• 18 October 2026

अंक मिळणेसाठी


एकूण वाचक संख्या : 4212

TimeLine Layout

September, 2026

  • 13 September

    सात अपयशांनंतर स्वप्नाल गवसणी

    वर्षाला 46 लाख रुपयांचे पॅकेज, जगातील नामांकित कंपनीत नोकरी आणि पुढे उज्ज्वल करिअरची हमी… इतके मिळाल्यानंतर बहुतेक जण दुसऱ्या पर्यायाचा विचारही करणार नाहीत. मात्र लखनौच्या 27 वर्षीय शारदेंदू तिवारी यांच्यासाठी हे अंतिम ध्येय नव्हते. त्यांना भारतीय लष्कराची वर्दी खुणावत होती. त्यासाठी त्यांनी मोठ्या पगाराची नोकरी सोडली, 7 वेळा आलेले अपयश पचवले आणि आठव्या प्रयत्नात लष्करात अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. …

    Read More »
  • 13 September

    विश्वासाची कसोटी

    निवडणुकीचा निकाल कोणाच्या बाजूने लागतो, यापेक्षा तो निकाल ज्या प्रक्रियेतून आला त्या प्रक्रियेवर पराभूत पक्षाचाही विश्वास असणे लोकशाहीसाठी अधिक महत्त्वाचे असते. भारतात ही जबाबदारी निवडणूक आयोगाकडे आहे. त्यामुळे ईव्हीएम असो किंवा मतदारयादीचे पुनरीक्षण, निवडणूक प्रक्रियेविषयी वारंवार शंका उपस्थित होत असतील तर त्यांना केवळ राजकीय आरोप म्हणून झटकून टाकण्याऐवजी त्यांचे निरसन करणे हे आयोगाचे कर्तव्य ठरते. ईव्हीएममधील मतमोजणीसाठी ‌‘टोटलायझर‌’ वापरण्याच्या मागणीवर …

    Read More »
  • 13 September

    आजचा दिलासा, उद्याचे ओझे?

    रुपयावरील दबाव कमी करण्यासाठी परदेशातून डॉलर देशात आणणे हा तातडीचा उपाय असू शकतो; परंतु त्यासाठी भविष्यात मोठी किंमत मोजावी लागणार असेल, तर या यशाकडे जरा वेगळ्या नजरेने पाहावे लागेल. ‌‘फॉरेन करन्सी नॉन-रेसिडेंट बँक‌’ अर्थात एफसीएनआर-बी योजनेतून अनिवासी भारतीय आणि परदेशातील भारतीय वंशाच्या ठेवीदारांकडून सुमारे 136 अब्ज डॉलर भारतात आले. डॉलरची मागणी वाढून रुपया दबावाखाली असताना या ओघाने चलनाला आधार मिळाला. …

    Read More »
  • 13 September

    सात हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरच्या चौपदरीकरणाचा निर्णय

    पीएम गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन अंतर्गत केंद्र सरकार रेल्वेच्या आधुनिकीकरणावर भर देत आहे. सात उच्च-घनतेच्या कॉरिडॉरचे चौपदरीकरण करण्याची योजना आहे. 10,783 कोटी रुपयांच्या तीन मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पांमुळे पाच राज्यांमध्ये रेल्वेमार्गांची क्षमता 656 किमीने वाढेल. यामुळे वाहतूक आणि मालवाहतुकीत सुधारणा होईल, अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र …

    Read More »
  • 13 September

    पुन्हा युध्द, पुन्हा इंधनझळा!

    आखातात अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धसंघर्ष सात महिने पूर्ण होत आले तरी संपण्याचे नाव घेत नाही. उलट आता तो अधिक तीव्र बनताना दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील मध्यावधी निवडणुका होईपर्यंत इराणयुद्ध संपणार नाही, अशी स्पष्टोक्ती दिल्यामुळे जगाची चिंता वाढली आहे. विशेषतः कच्च्या तेलाच्या दरांनी शंभरी ओलांडल्यामुळे आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा तेलआयातदार असणाऱ्या भारतापुढील आव्हान अधिक बिकट झाले आहे. एप्रिल …

    Read More »
  • 13 September

    पाऊस अपुरा, पण पुराचा विळखा!

