मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश यांच्या राजीनाम्याची मागणी करीत देशातील सर्व विरोधी पक्ष आणि तरुणांच्या कॉक्रोच जनता पक्षाने 2 ऑक्टोबरपासून रणशिंग फुंकले आहे. मुंबईत कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वात तरुणांचे आंदोलन पेटले. त्यांना नियंत्रित करण्यासाठी पेोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली. दुसरीकडे निवडणुकीतील निष्पक्षता राखण्यासाठी आणि लोकशाही हक्कांचे संरक्षण करायचे म्हणत संपूर्ण विरोधी पक्ष एकजूट झाला. इंडिया आघाडीने 2 ते 8 ऑक्टोबरदरम्यान देशव्यापी …
Read More »TimeLine Layout
October, 2026
-
4 October
उपाययोजना स्वागतार्ह,कसोटी अमलबजावणीची
महाराष्ट्रातील शेती आणि बळीराजा पुन्हा एकदा एका भीषण आणि ऐतिहासिक संकटाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे.राज्य सरकारने 25 सप्टेंबर रोजी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला होता. परंतु घोषित न झालेले अन्य तालुकेही दुष्काळाच्या झळा सोसत आहेत हे निदर्शनास आले. त्यानुसार आणखी 43 तालुक्यांचा दुष्काळाच्या परिघात समावेश करण्यात आला. त्यामुळे आता दुष्काळी तालुक्यांचा एकूण आकडा 308 या विक्रमी पातळीवर गेला आहे. मराठवाड्यातील …
Read More » -
4 October
ज्ञानमंदिरातील ‘भीती’
पंजाबच्या राजपुरा येथील चितकारा विद्यापीठापासून सुरू झालेला धक्कादायक घटनांचा आणि त्यांच्या प्रसाराचा वणवा फगवाड्यातील लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीपर्यंत पोहोचला आणि बघता बघता दोन नामांकित शैक्षणिक संस्था यात होरपळल्या. देशाच्या शिक्षणक्षेत्राबाबत गंभीर चिंता वाटावी अशा घटना अवघ्या 72 तासांत या दोन विद्यापीठांत घडल्या. जालंधर जिल्ह्यातील लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये म्हणजे एलपीयूमध्ये एका विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याच्या व तिने, आत्महत्या केल्याच्या दाव्यामुळे विद्यार्थ्यांचे आंदोलन उसळले. …
Read More »
September, 2026
-
27 September
कतरीनाच्या ट्रोलिंगवरुन खळबळ
बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री कतरिना कैफ सध्या तिच्या वाढलेल्या वजनामुळे सोशल मीडियावर होत असलेल्या अवाजवी ट्रोलिंगमुळे चर्चेत आली आहे. नोव्हेंबर महिन्यात पती विकी कौशल आणि कतरिनाने आपल्या पहिल्या बाळाचे जगात स्वागत केले होते. बाळ झाल्यानंतर नुकतीच कतरिना एका सार्वजनिक गणेशोत्सव कार्यक्रमात सहभागी झाली होती. या कार्यक्रमातील तिचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर काही विकृत नेटकऱ्यांनी तिच्या शरीरयष्टीवर आणि वाढलेल्या वजनावर अत्यंत …
Read More » -
27 September
प्रतिमा बदलणारे कलाकार
चित्रपटसृष्टीत एकदा ‘इमेज’ तयार झाली की ती कलाकाराला यशाच्या शिखरावर नेते; पण कालांतराने तीच त्याच्या पायातील बेडीही ठरू शकते. म्हणूनच खरा कस लागतो तो स्वतःची लोकप्रिय प्रतिमा मोडून पूर्णपणे विरुद्ध भूमिका स्वीकारताना. हिंदी चित्रपटसृष्टीत प्राण यांनी खलनायकातून चरित्र अभिनेत्यापर्यंतचा प्रवास केला, विनोद खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हा खलनायकी भूमिकांतून नायक झाले, तर सैफ अली खान आणि संजय दत्त यांनी नायकाच्या चौकटीबाहेर …
Read More » -
27 September
सुंदर आणि वाचनीय हस्ताक्षरासाठी….
