देशातील रस्त्यांवर वाढत चाललेले अतिक्रमण ही आता केवळ वाहतुकीची अडचण उरलेली नसून, तो एक अत्यंत गंभीर सुरक्षेचा प्रश्न बनला आहे. रस्त्यांच्या कडेला होणारे अवैध बांधकामांचे विस्तार, पदपथांवर थाटलेली दुकाने आणि रस्त्यांवर केली जाणारी बेशिस्त पार्किंग यामुळे महामार्ग आणि शहरांतील रस्ते दिवसेंदिवस अरुंद होत चालले आहेत. वाहनांच्या संख्येत होणाऱ्या प्रचंड वाढीमुळे रस्त्यांचा एक मोठा भाग अनधिकृत पार्किंग आणि मालवाहतुकीच्या साहित्यासाठी वापरला …
Read More »TimeLine Layout
September, 2026
-
27 September
ज्ञानेश कुमार गोत्यात
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे निवडणूक आयोगात एकाधिकारशाही राबवत असून त्यांना हटवण्याची मागणी विरोधी पक्षांनी बुधवारी केली. मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीच्या (एसआयआर) मुद्द्यावर निवडणूक आयोगाचे सुखबीरसिंग संधू आणि विवेक जोशी या अन्य दोन निवडणूक आयुक्तांनी 10 महिन्यांच्या कालावधीत 14 आक्षेप नोंदवल्याचे वृत्त ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने प्रसिद्ध केल्यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. ज्ञानेश कुमार यांना अटक करण्याची मागणी विरोधी …
Read More » -
27 September
संकट भीषण दुष्काळाचे
महाराष्ट्रातील दुष्काळाचे संकट दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालले असून, राज्यातील कृषी उत्पन्नावर मोठे सावट पसरले आहे. देशातील ऊस, सोयाबीन आणि कापूस उत्पादनात अग्रस्थानी असलेल्या राज्यात या भीषण दुष्काळामुळे अन्नधान्य आणि नगदी पिकांसह उर्वरित शेतीपिकांचे अतोनात नुकसान होत आहे. खरीप हंगामातील प्रमुख पिके करपून गेल्यामुळे शेतकरी बांधव मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून, एकूणच ग्रामीण अर्थव्यवस्था हादरली आहे. मान्सूनच्या परतीचे दिवस जवळ …
Read More » -
27 September
दहशतवादाचा भस्मासूर उलटला
दहशतवाद्यांना खतपाणी घालून आणि पोसून त्यांना शेजारील देशांविरुद्ध हत्यार म्हणून वापरणाऱ्या पाकिस्तानसाठी आता हेच हत्यार सर्वात मोठा भस्मासूर ठरत आहे. हिंसक दहशतवादामुळे आज पाकिस्तानची अंतर्गत सुरक्षा, कोलमडलेली अर्थव्यवस्था आणि सामाजिक स्थैर्य धोक्यात आले आहे. याच मालिकेतील अलिकडच्या घटनेत, पाकिस्तानच्या कोहाट जिल्ह्यात शुक्रवारी जुम्माच्या नमाजादरम्यान दहशतवाद्यांनी प्रथम एका मशिदीजवळ स्फोटकांनी भरलेल्या वाहनाचा भीषण स्फोट घडवून आणला आणि त्यानंतर लागलीच जवळच असलेल्या …
Read More » -
20 September
दोन कोटींत बनलेल्या चित्रपटाची ‘हनुमान’उडी!
