• 18 October 2026

अंक मिळणेसाठी


एकूण वाचक संख्या : 4212

TimeLine Layout

October, 2026

  • 18 October

    विजय आणि रश्मिकाचा ‌‘रणबाली‌’

    दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडा आणि आघाडीची अभिनेत्री रश्मिका मंदाना ही बहुचर्चित जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार असून त्यांच्या आगामी ‌’रणबाली‌’ या भव्य चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील ब्रिटिश सत्तेच्या जुलमी राजवटीची आणि त्याविरुद्ध पेटून उठलेल्या स्थानिक जनतेच्या संघर्षाची ही ऐतिहासिक पार्श्वभूमीवर बेतलेली कथा आहे. ट्रेलरमधील अंगावर काटा आणणारे युद्धप्रसंग, भव्य देखावे आणि ताकदीचे …

    Read More »
  • 18 October

    सिनेसृष्टीतील नवे स्थित्यंतर

    भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात प्रेक्षकांच्या बदलत्या अभिरुचीने नेहमीच नव्या युगाची पायाभरणी केली आहे; मात्र सध्या चित्रपटगृहांमध्ये जाणवणारे स्थित्यंतर अभिरुचीपुरते मर्यादित नसून ते भारतीय रसिकांच्या मानसिक सीमांचा विस्तार अधोरेखित करणारे आहे. मुंबईत आकाराला येणारा हिंदी सिनेमा म्हणजे अवघ्या देशाचे प्रतिनिधित्व, हे वर्षानुवर्षांचे पारंपरिक समीकरण आता मोडीत निघाले आहे. भाषेच्या भिंती ओलांडून दाक्षिणात्य चित्रपटांच्या आशयाला आणि तिथल्या कलाकारांना देशभरातील रसिक ज्या आत्मीयतेने स्वीकारत …

    Read More »
  • 18 October

    प्रेमात पडला आहात?

    कधी एखादी व्यक्ती सतत आपल्या विचारांत असते? ती दिसली की चेहऱ्यावर नकळत हसू उमटते, तिच्याशी बोलताना शब्द अडखळतात आणि तिच्या आसपास राहण्याची कारणं आपणच शोधू लागतो? जर या प्रश्नांची उत्तरं ‌‘हो‌’ असतील, तर कदाचित तुम्हाला त्या व्यक्तीविषयी आकर्षण वाटत असावं. तरुण वयात अशी भावना निर्माण होणं अगदी स्वाभाविक आहे. एखाद्या व्यक्तीविषयी आकर्षण निर्माण झालं की तिच्याबद्दल वारंवार विचार होऊ लागतो. …

    Read More »
  • 18 October

    इंडक्शनवर अन्न शिजवावे का ?

    भारतात सध्या एलपीजी सिलिंडरच्या तुटवड्यामुळे इंडक्शन कुकटॉपची मागणी प्रचंड वाढली आहे. मात्र, वीजेवर चालणाऱ्या या शेगडीबाबत लोकांच्या मनात अनेक शंका आणि अफवा आहेत. इंडक्शनवर शिजवलेले अन्न आरोग्यासाठी सुरक्षित आहे की धोकादायक, असा प्रश्न आजही अनेकांना पडतो. वास्तविक, शास्त्रीय दृष्टिकोनातून इंडक्शनवर स्वयंपाक करणे पूर्णपणे सुरक्षित मानले जाते. यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जेचा वापर केला जातो, जी थेट भांड्याला गरम करते. इंडक्शनमधून बाहेर पडणाऱ्या …

    Read More »
  • 18 October

    कहाणी ‌‘योद्धा मगर‌’ ची

    यनासोरच्या युगापूर्वी, सुमारे 240 दशलक्ष वर्षांपूर्वी ट्रयासिक कालखंडात, ब्राझीलमध्ये वावरणाऱ्या एका महाकाय ‌‘योद्धा सरड्याचा‌’ शोध संशोधकांनी लावला आहे. हा शोध डायनासोर पृथ्वीवर वर्चस्व गाजवण्यासाठी येण्यापूर्वीच्या काळातील माहितीतील अंतर भरून काढतो आणि आता आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका यांच्यातील संबंधांवर अधिक प्रकाश टाकतो. हा चिलखतधारी सरपटणारा प्राणी डायनासोरसारखा दिसत असला, तरी तो प्रत्यक्षात आधुनिक मगरींचा पूर्वज आहे. शास्त्रज्ञांनी या प्राण्याला टी. बेलॅटॉर …