    देशाच्या मध्य आणि उत्तर भागात सध्या पावसाने विचित्र पेच निर्माण केला आहे. एका प्रदेशात नद्या पात्र सोडून वस्त्यांमध्ये शिरत आहेत, तर त्याच राज्याच्या दुसऱ्या भागात पावसाची तूट भरून निघालेली नाही. उत्तर प्रदेशात गंगा, यमुना, मंदाकिनी आणि घाघरा यांच्या वाढत्या पाणीपातळीने सुमारे 26 जिल्ह्यांना फटका बसला आहे. बिहारमध्ये गंगा, गंडक आणि कोसीने धोक्याची पातळी ओलांडल्याने पाटण्यासह 14 जिल्ह्यांतील परिस्थिती बिकट आहे. …

    Read More »
  • 6 September

    अल्लू अर्जुनचा ट्रिपल रोल

    दक्षिणेचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि प्रसिद्ध दिग्दर्शक एटली यांच्या आगामी ‌‘राका‌’ या चित्रपटाची सध्या सिनेविश्वात प्रचंड चर्चा सुरू आहे. ‌‘पुष्पा‌’ चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर अल्लू अर्जुन एका अत्यंत वेगळ्या आणि भव्य रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पादुकोण, रश्मिका मंदाना आणि जान्हवी कपूर या आघाडीच्या अभिनेत्री महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकणार असल्याचे बोलले जात आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाला आता वेग आला …

    Read More »
  • 6 September

    रुपेरी पडद्यावरची कृष्णगीते

    गोकुळाष्टमी आली की मंदिरांतील आरत्या, दहीहंडीचा जल्लोष आणि गोविंदांच्या आरोळ्यांबरोबरच मनात नकळत काही चित्रपटगीतेही जागी होतात. कृष्णाच्या बाललीला, राधा-कृष्णाचे प्रेम, भक्ती, खोडकरपणा आणि लोकउत्सव यांना हिंदी चित्रपटसृष्टीने इतक्या विविध रंगांत टिपले आहे की, ही गीते केवळ पडद्यापुरती राहिलेली नाहीत; ती लोकपरंपरेचाच एक भाग बनली आहेत.- सोनम परब हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळापासूनच भक्तिगीतांना विशेष स्थान होते. त्यात श्रीकृष्ण हा तर गीतकार, …

    Read More »
  • 6 September

    एआयच्या जगात व्हिडिओ एडिटर बनताना…

    कृत्रिम बुद्धिमत्तेने अनेक व्यवसायांचे स्वरूप बदलले आहे. त्यात चित्रफित संपादनाचे (व्हिडिओ एडिटिंग) क्षेत्रही अपवाद नाही. काही वर्षांपूर्वी एखादी चित्रफीत तयार करण्यासाठी चित्रीकरण, संपादन, ध्वनिसंयोजन, रंगसुधारणा आणि अंतिम रूप देण्यासाठी स्वतंत्र व्यक्तींची गरज भासत असे. आता कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित साधने यातील अनेक कामे काही मिनिटांत करून देतात. त्यामुळे ‌‘आता चित्रफित संपादकांची गरजच राहणार नाही‌’, असा समज अनेक तरुणांमध्ये निर्माण झाला आहे. …

    Read More »
  • 6 September

    भुवयांची ठेवण हवी चेहऱ्याच्या आकारानुसार

    चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी भुवयांचा आकार अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतो. भुवयांना दिलेला योग्य आकार चेहऱ्यावरील हावभाव अधिक स्पष्ट करतो. तज्ज्ञांच्या मते, जर आपण चेहऱ्याच्या रचनेनुसार भुवयांचा आकार निवडला, तर त्यामुळे चेहरा अधिक स्वच्छ आणि उठावदार दिसण्यास मदत होते. मात्र, चुकीचा आकार निवडला गेला, तर संपूर्ण लूक बिघडू शकतो. ब्यूटी एक्स्पर्ट पूजा गोयल यांनी विविध फेसकटनुसार भुवयांचे कोणते प्रकार उठावदार दिसतात, यावर …

    Read More »