लेख-समिक्षण

व्यक्ति विकास

दहावी शिकलेला तरुण बनला कोट्यधिश उद्योगपती

जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे उद्योगपती सत्यनारायण नुवाल. राजस्थानच्या एका छोट्या गावातून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज जागतिक स्तरावर स्फोटक आणि संरक्षण क्षेत्रातील एका महाकाय साम्राज्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. नुकतेच केंद्र सरकारने त्यांच्या या अतुलनीय योगदानाची दखल घेत त्यांना ‌‘पद्मश्री‌’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. सत्यनारायण नुवाल यांचा जन्म 25 जुलै …

Read More »

दिवसभराची श्वासगणना शक्य आहे?

काही रोजच्या गोष्टी आपण गृहितच धरत असतो व त्याविषयी फारसा विचार करत नाही. या जगात पाऊल ठेवल्यापासून आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपला श्वासोच्छ्वास अखंडपणे चालूच असतो. आपण दिवसभरात किती वेळा श्वास घेतो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? माणूस दिवसातून अर्थात 24 तासांमध्ये किती वेळा श्वास घेतो, याबाबतही अनेकांना कुतूहल वाटू शकते. शरीरशास्त्र आणि जीवशास्त्राच्या अभ्यासातून या प्रश्नाची उकल होते. …

Read More »

शेतकऱ्याच्या लेकीची भरारी

जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर स्वप्नांना गवसणी कशी घालता येते, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आश्रिता. एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आश्र्तािने आपल्या कष्टाने अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली आहे. ज्योतिषमती इंजिनिअरिंग कॉलेजमधून बी.टेक. पूर्ण केल्यानंतर तिने आपल्या आवडीच्या हार्डवेअर इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला, जो तिच्या अनेक सोबत्यांनी निवडलेल्या वाटेपेक्षा वेगळा होता. आश्रिताचा हा प्रवास सोपा नव्हता. पहिल्या ‌‘गेट‌’ …

Read More »

तीस टन वजनाची उल्का!

पृथ्वीवर अनेक वेळा उल्कावर्षाव होत असतो. अर्थात, पृथ्वीच्या वातावरणात येताच या अवकाशीय शिळा जळून त्यांचे छोटे तुकडेच जमिनीपर्यंत येत असतात. मात्र, पृथ्वीवर काळाच्या ओघात काही मोठ्या उल्काही कोसळलेल्या आहेत. अशीच एक उल्का अर्जेटिनातील कॅम्पो डेल सिएलो येथे उत्खननात सापडली होती. या उल्केचे वजन तब्बल तीस टन इतके आहे. ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी उल्का असल्याचे काहींचे म्हणणे आहे. विशेष …

Read More »

120 दिवसांच्या तयारीत बनल्या सनदी अधिकारी

केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा ही देशातील अत्यंत कठीण आणि प्रतिष्ठित परीक्षा मानली जाते. लाखो तरुण या परीक्षेसाठी वर्षानुवर्षेकठोर परिश्र्म करतात, तरीही यशाची खात्री नसते. मात्र, काही व्यक्ती अशा असतात ज्यांच्या जिद्दीपुढे नियतीलाही झुकावे लागते. 32 वर्षीय तरुणी पांडे यांची यशोगाथा अशाच अदम्य साहसाचे प्रतीक आहे. आयुष्याच्या अशा वळणावर जिथे वयोमर्यादेमुळे त्यांच्याकडे शेवटची संधी उरली होती, तिथे त्यांनी कोणत्याही …

Read More »

मोड आलेल्या मेथीचे लाभ

मेथी दाणे असोत किंवा मेथीची हिरवीगार भाजी, त्यांचे आरोग्यविषयक महत्त्व बरेच आहे. विशेषतः मोड आलेली मेथी आरोग्यासाठी अनेक प्रकारे लाभदायक ठरते, असे तज्ज्ञ सांगतात. मोड आलेल्या मेथीमध्ये आवश्यक जीवनसत्त्व, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. तसेच हे व्हिटॅमिन-सी, ए ने समृद्ध असून आरोग्य सुद़ृढ ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. मोड आलेल्या मेथीच्या सेवनाचे हे काही लाभ… पचनासाठी फायदेशीर : मोड आलेल्या मेथीमधील उच्च फायबर …

Read More »

चिलकूरच्या मातीतून जागतिक क्षितिजाकडे

हैदराबादच्या कोलाहलापासून दूर, चिलकूर गावातील एक एकर शेतात झाडांच्या सावलीत आणि खुल्या आकाशाखाली एक वेगळीच सृष्टी आकाराला येत आहे. जहाजाच्या जुन्या ‌‘कंटेनर‌’ला कल्पकतेने घराचे रूप देऊन तिथे राहणारा एक तरुण कलाकार आज जागतिक कलाविश्वात आपली मोहोर उमटवत आहे. हर्ष दुरूगड्डा असे या शिल्पकाराचे नाव असून, त्यांनी आपल्या कलेच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान उंचावली आहे. सध्या त्यांच्या कार्याचा गौरव होत …

Read More »

केळीचे फुलही आरोग्यदायी

अरोग्यासाठी केळाचे सेवन आरोग्यदायी असते हे आपल्याला माहिती आहेच; पण केळफूलही आरोग्यदायी असते याची अनेकांना कल्पना नसते. केळीच्या फुलांमध्ये फायबर, प्रथिने, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, तांबे, फॉस्फरस आणि व्हिटामिन ईसारखी खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात. हे फूल कच्चे किंवा शिजवून, तसेच सूप, कोशिंबीर आणि तळूनदेखील खाल्ले जाऊ शकते. याशिवाय केळीच्या फुलाचा हेअर पॅक किंवा फेस पॅक म्हणूनही वापर करता येतो. अनेक …

Read More »

विचारांची ‌‘विराट‌’ शिदोरी

काही माणसे आपल्या कार्यक्षेत्रात केवळ नाव कमवत नाहीत, तर इतिहास घडवतात. क्रिकेटच्या मैदानावर जेव्हा-जेव्हा विक्रमांची चर्चा होते, तेव्हा विराट कोहली हे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. विराटचे हे यश केवळ नशिबाचा भाग नसून, त्यामागे अफाट कष्ट, शिस्तबद्ध सराव आणि तंदुरुस्तीसाठीचा कठोर डाएट यांचा मोठा वाटा आहे. आयुष्यात कितीही उतार-चढाव आले तरी विराटने आपला सकारात्मक दृष्टिकोन कधीही सोडला नाही. विराटच्या मते, कष्टाला …

Read More »

सर्वांत लहान तापमापक

सर्वात लहान किंवा मोठ्या आकाराच्या वस्तू नेहमीच लोकांचे लक्ष वेधून घेत असतात. सध्याच्या नॅनो टेक्नॉलॉजीच्या काळात अत्यंत सूक्ष्म अशा वस्तूही बनवल्या जात आहेत. वैज्ञानिकांनी जगातील सर्वात लहान तापमापक तयार केलेला असून, तो मानवी केसापेक्षा वीस हजार पटींनी लहान आहे. डीएनएच्या रचनांचा वापर करून तो तयार केला आहे. विशिष्ट तापमानाला घडी घातल्या जाणाऱ्या तर विशिष्ट तापमानाला उलगडत जाणाऱ्या जनुकांचा वापर त्यात …

Read More »