    Read More »
  • 18 October

    उकिरड्यावरच्या कोरफडीतून कोट्यवधींची भरारी

    संकटातच संधी शोधण्याची दृष्टी ज्याच्याकडे असते, तो मातीचेही सोने करू शकतो, याचा प्रत्यय सातारा जिल्ह्यातील पाडळी गावचे तरुण उद्योजक ऋषिकेश जयसिंग ढाणे यांच्या यशोगाथेतून दिसून येतो. सुमारे दोन दशकांपूर्वी पाडळी परिसरातील शेतकऱ्यांना कोरफडीच्या शेतीतून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष एका व्यापाऱ्याने दाखवले होते. शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने लागवड केली खरी, परंतु खरेदीचे आश्वासन देणारा व्यापारी गायब झाल्याने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला. हताश …

    Read More »
  • 18 October

    सुरक्षेतील त्रुटी आणि हिंसेचे राजकारण

    पश्चिम बंगालच्या ज्येष्ठ नेत्या आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानाजवळ एका महिलेने त्यांच्या सुरक्षा कड्यात घुसखोरी करून हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. मंगळवारी दुर्गापूजा उत्सवाचे उद्घाटन करण्यासाठी जात असताना ही घटना घडली. वेळीच सुरक्षा रक्षक आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या संशयित महिलेला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. कार्यकर्त्यांच्या मते, त्या महिलेच्या हातात धारदार …

    Read More »
  • 18 October

    स्वागतार्ह पाऊल; पण…

    कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराशी दोन हात करणाऱ्या असहाय रुग्णांकडून आणि त्यांच्या हतबल कुटुंबीयांकडून औषधांच्या नावाखाली मनमानी नफेखोरी करणे, हे निव्वळ आर्थिक शोषण नसून एक अमानुष कृत्य आहे. या महाभयंकर व्याधीचा मुकाबला करताना रुग्णाला केवळ औषधेच नव्हे, तर निदान, शस्त्रक्रिया, प्रारणोपचार अशा विविध पातळ्यांवर अमाप पैसा खर्च करावा लागतो. अशा स्थितीत निदान औषधांच्या अवाजवी किमतींवर तरी लगाम लावला जावा, ही अनेक वर्षांची …

    Read More »
  • 18 October

    सर्वोच्च न्यायालयाचा विरोधी पक्षांना स्पष्ट इशारा

    नवी दिल्लीतील राजकीय संघर्षाने थेट देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या दारावर धडक दिल्यानंतर आता न्यायव्यवस्थेनेही यावर अत्यंत कठोर आणि स्पष्ट भूमिका घेतली आहे. निवडणूक आयोगाच्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने काढलेला मोर्चा आणि त्यानंतर न्यायालयाच्या आवारात उडालेला गोंधळ, यावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी तीव्र …

    Read More »
  • 18 October

    दुष्काळग्रस्तांना दिलासा; पण प्रश्न कायम!

    महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5 हजार रुपयांची आगाऊ मदत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, हजारो कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा करताना दर काही वर्षांनी महाराष्ट्राला दुष्काळाच्या संकटाला सामोरे का जावे लागते? जलसंधारणावर प्रचंड खर्च होऊनही अनेक गावांची तहान टँकरवरच का अवलंबून आहे? पीकविम्यापासून कर्जपुनर्गठनापर्यंतच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना वेळेवर का मिळत नाही?या मूलभूत प्रश्नांनची उत्तरेही सरकारने शोधली पाहिजेत. शेतकऱ्यांच्या आयुष्यातील …

    Read More »