास्त आहे. या शिखराची उंची आणखी वाढत आहे. ही बाब जरा विचित्र वाटेल; पण ती पूर्णपणे खरी आहे. 2005 मध्ये चीनने त्याची उंची मोजली होती, तेव्हा ती 8844.43 मीटर भरली होती. 2020 मध्ये चीन आणि नेपाळने संयुक्तपणे पुन्हा एव्हरेस्टची उंची मोजली आणि डेटा शेअर …

Read More »

प्रेरणादायी यशोगाथा

तमिळनाडूतील एका सर्वसामान्य तरुणानं सुरुवातीला 25 हजार रुपयांची नोकरी नाकारून अवघ्या 10 हजार रुपयांची इंटर्नशिप पत्करली, केवळ मॅगी खाऊन दिवस काढले आणि आज तो एका यशस्वी कंपनीचा मालक बनला आहे. ही प्रेरणादायी यशोगाथा आहे इमॅन्युएल जॉन या तरुण उद्योजकाची. इमॅन्युएल जॉन यांनी 2018 मध्ये 25 हजार रुपयांची नोकरी नाकारून बंगळुरूमधील एका स्टार्टअपमध्ये कोडिंग शिकण्यासाठी 10 हजार रुपयांची इंटर्नशिप स्वीकारली. पैशांच्या …

Read More »

सर्वात भयावह आणि महाकाय पक्षी

सुमारे 1 कोटी 20 लाख वर्षांपूर्वी या पृथ्वीतलावर एक महाकाय व भयावह पक्षी अस्तित्वात होता. हा आतापर्यंतचा ज्ञात असा सर्वाधिक मोठ्या आकाराचा, आक्रमक पक्षी आहे. त्याची उंची तब्बल नऊ फुटांची होती! आता अशा एका प्रागैतिहासिक काळातील पक्ष्याचे जीवाश्म सापडले आहेत. त्याच्या जीवाश्मभूत पायाच्या थ्रीडी ॲनालिसिस वरून असे दिसून येते की, अशा भयावह पक्ष्याची सध्याच्या मगरींसारख्या तत्कालीन प्राण्याने शिकार केली होती. …

Read More »

प्रयत्न सोडू नका

‘रील्स‌’ बनवणाऱ्या असहाब अहमद अन्सारी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) परीक्षेत अपयश आल्यानंतरही जिद्द न हारता कर्मचारी निवड आयोगाच्या (एसएससी सीजीएल) परीक्षेत मोठे यश मिळवले आहे. उत्तर प्रदेशातील टांडा या छोट्या गावातील रहिवासी असलेल्या असहाब यांनी शालेय शिक्षणात उत्तम गुण मिळवले होते. त्यानंतर कोटा येथे जाऊन त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी केली आणि पुढे अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमधून अभियांत्रिकीची (बीटेक) पदवी पूर्ण …

Read More »

मागणी राणी नेफरतितीच्या पुतळ्याची

इजिप्तच्या तीन-चार हजार वर्षांपूर्वीच्या संस्कृतीच्या खुणा आजही पिरॅमिड, मकबरे व प्राचीन कलाकृतींच्या स्वरूपात पाहायला मिळतात. त्यापैकीच एक कलाकृती म्हणजे 3,370 वर्षांपूर्वीच्या राणी नेफरतितीचा पुतळा. या पुतळ्याचा शोध लागल्यापासून तो जर्मनीतच आहे. एका इजिप्शियन पुरातत्त्वज्ञाने बर्लिनमध्ये असलेला हा राणी नेफरतितीचा अर्धपुतळा परत करण्याची मागणी केली आहे; तर जर्मनीने तसे करण्यास नकार दिला आहे. नेफरतिती प्राचीन इजिप्तच्या इतिहासातील एक अत्यंत प्रसिद्ध आणि …

Read More »

आयआयटी पासआऊट चिकन व्यवसायातून कोट्याधीश

तेलंगणाचा रहिवासी असलेल्या सैकेश गौडने आयआयटी वाराणसीमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली होती. शिक्षण पूर्ण होताच त्याला सॉफ्टवेअर क्षेत्रात वार्षिक 28 लाख रुपयांच्या पॅकेजची नोकरी मिळाली. कॉर्पोरेट जगतात उत्तम भवितव्य असतानाही सैकेशच्या मनात स्वतःचा काहीतरी उद्योग सुरू करण्याचे विचार घोळत होते. याच काळात त्याची भेट हेमाम्बर रेड्डी आणि मोहम्मद सामी उद्दीन यांच्याशी झाली. हेमाम्बर हे त्यावेळी भारतातील मांस उद्योगाचा अभ्यास करत …

Read More »

मंगळ का पडला कोरडा ?

आपल्या शेजारचा लाल ग्रह ‌‘मंगळ‌’ नेहमीच खगोलशास्त्रज्ञांसाठी कुतूहलाचा बनून राहिलेला आहे. या ग्रहावर एकेकाळी वाहते पाणी होते, नद्या-सरोवरे होती, हे आता सिद्ध झालेले आहे. मग हे पाणी गेले कुठे, असा प्रश्न पडतो. त्याची वेगवेगळी कारणे आहेत. त्यापैकी एक कारण म्हणजे तेथील खडकांनी स्पंजाप्रमाणे हे पाणी शोषून घेतले, हे असल्याचाही दावा काही संशोधकांनी केलेला आहे. मंगळाची सध्याची भूमी ओसाड, गोठलेली आणि …

Read More »

गरिबीवर मात करत ऐतिहासिक कामगिरी

आंध्रमधील विझियानगरम जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून आलेल्या दोन सख्ख्या बहिणींनी जागतिक क्रीडा नकाशावर आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे. एका शेतमजूर पित्याच्या या मुलींनी सामोआ येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल युवा आणि कनिष्ठ भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकांवर नाव कोरून भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. बेलना हारिका आणि बेलना भार्गवी अशी या दोन सुवर्णकन्यांची नावे असून, त्यांच्या यशाने प्रतिकूल परिस्थितीवर जिद्दीने मात …

Read More »