चित्रपटसृष्टीत भव्यदिव्य सेट, तगडी स्टारकास्ट आणि कोट्यवधींचा बजेट म्हणजेच सिनेमा हिट होण्याचे सूत्र, असा एक समज वर्षानुवर्षेचालत आला आहे. मात्र, आशयघन कथा आणि सशक्त अभिनय यांच्या जोरावर अल्प बजेटमध्ये तयार झालेले चित्रपटही बॉक्स ऑफिसवर चमत्कार घडवू शकतात, हे ‘हनुमान अंश’ या चित्रपटाने सिद्ध करून दाखवले आहे. 7 ऑगस्ट रोजी अत्यंत शांततेत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने सुरुवातीच्या दिवसांत धीम्या गतीने सुरुवात …
Read More » -
20 September
रुपेरी पडद्यावरचा बाप्पा
गणपतीच्या आरतीचा स्वर, ढोल-ताशांचा वाढता गजर, गुलालाने भरलेले रस्ते आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पुढे सरकणारी विसर्जन मिरवणूकहे दृश्य महाराष्ट्राच्या उत्सवसंस्कृतीइतकेच भारतीय चित्रपटांच्या पडद्यावरही परिचित झाले आहे. कधी नायकाच्या आयुष्यातील निर्णायक वळणाचा साक्षीदार, कधी संकटात श्र्द्धेचा आधार, तर कधी मुंबईच्या चाळी-वस्त्यांतील सामूहिक जगण्याचा उत्सव म्हणून गणराया सिनेमात भेटत राहिला. गणेशोत्सवाने सिनेमातील गाणी, नृत्य आणि भव्यतेला आपलेसे केले. यातून गणेशोत्सव आणि …
Read More » -
20 September
समस्या सोडविण्याची कला शिका
परीक्षेचा ताण असो, नोकरीची चिंता असो, लग्नाची तयारी असो किंवा पैशांची अडचण असो, आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर कोणत्या ना कोणत्या समस्येला सामोरे जावेच लागते. समस्या नसलेले आयुष्य कदाचित कोणाचेच नसते. मात्र, समस्या आली की काही जण घाबरून जातात, तर काही जण शांतपणे परिस्थितीचा विचार करून त्यातून मार्ग काढतात. फरक असतो तो समस्येकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचा. समस्या सोडविण्याचे कौशल्य जन्मतः मिळत नाही; ते …
Read More » -
20 September
गुळ आणि लिंबाने घालवा मुरुमांचे व्रण
चेहऱ्यावरील काळे आणि तपकिरी डाग ही सध्या एक सामान्य समस्या बनली आहे. प्रखर ऊन, मुरुमांचे वण, संप्रेरकांमधील बदल (हार्मोनल चेंजेस) किंवा पिगमेंटेशनमुळे त्वचेचा पोत आणि रंग असमान दिसू लागतो. यावर उपाय म्हणून अनेक जणी महागड्या रासायनिक उत्पादनांचा आधार घेतात, मात्र गुळ आणि लिंबू यांसारख्या घरात सहज उपलब्ध होणाऱ्या घटकांचा वापर करूनही त्वचा स्वच्छ आणि चमकदार बनवता येते. लिंबामध्ये निसर्गतः व्हिटॅमिन …
Read More » -
20 September
सर्वात खोलवरची भुयारी रेल्वे
जमिनीवर वेगाने धावणाऱ्या ट्रेन तुम्ही पाहिल्या असतील, हवेत लटकलेल्या पुलावरून जाणाऱ्या ट्रेनही पाहिल्या असतील. समुद्रावरून धावणाऱ्या रेल्वेचा प्रवासही केला असेल आणि ट्रेन भुयारात अदृश्य झाल्यावर लहानपणी टाळ्याही वाजवल्या असतील, पण आज आम्ही तुम्हाला अशा एका प्रवासाला घेऊन जात आहोत, जिथे ट्रेन एकदा भुयारात शिरली की 57 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केल्यावरच बाहेर पडते! आम्ही बोलत आहोत जगातील सर्वात लांब आणि सर्वात …
Read More » -
20 September
उष्ण हवामानातील ‘केशरयुक्त’ यशोगाथा
केशर म्हटले की डोळ्यांसमोर काश्मीरची थंड हवा आणि जांभळ्या फुलांनी बहरलेली शेती येते. विशिष्ट तापमान आणि हवामानाची गरज असल्यामुळे केशराचे उत्पादन प्रामुख्याने काश्मीरशी जोडले गेले आहे. मात्र नागपूरच्या उष्ण हवामानातही आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने केशराचे उत्पादन घेता येते, हे अक्षय होले आणि दिव्या लोहकरे होले या दाम्पत्याने दाखवून दिले आहे. ‘शाया एंटरप्रायझेस’च्या माध्यमातून त्यांनी नियंत्रित वातावरणात केशर उत्पादनाचा प्रयोग यशस्वी केला. …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र







