वैद्यकीय शिक्षण, जैवतंत्रज्ञान, कृषीशास्त्र किंवा पर्यावरणशास्त्र हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना परिचित असतात. मात्र, गेल्या काही वर्षांत वेगाने महत्त्व प्राप्त करणारे मत्स्यशास्त्र हे क्षेत्र अनेकांच्या दृष्टीने अजूनही अपरिचित आहे. भारताला लाभलेला सुमारे 7,500 किलोमीटरचा समुद्रकिनारा, नद्या, तलाव, धरणे आणि वाढती मत्स्यउत्पादनाची गरज यामुळे मत्स्यव्यवसाय हा देशाच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा घटक ठरला आहे. नीती आयोगाच्या माहितीनुसार, भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मत्स्यउत्पादक देश असून …
Read More »TimeLine Layout
August, 2026
-
23 August
लोकप्रियता हिरव्या बांगड्यांची
बांगड्या हा सौभाग्याचा महत्त्वाचा अलंकार आहे. कालोघात तो फॅशनचाही अविभाज्य भाग बनला. बांगड्यांमध्ये आजमितीला असंख्य व्हरायटी बाजारात पाहायला मिळते. पण तरीही आजच्या आधुनिक युगातही सुवासिनींकडून हिरव्या बांगड्यांना अधिक पसंती दिली जाते. विशेषतः सणासुदीला तरुणी-महिला आवर्जून हिरव्या बांगड्या भरतात. श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा असून या महिन्यात हिरव्या बांगड्यांचं मोठं महत्त्व आहे. हिरवा रंग हा सृष्टीचे प्रतीक असून श्र्ावण महिन्यात वर्षा ऋतू …
Read More » -
23 August
दुधापासून कपडे निर्मिती
दुधाला फाटल्यानंतर तुम्ही खराब म्हणून फेकून देत असता त्यापासून डिझायनर साडी, कुर्तेआणि फॅशनेबल आऊटफिट तयार केले जात असतात. ऐकायला हे विचित्र वाटले; परंतु दुधापासून कपडे तयार करण्याची इंडस्ट्री सध्या चर्चेत आहे. या कपड्यांना ‘मिल्क फॅब्रिक’ म्हणतात. हे एक असे कापड आहे जे दिसायला रेशमासारखे मुलायम आणि परिधान करण्यासाठी खूपच आरामदायी असते. दुधापासून तयार होणारे कपडे हे आता थंडीपासूनही बचाव करत …
Read More » -
23 August
टेरेसवरील शेतीपासून 20 एकरांच्या बेरी फार्मपर्यंत
मुंबईच्या केया सालोट यांचा व्यवसायाचा प्रवास वेगळ्या वाटेने जाण्याची प्रेरणा देणारा आहे. लहानपणापासूनच घरातील व्यवसायाचे वातावरण पाहिल्यामुळे उद्योजकतेची ओढ त्यांच्या मनात होती. मात्र, सुरुवातीला त्यांनी कॉर्पोरेट कायदा क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर भारतातील मोठ्या कायदेविषयक कंपन्यांमध्ये त्यांनी काम केले. काही वर्षांनी स्वतःचा व्यवसाय उभारण्याची इच्छा अधिक तीव्र झाली आणि 2018 मध्ये त्यांनी नोकरीतून ब्रेक घेतला. मुंबईतील …
Read More » -
23 August
प्रचाराच्या पलीकडचे वास्तव
भाजपच्या राजकारणातील ‘नॅरेटिव्ह कंट्रोल’ला धक्का बसण्यामागे केवळ प्रचारयंत्रणेची कमजोरी हे कारण नाही. प्रचार आणि प्रत्यक्ष वास्तव यांच्यात वाढत गेलेली दरी हे त्यामागचे अधिक महत्त्वाचे कारण आहे. एखाद्या राजकीय पक्षाचे संदेश, घोषणा आणि समाजमाध्यमांवरील मोहिमा तेव्हाच प्रभावी ठरतात, जेव्हा त्या जनतेच्या अनुभवांशी सुसंगत असतात. प्रत्यक्ष आयुष्यातील अनुभव मात्र वेगळे असतील, तर कोणतेही प्रभावी प्रचारतंत्र फार काळ जनमताला आपल्या बाजूने वळवू शकत …
Read More » -
23 August
अमेरिकेचा दबाव, भारतासाठी धडा