सुंदर आणि नीटनेटके अक्षर असावे, अशी अनेकांची इच्छा असते. चांगले हस्ताक्षर केवळ जन्मजात मिळते असे नाही; योग्य पद्धत, सातत्यपूर्ण सराव आणि संयम यांच्या मदतीने अक्षरात मोठा बदल करता येतो. लिहिताना काही साध्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर अक्षर अधिक सुबक, स्पष्ट आणि आकर्षक होऊ शकते. 1)लिहिताना शरीराची योग्य ठेवण असणे महत्त्वाचे आहे. पेन किंवा पेन्सिल हातात खूप घट्ट पकडू नका. त्यामुळे …
Read More » -
27 September
गुळ आणि लिंबाने घालवा मुरुमांचे व्रण
चेहऱ्यावरील काळे आणि तपकिरी डाग ही सध्या एक सामान्य समस्या बनली आहे. प्रखर ऊन, मुरुमांचे वण, संप्रेरकांमधील बदल (हार्मोनल चेंजेस) किंवा पिगमेंटेशनमुळे त्वचेचा पोत आणि रंग असमान दिसू लागतो. यावर उपाय म्हणून अनेक जणी महागड्या रासायनिक उत्पादनांचा आधार घेतात, मात्र गुळ आणि लिंबू यांसारख्या घरात सहज उपलब्ध होणाऱ्या घटकांचा वापर करूनही त्वचा स्वच्छ आणि चमकदार बनवता येते. लिंबामध्ये निसर्गतः व्हिटॅमिन …
Read More » -
27 September
प्रयोगशाळेत बनणार दुर्मिळ रक्तगट
केवळ साठ लाखांमध्ये एका व्यक्तीमध्ये आढळणारा ‘आरएच नल’ नावाचा जगातील सर्वात दुर्मीळ रक्तगट आता प्रयोगशाळेत विकसित करण्याचा प्रयत्न संशोधक करत आहेत. या प्रयत्नांमुळे लाखो लोकांचे जीव वाचण्याची शक्यता आहे. आधुनिक वैद्यकशास्त्रात रक्तसंक्रमणाने क्रांती घडवून आणली आहे. दुखापत झाल्यास किंवा मोठी शस्त्रक्रिया करण्याची गरज भासल्यास, दान केलेले रक्त जीवन वाचवू शकते. परंतु, ज्या लोकांचे रक्तगट दुर्मीळ आहेत, त्यांना त्यांच्याशी जुळणारे रक्त …
Read More » -
27 September
शेतीला व्यवसायाची जोड
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील कळवडी गावच्या प्रणिता वामन यांनी ‘एमबीए इन ॲग्रीबिझनेस मॅनेजमेंट’चे शिक्षण पूर्ण केले. या शिक्षणानंतर कॉर्पोरेट क्षेत्रात चांगले करिअर करण्याचा पारंपरिक मार्ग त्यांच्यासमोर खुला होता. मात्र त्यांनी वेगळी वाट निवडली. नोकरी करण्याऐवजी आपल्या शिक्षणाचा उपयोग शेतीत करून स्वतःचा व्यवसाय उभा करण्याचा निर्णय घेतला. फूड प्रोसेसिंग कंपनीत इंटर्नशिप करताना त्यांना आधुनिक शेतीतील बदल आणि कृषी व्यवसायातील संधी जवळून …
Read More » -
27 September
टीकेची नीचांकी पातळी
इंदूर येथे आयोजित ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत एका विनोदी कलाकाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची केलेली नक्कल सध्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेचा आणि वादाचा विषय ठरली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात, राहुल गांधी यांनी एका विनोदी कलाकाराला पाचारण करून देशाच्या प्रमुखांची नक्कल करण्यास प्रोत्साहन देणे आणि स्वतः त्यात सहभागी …
Read More »
पांचजन्य वृत्तपत्र







