लेख-समिक्षण
  • 29 Mar 2026

अंक मिळणेसाठी


एकूण वाचक संख्या : 4207

TimeLine Layout

September, 2025

  • 28 September

    धूम्रपान आणिं मनारोग्य

    माणसाने अनेक विचित्र सवयी स्वतःला लावून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये नाका-तोंडातून धूर काढणार्‍या धूम्रपानाचा समावेश होतो. ‘नाकाचा वापर धुराड्यासारखा व्हावा अशी देवाची इच्छा असती तर त्याने नाकपुड्या उफराट्या ठेवल्या नसत्या का?’ असे महान कृषीशास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांनी म्हटले होते. ‘धूम्रपान आरोग्यासाठी घातक असते’, असे वाक्य सिगारेटच्या पाकिटावरही लिहिलेले असते; पण तरीही अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करतात आणि सर्रास धूम्रपान करतात. …

    Read More »
  • 28 September

    यशोकहाणी भूगर्भशास्त्रज्ञाची

    लंडनजवळील ओल्ड सारम कॅम्प येथे डॉ. रॅडलिफ यांच्या शाळेतील काही नवीन मुले एका जुन्या बोगद्याच्या तोंडाशी थांबली होती. तो बोगदा प्राचीन काळी पाण्याकरिता वापरला जात असे. काळोख्या बोगद्यात शिरताना सगळ्यांची भीतीने थरथर कापणारी अवस्था होती. त्याच वेळी मोठ्या मुलांनी त्यांच्या टोप्या आत फेकून दिल्या. भीतीवर मात करून लहान मुले सरपटत त्या बोगद्यात शिरली. तेथे खूप अंधार होता, खडकावर पाणी ठिबकत …

    Read More »
  • 28 September

    नीतीमूल्यांची पायमल्ली

    नेहमीच वादग्रस्त बोलणारे गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर केलेल्या टीकेनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दूरध्वनी करून आपली नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्रातील महायुती सरकारचे घटक असणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीसुद्धा अशा प्रकारच्या विधानाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. आता देवेंद्र फडणवीस यांनी या विधानाची दखल घेऊन गोपीचंद पडळकर यांना समज …

    Read More »
  • 28 September

    सवलतींचे वास्तव

    देशात २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी स्लॅबची अंमलबजावणी सुरू झाली. त्यातून अनेक ग्राहक उपयोगी आणि जनसामान्यांच्या गरजेच्या वस्तू काही प्रमाणात स्वस्त झाल्या आहेत. हा बचत उत्सव असल्याचे मोदी सरकारचे म्हणणे आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य कुटुंबाचे वर्षाला कमीत कमी ३० ते ४० हजार रुपये वाचतील, असा सरकारचा दावा आहे. सरकारी महसुलात या निर्णयामुळे किती तूट येईल यावरसुद्धा वेगवेगळे दावे सुरू आहेत. काही …

    Read More »
  • 28 September

    मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ शेतकर्‍यांच्या बांधावर

    मराठवाडा, पश्चिम विदर्भात पावसाने हाहा:कार माजवला आहे. शेतकर्‍यांनी ओला दुष्काळ घोषित करण्यासाठी टाहो फोडल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, सामाजिक न्यायमंत्री संजय सिरसाट, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह राज्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी बुधवारी लातूर, सोलापूर जिल्ह्यात दौरा केला. शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पीक नुकसानीची पाहणी केली. या दौर्‍यात मुख्यमंत्री फडणवीस …

    Read More »
  • 28 September

    ई सिमकार्ड घोटाळ्याचा चक्रव्यूह

    इंटरनेटच्या विस्ताराने माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणली; पण या विस्तारणार्‍या सायबरविश्वात गुन्हेगारीही वाढत चालली आहे. सायबर गुन्हेगार आजच्या काळात नवनवीन शक्कल लढवून लोकांची फसवणूक करत आहेत. परिणामी, आपल्या हातात असणारा मोबाईल कोणत्या क्षणी आपले बँक खाते रिकामे करेल हे सांगता येत नाही अशी स्थिती आहे. अलीकडील काळात गाजत असलेला ई-सिम घोटाळा हा यातीलच एक प्रकार असून त्याबाबत अत्यंत सजग …

    Read More »
  • 28 September

    जीएसटी सुधारणा आणि कंपन्यापुढे पेच

    भारतातील ग्राहक वस्तूंच्या बाजारपेठेत एक नवा टप्पा सुरु झाला आहे. वस्तू आणि सेवा कराच्या दुसर्‍या टप्प्यातील सुधारणा म्हणजेच जीएसटी २.० लागू झाल्यानंतर सर्वसामान्यांच्या खरेदी पद्धती, कंपन्यांची किंमत ठरवण्याची नीती आणि संपूर्ण पुरवठा साखळी यामध्ये लक्षणीय बदल होणार आहेत. दशकानुदशके ग्रामीण आणि शहरी बाजारपेठेत समान महत्त्व राखणारे ५ रुपये व १० रुपयांचे पॅक आता हळूहळू गायब होत आहेत. या किमती म्हणजेच …

    Read More »
  • 21 September

    सलमानच्या चित्रपटात पूजाची एंट्री

    दक्षिण चित्रपटसृष्टीतील अभिनेता दुलकर सलमान ‘डीयू४१’ या सिनेमात पाहायला मिळणार आहे. यात तो नव्या लूकमध्ये दिसणार आहे. अशातच या चित्रपटासंदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. दुलकर सलमानच्या बहुप्रतिक्षित ‘डीक्यू४१’ चित्रपटात पूजा हेगडेची एन्ट्री झाली आहे. सोशल मिडियावर शेअर केलेल्या व्हिडिओद्वारे पूजाच्या एन्ट्रीची माहिती देण्यात आली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पूजा अतिशय साध्या अंदाजात दिसत आहे. व्हिडीओ शेअर …

    Read More »
  • 21 September

    साधेपणाचे पारडे जड

    हिंदी चित्रपटसृष्टीत गेल्या काही दशकांत विविध प्रवाह दिसून आले. एका टोकाला प्रचंड खर्च करून तयार करण्यात आलेली ऐश्वर्यशाली मांडणी असलेली, परंतु कथानकाच्या दृष्टीने बोजड ठरलेली चित्रपटांची मालिका दिसते; तर दुसर्‍या टोकाला थेट जीवनाला भिडणार्‍या, साधेपणा असणार्‍या, पण प्रभावी चित्रपटकृती प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसतात. या दोन प्रवाहांमध्ये ‘बोल्ड दृश्ये’ या घटकाला जणू काही ठरावीक स्थान प्राप्त झाले आहे. काही निर्माते …

    Read More »
  • 21 September

    गुंतवणूक ‘क्षणांची ’

    मित्रांबरोबर घालवलेले क्षण आपल्याला उपयोगी पडतात. तरुणपणात आपल्याला मोठा मित्रपरिवार असतो. कॉलेजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मित्र जोडले जातात. खेळ, सांस्कृतिक उपक्रम याद्वारे आपला मित्र परिवार वाढत जातो. मित्र परिवार वाढल्याने आपला जीवनविषयक दृष्टीकोन व्यापक होत असतो. याचे कारण वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे, वेगवेगळ्या स्वभावाचे मित्र असल्याने त्यांच्या अनुभवाद्वारे आपल्याला जीवनाकडे वेगळ्या दृष्टीने पहाण्याची नजर मिळते. या मित्रांबरोबर आपण खर्च केलेला वेळ ही एक …

    Read More »