अमेरिकेच्या व्यापारधोरणातील अपयशाचे खापर आता भारतासह जगातील 40 हून अधिक देशांवर फोडण्याचा प्रयत्न होत आहे. चीनविरोधातील व्यापारयुद्ध अपेक्षित परिणाम साधू शकले नाही, यामागे चीनपेक्षा अमेरिकेच्या धोरणातील विसंगती अधिक कारणीभूत असताना त्याची जबाबदारी इतर देशांवर ढकलण्याची भूमिका ट्रम्प प्रशासनाने घेतली आहे. भारताबरोबरच जपान, दक्षिण कोरिया, कॅनडा आणि मेक्सिको यांसारख्या अमेरिकेच्या निकटवर्तीय देशांनाही चीनला सहकार्य करून अमेरिकी शुल्क चुकविण्यास मदत केल्याचा आरोप …
Read More » -
23 August
आम्ही शिंदेंना अपात्र घोषित करू शकतो का?
शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी पार पडली. शिवसेना (ठाकरे)चे पक्षाकडून कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद संपविला. सिब्बल यांचा युक्तिवाद संपल्यानंतर ठाकरे गटाचेच वकील देवदत्त कामत यांनी युक्तिवाद सुरु केला. यावेळी कामत म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष चुकले असतील तर कोर्ट आम्हाला दिलासा देऊ शकते. विधिमंडळ पक्ष कोणत्याही निवडणुकीला उमेदवार उभा करत नाही. विधिमंडळ पक्षावर सर्व अवलंबून राहण्यासाखे असेल …
Read More » -
23 August
अंधश्रद्धेचा अंधार
एकविसाव्या शतकात विज्ञान आणि तंत्रज्ञानाने मानवी जीवन आमूलाग्र बदलले असतानाही अंधश्रद्धेची मुळे समाजाच्या मनात खोलवर रुजलेली आहेत. अमरावतीतील डोमा येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनींमध्ये भूतबाधेची अफवा पसरून शेकडो विद्यार्थ्यांनी वसतिगृह सोडणे, ही केवळ एका आश्रमशाळेतील घटना म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही. भीती, अफवा आणि अज्ञान यांचा संगम झाला की सुशिक्षित समाजही तर्काचा आधार सोडून अंधविश्वासाच्या आहारी जाऊ शकतो, याचे हे अस्वस्थ …
Read More » -
23 August
‘विकसित भारता’चे आव्हान
देशाचा 80वा स्वातंत्र्यदिन उत्साहात पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करताना विकसित भारताचे लक्ष्य पुन्हा अधोरेखित केले. त्यांच्या भाषणाच्या केंद्रस्थानी यंदा युवा शक्ती होती. विशेषतः तरुणांच्या अपेक्षा, आकांक्षा आणि बदलत्या मानसिकतेचा विचार त्यांच्या भाषणातून प्रकर्षाने जाणवला. स्वातंत्र्यदिनाची थीमही भारतीय युवाशक्तीला केंद्रस्थानी ठेवणारी होती. तरुणांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणे, कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रशिक्षण देणे आणि त्यांना नव्या संधी उपलब्ध …
Read More » -
15 August
‘पल भर के लिए’ झळकणार जागतिक पातळीवर
बॉलिवूड अभिनेत्री सैयमी खेर आणि चित्रपट निर्माते विक्रम फडणवीस यांचा आगामी ‘पल भर के लिए’ हा चित्रपट आता आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा जागतिक प्रिमियर (वर्ल्ड प्रिमियर) ‘इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न’ म्हणजेच ‘आयएफएफएम 2026’ मध्ये होणार आहे. या चित्रपटात सैयमी खेर यांच्यासोबतच इष्वाक सिंग, ताहिर राज भसीन आणि विनीत कुमार सिंग हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकणार …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र







